वर्षा गजेंद्रगडकर या विशेषतः पर्यावरण या विषयावर लिहिणाऱ्या मराठी लेखिका आहेत. रा.चिं. ढेरे यांच्या त्या कन्या आहेत.

पुस्तके

संपादन
  • अग्नी (खगोलशास्त्र व अन्य विषयांवर)
  • आपले सण आपली संस्कृती (माहितीपर)
  • उजेड आणि सावल्या (सदर लेखन संग्रह; दैनिक पुण्यनगरीत प्रसिद्ध झालेल्या ४० लेखांचा संग्रह)
  • उजेडवाटा (बोधकथा संग्रह)
  • ऐल पैल
  • खजिना लोककथांचा (कथासंग्रह)
  • खारफुटी, प्रवाळभिंती आणि सागरीसृष्टी व्यवस्था
  • गॉन विथ द विन्ड (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - मार्गारेट मिचेल)
  • छोट्यांसाठी मोठ्या गोष्टी (बालसाहित्य)
  • जैववैविध्य - संकल्पना
  • दोन क्षितिजे (कथासंग्रह)
  • निसर्गचित्रे (निसर्गविषयक)
  • भारतातील पवित्र वनस्पती (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - नंदिता कृष्ण आणि एम. अमिर्तलिंगम)
  • भारतीय अस्मितेची प्रतीके : या पुस्तकात राष्ट्रगीत-जनगणमन, राष्ट्रीय गीत - वंदे मातरम्‌, राष्ट्रध्वज - तिरंगा, राष्ट्रीय चिन्ह - राजमुद्रा, राष्ट्रीय बोधवाक्‍य - सत्यमेव जयते, राष्ट्रभाषा - हिंदी, राष्ट्रीय पक्षी - मोर, राष्ट्रीय पुष्प - कमळ, राष्ट्रीय वृक्ष - वड, राष्ट्रीय फळ - आंबा, राष्ट्रीय प्राणी - वाघ आणि राष्ट्रीय जलचर - डॉल्फिन या राष्ट्रीय प्रतीकांचा अतिशय सविस्तर वेध घेण्यात आला आहे. हा वेध घेताना या प्रतीकांचा इतिहास, राष्ट्रीय प्रतीक म्हणून निवडण्यामागची कारणं, याची माहिती मिळते.
  • भारताच्या लोकमाता
  • भारतीय पर्यावरण : काही प्रश्न काही उत्तरे
  • बुजगावण्यांची वरात
  • बोर्डिंग पार्टी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखक - जेम्स लीझर)
  • लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन (सहलेखिका - अरुणा ढेरे)
  • विज्ञानतारका (स्त्री वैज्ञानिकांची माहिती)
  • सुशीलाच्या रांगोळ्या
  • स्त्री आणि पर्यावरण

पुरस्कार

संपादन
  • भारतीय पर्यावरण या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक ग्रंथ पुरस्कार (२०१४)