विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्था, आंबवणे
पार्श्वभूमी
संपादनजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विकिपीडियावरील ज्ञान निर्मितीत प्रत्यक्ष सहभागाला सुरुवात करून वेल्हे तालुक्यातील महिला खऱ्या अर्थाने ग्लोबल झाल्या.
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी वेल्हे तालुक्यातील आंबवणे येथील जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेने पुढाकार घेतला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने १० मार्च २०१७ रोजी स्टरलाईट टेक फौंडेशन,ज्ञान प्रबोधिनी व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने स.११ ते दु.४ या वेळेत आंबवणे येथील केंद्रात मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोशात इंग्रजीत ५३ लाख तर मराठीत केवळ ४६ हजार लेख आहेत. त्यांतही ग्रामीण भागातील शेती,पाणी,पर्यावरण,पर्यटन,ऐतिहासिक स्थळे,उद्योग इ. विषयांशी निगडीत लेखांचे प्रमाण अत्यल्प आहे. या भागातील संगणक साक्षर पिढी यासंबंधी ज्ञान निर्मितीत योगदान करण्यास अत्यंत उत्सुक आहे हे या कार्यशाळेतील सक्रीय सहभागाने दिसून आले. काही युवतींनी संगणक उपलब्ध न झाल्याने मोबाईलवर विकिपीडिया सदस्य होवून संपादने केली. सर्व युवतींनी अधिक प्रशिक्षित होवून सातत्याने विकिपीडियामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्टरलाईट टेक फौंडेशनच्या सहकार्याने वेल्हे तालुक्यात एका अभिनव ज्ञाननिर्मिती प्रकल्पाची सुरुवात या निमित्ताने झाली आहे.
या कार्यशाळेत सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे कार्यक्रम समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. समन्वयक ज्ञान प्रबोधिनीच्या सुवर्णा गोखले यांनी आशयाबाबत सविस्तर विवेचन केले. स्टरलाईट टेक फौंडेशनचे अवध गुप्ता व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. तसेच ‘विकिपीडियामधील महिलांचा सहभाग’ या विषयावर प्रबंध लिहिण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा) येथे अभ्यास करणारी मूळची तैवान येथील टिंग यि चँग ही विद्यार्थिनी सहभागी झालेल्या महिलांच्या मुलाखती घेण्यास आली होती. सदर कार्यशाळेत वेल्हे तालुक्यातील ८ गावांमधील ४० महिला व युवतींनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे, असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे, फोटो जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली.
आयोजक संस्था
संपादन- ज्ञान प्रबोधिनी, स्टरलाईट टेक फौंडेशनचे जीवन ज्योती महिला सक्षमीकरण केंद्र, आंबवणे व द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी
प्रशिक्षण मुद्दे
संपादन- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
- मराठी विकिपीडियाची ओळख
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक,स्थान व वेळ
संपादन- शुक्रवार दि. १० मार्च २०१७
- संगणक प्रयोगशाळा
- वेळ - सकाळी ११ ते दुपारी ४
साधन व्यक्ती
संपादन- संयोजक (ज्ञान प्रबोधिनी) - सुवर्णा गोखले (चर्चा) २२:१७, १० मार्च २०१७ (IST)
- तज्ञ मार्गदर्शक (द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K)) - सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:२०, १६ मार्च २०१७ (IST)
संपादित लेख
संपादनया कार्यशाळेत खालील लेख नव्याने लिहिले गेले किंवा संपादित केले गेले.
सहभागी सदस्य
संपादन- --रोहिणी भगत (चर्चा) १५:३०, १० मार्च २०१७ (IST)
- --पूजा सुरेश शिळीमकर (चर्चा) १४:२९, १० मार्च २०१७ (IST)
- --मिनल रणखांबे (चर्चा) १४:३२, १० मार्च २०१७ (IST)
- --गौरी शरद चव्हाण (चर्चा) १४:३४, १० मार्च २०१७ (IST)
- --आरती तनपुरे (चर्चा) १४:४०, १० मार्च २०१७ (IST)
- --स्नेहा रघूनाथ काटकर (चर्चा) १४:४३, १० मार्च २०१७ (IST)
- --ऋतुजा दत्तात्रय काटकर (चर्चा) १४:५५, १० मार्च २०१७ (IST)
- --प्रतीक्षा रेणुसे (चर्चा) १५:०६, १० मार्च २०१७ (IST)
- --किरण अरुण वालगुडे (चर्चा) १५:१९, १० मार्च २०१७ (IST)
- --मेघा कांटे (चर्चा) १५:२३, १० मार्च २०१७ (IST)
- --पुजा शिळीमकर (चर्चा) १५:३०, १० मार्च २०१७ (IST)
- --शिवानी भंडारी (चर्चा) १५:३१, १० मार्च २०१७ (IST)
- --माधुरी वेगरे (चर्चा) १५:३४, १० मार्च २०१७ (IST)
- --रविना विठ्ठल फदाले (चर्चा) १५:४७, १० मार्च २०१७ (IST)
- --प्रतिक्षा रायरीकर (चर्चा) १५:५१, १० मार्च २०१७ (IST)
- --योगिता आ पवार (चर्चा) १५:५९, १० मार्च २०१७ (IST)
- --अनुराधा खंदारे (चर्चा) १६:१०, १० मार्च २०१७ (IST)
- --सपना दत्तात्रय वाडकर (चर्चा) १६:१२, १० मार्च २०१७
- --विद्या खुडे (चर्चा) १६:१६, १० मार्च २०१७ (IST)
- --पुजा हरिभाऊ रेणुसे (चर्चा) १५:२५, २१ मार्च २०१७ (IST)
- --पुजा शिंदे (चर्चा) १६:१७, १० मार्च २०१७ (IST)
- --Archanapote (चर्चा) १६:२१, १० मार्च २०१७ (IST)
- --अश्विनी भरम (चर्चा) १६:३९, १० मार्च २०१७ (IST)
- --अर्चना लेकावळे (चर्चा) १२:०९, २० मार्च २०१७ (IST)
- --मोनाली रणखांबे (चर्चा) १२:३२, २० मार्च २०१७ (IST)
- --राणी कालिदास शिळीमकर (चर्चा) १५:३५, २० मार्च २०१७ (IST)
- --प्रियांका अनिल आधवडे (चर्चा) १५:१३, २१ मार्च २०१७ (IST)
- --रुपाली रेणुसे (चर्चा) १५:२३, २२ मार्च २०१७ (IST)
- --वर्षा शिवाजी माने (चर्चा) १६:०८, ३१ मार्च २०१७ (IST)
चित्रदालन
संपादन-
तांत्रिक मार्गदर्शन
-
टिंग-यि संवाद साधताना
-
प्रात्यक्षिक पहाताना
-
शिकण्यात मग्न युवती
-
गावाविषयी लिहू
-
कौशल्य आत्मसात करू
-
एकमेका करू सहाय्य
-
संपादन करताना
-
आपले गाव विकिपीडियावर!