नैसर्गिक पर्यावरण
मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. [१] वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. [२] मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणाऱ्या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय. [३]
मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व त्यांच्या भोवतीचे पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. [४]
सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाहीत ते नष्ट होतात. जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ५ जून हा जगभर पर्यावरण दिवस म्हणून साजरा होतो.
पर्यावरण वर निबंध देखील भरपूर वेळा विचारला जातो तर त्यातही आपल्याल आपल्या पर्यावरण बद्दल योग्य माहीत देणे गरजेचे आहे. आजकाल पर्यावरणचे संतुलन ठेवणे ही मानवाची जवाबदारी आहे कारण ह्या सृष्टीत निसर्गाने मनुष्य हा जीव बुद्धिमान म्हणून बनवला आहे. तर मानवाने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून म्हणजेच पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, गाड्यांचा धूर, कारखान्यांचा धूर आणि सांडपाणी कमी करायला हवे.
पर्यावरणविषयक ग्रंथ
संपादन- आरोग्यदायी पर्यावरण (भूषण पटवर्धन)
- ऊर्जा संयम (दिलीप कुलकर्णी)
- ओळख पर्यावरणाची (बालसाहित्य, लेखक - जोसेफ तुस्कानो)
- कॉंक्रीटची वनराई : प्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न (मुंबई सकाळ या दैनिकामध्ये 'नागर जागर' या सदरात प्रसिद्ध झालेल्या पर्यावरणविषयक लेखांचा संग्रह; लेखिका - सुलक्षणा महाजन)
- गाथा पर्यावरणाची (अभिजीत घोरपडे)
- चालू शतक, निसर्ग-पर्यावरण आणि भारत! (संतोष शिंत्रे)
- झाडं आणि पर्यावरण (डॉ. बी.पी. वांगीकर)
- झाडं लावणारा माणूस (माधुरी पुरंदरे)
- डळमळले भूमंडळ (अतुल देऊळगावकर)
- तरंग-अंतरंग : समकालीन पर्यावरणाची चिकित्सा (संतोष शिंत्रे)
- दैनंदिन पर्यावरण (दिलीप कुलकर्णी)
- निसर्ग पर्यावरण विविधा (प्रा. पी.आर. परदेशी)
- निसर्गायण (दिलीप कुलकर्णी)
- पर्यावरण (प्रशांत निंबाजी घरटे)
- पर्यावरण (डॉ. बाळ पदवाड)
- पर्यावरण (बी.के. कुलकर्णी)
- पर्यावरण (नाटक, लेखक - भीमा कदम)
- पर्यावरण (वि.गो. भागवत)
- पर्यावरण (अनंतरूपे अनंत हस्ते) (प्र.के. घाणेकर)
- पर्यावरण आणि मानव (स्मिता देवधर)
- पर्यावरण आणि समाज (प्रा. शैलजा सांगळे)
- पर्यावरण गाथा (निरंजन घाटे)
- पर्यावरण जागर (प्रा. भास्कर जोहरापूरकर)
- पर्यावरण जागृती (ए.आर. कुंभारे)
- पर्यावरण : जाणीव विकास (वसंतराव ठाकरे)
- पर्यावरण परिस्थिती आणि प्रयत्न (भास्कर देशमुख)
- पर्यावरण-पोषक शौचकूप (श.म. केतकर)
- पर्यावरण प्रदूषण (रंजन गर्गे )
- पर्यावरण प्रदूषण (डॉ. रवींद्र भावसार)
- पर्यावरण प्रहरी (पंडित वासुदेवशास्त्री देशपांडे)
- पर्यावरण : रोजचा विचार (पद्मा साठे)
- पर्यावरणशास्त्र परिचय (डॉ. रंजना देवरे)
- डायमंड पर्यावरणशास्त्र शब्दकोश (जॉन्सन बोर्जेस)
- पर्यावरण शिक्षण (प्रा. नीला पाथरे)
- पर्यावरण समस्या निराकरण व क्षेत्र अभ्यास (डॉ. श्रीकांत कार्लेकर)
- पर्यावरण संरक्षण (वैशाली जेऊरकर)
- पर्यावरणाची कथा आणि व्यथा (डॉ. रविकांत पागनीस)
- पर्यावरणाची हाक (पुष्पा घळसासी)
- पक्षी आणि पर्यावरण (डॉ. प्रदीप व्यवहारे, डॉ. सुभाष बेहरे)
- बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची (अतुल देऊळगावकर)
- बदलू या जीवनशैली (दिलीप कुलकर्णी)
- भवताल (द्वैमासिक नियतकालिक, संपादक - अभिजित वसंत घोरपडे)
- (माध्यमे, सामाजिक संस्था आणि नागरिकांसाठी) भारतीय निसर्ग पर्यावरण पत्रकारिता (संतोष शिंत्रे)
- भूतान आणि क्यूबा : सम्यक विकासाच्या दिशेने (दिलीप कुलकर्णी)
- मला उत्तर हवंय : पर्यावरण (मोहन आपटे)
- माणूस आणि झाड (निळू दामले)
- रानावनाचे मूड्ज (किशोर रिठे)
- वसा पर्यावरणाचा (नीता डंबीर)
- वसुंधरेचे आविष्कार (प्रा. शं.ल. चोरघडे)
- विश्वाचे आर्त (अतुल देऊळगावकर)
- वेध पर्यावरणाचा (नंदकुमार रोपळेकर)
- वेध पर्यावरणाचा (संपादक रविराज गंधे)
- व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता (कडवेकर, प्रा. रवींद्र कोठावदे)
- शिक्षण व पर्यावरण (भूषण पटवर्धन)
- साधनसंपदा व पर्यावरण (अरुण राजाराम कुंभारे)
- सौर आरोग्य (दिलीप कुलकर्णी, पौर्णिमा कुलकर्णी)
- स्त्री आणि पर्यावरण (वर्षा गजेंद्रगडकर)
- स्वच्छतेतून पर्यावरण (डॉ. प्रफुल्ल चौधरी)
- हरित साधक (डॉ.सदानंद बोरसे, दिलीप कुलकर्णी)
- हसरे पर्यावरण (बालसाहित्य, दिलीप कुलकर्णी)
- हिरवा संघर्ष (किशोर रिठे)
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
- ^ http://www.marathibhasha.org/kosh-words/search?term=&field_pratishabd_value=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3&page=1#sthash.EU3iLx4D.dpuf[permanent dead link]
- ^ https://www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand12%2Findex.php%2Fcomponent%2Fcontent%2Farticle%3Fid%3D10164%26start%3D27&ei=vzyrVbyCM9KLuASvgLboBg&usg=AFQjCNF33QglT9jBEvWBfdQKzaoZTtvTxQ&bvm=bv.98197061,d.c2E
- ^ https://www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand15%2Findex.php%2Fcomponent%2Fcontent%2Farticle%3Fid%3D11540%26start%3D1&ei=5T6rVdPnFZCcugTPorHwCQ&usg=AFQjCNGjOlvVr-rmYxyHgioIhV2HbOl-Nw&bvm=bv.98197061,d.c2E
s