पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पहिले मराठी पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष ना.धों. महानोर हे होते.

पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन

संपादन

रत्‍नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेज व पेम संस्था यांनी आयोजित केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ७ ते ९ डिसेंबर २०१३ या तारखांना ‘पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन’ झाले. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले.

या संमेलनाच्या निमित्ताने १४ लघुपट दाखविण्यात आले, विद्यार्थ्यांनी पर्यावरण, पाणी, निसर्गावर आधारित कविता ऐकवल्या आणि गरम पाण्याच्या झऱ्यातील उष्णतेपासून प्रदूषणविरहित वीजनिर्मिती कशी करता येते हे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. ए.अबसर यांनी सांगितले.

पर्यावरणस्नेही

संपादन
  • किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरातील गरवारे महाविद्यालयात, १८ जानेवारी २०१४ रोजी ३रे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन झाले.
  • १३ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स.प.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन शनिवार दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे पार पडणार आहे. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षा असतील.

पर्यावरण साहित्य संमेलन

संपादन




पहा :