व्हेनेतो (इटालियन: Veneto; लॅटिन: Venetia; व्हेनेशियन: Vèneto) हा इटली देशाच्या ईशान्य भागातील एक प्रदेश आहे. व्हेनेतोच्या पूर्वेस एड्रियाटिक समुद्रफ्रुली-व्हेनेझिया जुलिया, पश्चिमेस लोंबार्दिया, दक्षिणेस एमिलिया-रोमान्या व उत्तरेस त्रेन्तिनो-आल्तो अदिजे हे प्रदेश आहेत. उत्तरेकडील काही भाग ऑस्ट्रियाच्या सीमेवर आहे. व्हेनिस ही व्हेनेतोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

व्हेनेतो
Vèneto
इटलीचा प्रदेश
ध्वज

व्हेनेतोचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
व्हेनेतोचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी व्हेनिस
क्षेत्रफळ १८,३९९ चौ. किमी (७,१०४ चौ. मैल)
लोकसंख्या ४९,३६,१९७
घनता २७० /चौ. किमी (७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-34
संकेतस्थळ regione.veneto.it

प्रागैतिहासिक काळापासून व्हेनिसचे प्रजासत्ताक ह्या जगातील सर्वात बलाढ्य व श्रीमंत साम्राज्याचा भाग असलेले व्हेनेतो अनेक दशके स्वतंत्र राष्ट्र होते. नेपोलियनने व्हेनिसचे प्रजासत्ताक बरखास्त करून हा प्रदेश ऑस्ट्रियन साम्राज्याला जोडला. इ.स. १८८६ साली व्हेनेतो इटलीचा प्रदेश बनला. आजच्या घडीस व्हेनेतोला इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान आहे. दरवर्षी सुमारे ६ कोटी पर्यटक येथे भेट देतात. इटालियन सोबत व्हेनेशियन ही देखील येथील एक प्रमुख भाषा आहे.

येथील ५ स्थाने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये आहेत.


मोठी शहरे

संपादन
क्रम शहर लोकसंख्या क्षेत्रफळ (km²) घनता (/km²) उंची (m) प्रांत
व्हेनिस 2,68,741 412.54 651.4 1 व्हेनिस
व्हेरोना 2,62,403 206.63 1,269.9 59 व्हेरोना
पादोव्हा 2,09,696 92.85 2,258.4 12 पादोव्हा
व्हिचेन्सा 1,13,969 80.54 1,415.1 39 व्हिचेन्सा
त्रेव्हिसो 81,665 55.50 1,741.4 15 त्रेव्हिसो

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: