दिलीप कुलकर्णी (जन्म..... ) हे लेखक, संपादक तसेच पर्यावरणविषयक आणि सामाजिक चळवळींत भाग घेणारे कार्यकर्ते आहेत.

परिचयसंपादन करा

१९७८ मध्ये दिलीप कुलकर्णी यांना मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका मिळाली. १९७८ ते १९८४ सालांपर्यंत ते पुण्याला टेल्को कंपनीमध्ये काम करीत होते. त्यानंतर १९८४ ते १९९३ दरम्यान, विवेकानंद केंद्र ( कन्याकुमारी) येथे पूर्ण वेळेचे काम. त्या काळात त्यांनी ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सान्निध्यातली जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे (दापोली तालुका, रत्‍नागिरी जिल्हा) या खेड्यात सहकुटुंब स्थायिक झाले आहेत.[१]

रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्‍न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही.

त्यांचे विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देणे आणि मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन करणे चालूच असते. इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णींचे नांदेडच्या 'नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त व्याख्यान झाले. पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक ते चालवतात. 'निसर्गायण', 'ग्रीन मेसेजेस' आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळांमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात. कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा त्यांचा मोठा प्रयत्‍न आहे.[२]

पुरस्कार व सन्मानसंपादन करा

 • दिलीप कुलकर्णी यांना २०१० साली 'नातू फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा 'महादेव बळवंत नातू पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे.[३]
 • त्यांच्या समग्र कार्यासाठी त्यांना २०१३ सालचा श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे त्या पुरस्काराचे स्वरूप आहे.[४]

कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

त्यांच्या नावावर सध्या १३ पेक्षा जास्त पुस्तके आहेत.

 • अणुविवेक
 • कलमी तुरा
 • गांधी उद्यासाठी (संपादित, ५० लेखांचा संग्रह)
 • ग्रीन मेसेजेस (इंग्रजी)
 • चिंचा आणि बोरे
 • जगदीशचंद्र बसू
 • दैनंदिन पर्यावरण
 • निसर्गायण
 • पर्यावरण जागृती
 • विकासस्वप्न
 • वेगळ्या विकासाचे वाटाडे
 • वैदिक गणित भाग १ ते ४ (सहलेखन)
 • सम्यक विचार
 • हरितसंदेश
 • हसरे पर्यावरण (बालसाहित्य)

संदर्भसंपादन करा

 1. ^ http://www.loksatta.com/trekit-news/nature-view-of-dapoli-518473/
 2. ^ http://www.loksatta.com/lokrang-news/paryavarnachya-hitasathi-badluya-jeevanshaili-868815/
 3. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/-/articleshow/5421636.cms
 4. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/-/articleshow/18503487.cms