विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे

मराठी विकिपीडियावर नकल-डकव (कॉपीपेस्ट) केलेल्या मजकूराबद्दल तसेच प्रताधिकार व त्यांचे रक्षण करण्याबद्दलची चर्चा या पानावर होणे अपेक्षित आहे.

ही चर्चा सुरळीत, समंजस आणि मुद्देसूद व्हावी ही आग्रहाची विनंती आहे. येथे व्यक्तिगत हल्ले केल्यास ताबडतोब असा मजकूर काढण्यात येईल आणि त्याची पुनरावृत्ती झाल्यास सदस्यांशी थेट संवाद साधून पुढील पावले उचलली जातील.

सहकार्याबद्दल धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०८:४९, ११ एप्रिल २०१८ (IST), प्रचालक, प्रशास[reply]

चर्चा संपादन

सतिश शेंडे संपादन

स्वता संपादित केलेला मजकूर तसेच स्वताच्या खात्रीशीर माहितीनुसार मजकूर याचा उल्लेख असावा. बराच मजकूर हा ई-बुक किंवा इतर ठिकाणाहून नकल-डकव केला असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करणेत यावा.

सदस्य:Satishsixteen (चर्चा) 00:45, 15 एप्रिल 2018 (IST)

सुबोध कुलकर्णी संपादन

नकल-डकव केलेल्या लेखांचा वेगळा वर्ग बनवावा. वेळोवेळी हे उल्लंघन शोधणे सजग संपादक करत राहतील, पण त्याला मर्यादा आहे.यासाठी काही उपकरण/साधन उपलब्ध आहे का? नसल्यास बनविता येईल का याचे तांत्रिक सदस्यांनी मार्गदर्शन करावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:२२, ११ एप्रिल २०१८ (IST)[reply]

इतर ठिकाणच्या मजकुराची नकल-डकव करून बरेच लेख बनवले गेले आहेत, किंवा बनवले जात आहेत याबद्दल कोणाचेही दुमत दिसत नाही. ज्या सजग संपादकांनी हे पुराव्यासहित निदर्शनास आणले ते अभिनंदनास पात्र आहेत. हा मजकूर प्रताधिकारित आहे की मुक्त आहे, याचा शोध कॉपीव्हायोच्या अहवालात दिलेल्या दुव्यावरून घेता येतो. यात विकिपीडिया व काही मुक्त संकेतस्थळे मुळातच वगळलेली आहेत. आता हा शोध कोणी घ्यायचा, त्या त्या संपादकाने की प्रचालकाने हे ठरवायला हवे. तसेच मजकूर काढून टाकण्याच्या बाबतीत जुन्या लेखांना एक नियम तर नवीन लेखांना दुसरा नियम लावणे न्याय्य होणार नाही. जुन्या लेखातील मजकूर बदलण्यासाठी थोडा जास्त अवधी द्यावा, म्हणजेच सूट द्यावी असे काहींना वाटू शकते. पण हे धोरण म्हणून उचित नाही असे वाटते. अशामुळे चुकीचे पायंडे पडू शकतात. माझा प्रस्ताव खालीलप्रमाणे –

  1. ८०% पेक्षा जास्त मजकूर शंकास्पद असेल तर चर्चेसाठी/तो बदलण्यासाठी दोन दिवस अवधी ठेवावा. त्यानंतर तो तसाच राहिला तर काढून टाकावा. संपादकांना इशारा देण्यात यावा. सलग तीन इशाऱ्यानंतर पुढची कारवाई प्रचालक करू शकतात.
  2. ८०% पेक्षा कमी मजकूर शंकास्पद असेल तर चर्चेसाठी/तो बदलण्यासाठी सात दिवस अवधी ठेवावा. त्यानंतर तो तसाच राहिला तर काढून टाकावा. संपादकांना इशारा देण्यात यावा. सलग तीन इशाऱ्यानंतर पुढची कारवाई प्रचालक करू शकतात.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:४२, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

Sureshkhole संपादन

नकल-डकव केलेल्या मजकूराबद्दल सध्या चर्चा सुरू झाली आहे याबद्दल आपले आभार चर्चा पुढे नेताना निम्नोक्त मुद्यांचा विचार व्हावा असे वाटते संपादन

सगळ्यात प्रथम ही धोरणे ठरवताना आपल्याला नकल-डकव चालवून घेणेच शक्य नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे, तांत्रिकपातळीवर आणि कायदे पातळीवर ते विकीच्या आणि भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अंतर्गत नकल-डकव हा गुऩाह आहे हे ध्यानात ठेऊन फ़ार-फ़ारतर आपण त्यावर कारवाई करण्याची वेळ वाढवू शकतो आणि त्यात जास्त पारदर्शीता आणू शकतो. नकल-डकव बाबत मला इंग्रजी विकीवरील धोरणे आपल्या समूदायाचा विचार करुन थोड्याफ़ार फ़रकाने लागू करणे शक्य आहे असे मला वाटते त्यामध्ये खालील बाबींचा समावेश होऊ शकतो.[१]

  • नकल-डकव मजकूर कुठल्याच विकीवर चालवून घेतला जात नाही, कारण त्यामुळे विकीच्या मुक्तस्त्रोत असण्याला बाधा निर्माण होते आणि विकीवर पर्यायाने ती संपादने करणाऱ्या सदस्यावर कोपीराईट कायद्यांचे उल्ल्ंघन केल्याचा आरोप आणि परिणामस्वरुप कारवाईसुध्दा केली जाऊ शकते. त्यामुळे इंग्रजी विकीवर याबाबत कडक नियम आणि ताबडतोब कारवाईअ केली जाते. त्याच मार्गाने आपल्याला मराठीमध्येही तेच धोरण लागू करणे आवश्यक राहिल. त्यामध्ये फ़क्त विहीत प्रक्रियेत जी वेळ मर्यादा इतर विकींवर पाळली जाते त्यापेक्षा जास्त वेळ मर्यादा आपण घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला घेता येईल.
  • इंग्रजी विकीवर नकल-डकव मजकूर सापडल्यास तो जर स्पष्टरित्या प्रताधिकार भंग आहे असे समोर आल्यास लक्षात येता क्षणी तो काढून टाकला जातो, एवढेच नव्हे तर त्या मजकूराचा इतिहासही काढून टाकला जातो.(RD2)[२]
  • नकल-डकव मजकूराबाबत शंका असतील काही काळापुरते तो झाकला जाऊन त्यावर चर्चा होऊन मग तो काढला जातो. पण ही प्रक्रिया सुध्दा तो लेख ज्या प्रकल्पाचा भाग आहे त्या प्रकल्पावर लक्ष देणारे लोक कटाक्षाने करत असतात. तरिसुध्दा फ़ारतर आठवडा भरात त्यावर निकाल होताना मी पाहिले आहे. इतर सदस्यांनी आपली मते ह्यावर द्यायला हरकत नाही.
  • मुळात कोपीव्हायो सारखी अवजारे मराठी फ़ारसी वापरली जात नव्हती, संदर्भ देण्य़ाची साधने आपल्याकडे नव्हती पण आता ही सर्व प्रकारची हळूहळू आपल्याकडे उपलब्ध होत असताना आपण कुठल्याच प्रकारची गय सदस्यांनी केलेल्या चुकीबाबत आपण न करता नकल-डकव मजकूराच्या प्रश्नाबाबता कडक कारवाई करायला हरकत नाहीये.
  • त्यामुळे साचा लावल्यावर, कोपीव्हायो साच्यामध्ये नकल-डकव प्रत्यक्ष सिध्द होते आणि समोर दिसते, त्यामुळे अश्या परिस्थीतीमध्ये तो मजकूर तातडीने काढून टाकला गेला जावा असे माझे मत अहे. शिवाय कोपीव्हायो नकल-डकवच्या शंकेची टक्केवारी दाखवतेच, ती शंका जर 50% पेक्षा जास्त असल्यास ताबडतोब तो मजकूर हटवण्यात यावा असे मला वाटते. उदाहरणादाखल, शिवकालीन शस्त्र भांडार असा लेख, जो अनअनुभवी सदस्यांनी केल्या असल्याने तो सबंध लेखच नकल-डकव आहे, अश्या नवोदित सदस्यांना एका बाजूला हे सांगणे की, प्रताधिकार भंग काय आहे? आणि दुसऱ्या बाजूला तो मजकूर लागलीच काढून टाकणे ह्या दोनींही बाबी तेव्हढ्याच महत्त्वाच्या आहेत असे मला वाटते.
  • 50% पेक्षा कमी शंका असलेल्या मजकूराला एक आठवडा चर्चेसाठी वाव दिला जाऊन मग त्यावर काहीच क्रिया सदस्यांकडून न झाल्यास प्रचालक/अनुभवी सदस्यांनी तो मजकूर हटवावा.
  • इंग्रजीवर नकल-डकव केल्याचा इतिहास असलेल्या सदस्यांना चौकशीला सामोरे जावे लागते ज्यामध्ये जर वारंवार त्यांच्याकडून असे केले गेल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. आणि आवश्यकतेनुसार त्यांना अवरुध्दही केले जाते. त्याच धर्तीवर आपण त्याबाबतची धोरणेही ठरवू शकतो, ज्यामध्ये वारंवार नकल-डकव केल्याचे ज्यांच्या बाबत लक्षात येईल त्यांच्यावर कारवाई केली जावी असेही मला वाटते.

त्यासाठी, पहिल्या 1 ते 3 नकल-डकव परिस्थींमध्ये त्या सदस्याला त्याच्या मुद्दाम किंवा नजरचुकीने झालेल्या नकल-डकव संपादनाबद्दल जाणिव करुन देणे आणि 3 ते 10 नकल-डकव संपादना पर्यंत मजकूराच्या आकारानुसार काही दिवसांपासून ते अनंत काळापर्यंत अवरुध्द करणे, हे धोरण आपल्यालाही थोड्या फ़ार फ़रकाने लागू करता येईल.

  • शिवाय इंग्रजीवर कोपीव्हायो क्लर्क नावाच्या खास अधिकार असलेल्या सदस्यांची सोय असते आपल्या मराठीसाठी अश्या काही अनुभवी सदस्यांचा विचार करुन त्यांना कोपीव्हायो क्लर्क म्हणून नेमता येऊ शकते.
  • सध्या मी केलेल्या शोधामध्ये मला जशी समोर येतील तश्या क्रमाने मी लेखांना हा कोपीव्हायोने तपासून नातूंनी नव्याने तयार केलेला साचा लावला आहे, परंतू पुढच्या वेळीपासून येणारा प्रत्येक लेख ह्या अवजाराखालूनच तपासूनच घेतला गेला पाहिजे असाही मी प्रस्ताव समोर ठेवत आहे. जे इतर विकींवर आवश्यक प्रक्रियेचा भाग म्हणून केलेच जाते.
  • सध्या सापडत असलेल्या मजकूराची व्याप्ती पहाता असा मजकूर मराठी विकीवर मोठ्याप्रमाणात अस्तित्त्वात आहे हे जरी समोर येत राहिले तरी मला त्यात समाधान आहे, कारण एकदा साचे लावले की त्यावर कधीतरी कारवाई करणे आवश्यक राहिलच.WikiSuresh (चर्चा) २०:३३, ११ एप्रिल २०१८ (IST)[reply]

प्रताधिकार भंग शंका साचा लावत असताना मला काही तांत्रिक बाबी समोर आल्या ज्यांतून खालील सूचना संपादन

  1. साचा लावताना तो लावल्याची तारिख त्यावर यावी आणि त्यानुसार त्या तारखेची यादी तयार होत राहावी असे मला वाटते जेणेकरुन त्याच्या पुढच्या कारवाईचा मार्ग सोपा होईल.
  1. - साचा लावल्यादिवशीचा उल्लेख असलेला वर्ग आपोआप लागेल. यापूर्वी लावलेल्या लेखांमध्ये हाताने असे वर्ग लावावे लागतील, उदा - बाबासाहेब आंबेडकर, केशव बळीराम हेडगेवार, इ.
  1. साचा लावताना त्याच्या नकल-डकवची टक्केवारी सुध्दा उल्लेखता यावी अशी सोय साच्यात करता आली तर उत्तमच.
  2. जर वारंवार एखाद्या सदस्याकडून नकल-डकव केले जात असेल तर त्या लेखकांच्या सदस्य पानावर किंवा कुठेतरी याची नोंद करत रहावे लागेल त्यातूनच नकल-डकव करणारे सदस्य शेवटी थांबवता येतील.

शेवटाकडे, लेखांच्या प्रतवारीचे धोरण जर लागलीच निर्माण झाले तर नकल-डकव आणि उल्लेखनीयता बाबतचे अनेक प्रश्न प्रतवारीमध्येच सुटतील. तेव्हा दरवेळी शाब्दीक चकमकींमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा जर, व्यवस्थात्मक पातळीवरच विकीच्या मानांकाच्या पालनाचा आग्रह धरल्यास, संदर्भ, उल्लेखनीयता, नकल-डकव हे सगळेच प्रश्न सुटायला सोपे होतील. इतरांची मते ऐकायला आवडेल. WikiSuresh (चर्चा) २०:३२, ११ एप्रिल २०१८ (IST)[reply]

  1. ^ "Wikipedia:Copyright violations". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2018-03-13.
  2. ^ "Wikipedia:Revision deletion". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2018-04-04.

Tiven2240 संपादन

Suresh यांनी इंग्लिश विकिपीडिया पासून व अनेक चांगले उपाय म्हणून वर नोंदले आहे. माझ्या मत देण्यास इच्छिते. नकल-डकव करणे योग्य नाही व सुरेश यांनी खूप मेहनत घेतली आहे त्याला साच्यात लापावण्यास. सद्या काहीही लेखातील मजकूर काढले नाही असे वाटते की ३ दिवस बस आहेत त्याला काढण्यास. प्रचालक याचे revision delition करावे जसे सुरेश यांनी सांगितले. एखाद्या पानावर जर नकल-डकव चालू असेल तर आपल्याला २ कामे करायला सुरुवात करावी लागेल एक म्हणजे लेखाचे सुरक्षा पातळी वाढवणे (Pending changes protection) व (reviewer user right)(ज्याची कौल घेण्यात आली होती (स्रोत)). सद्या याची गरज वाटत नाही कारण नकल-डकव जास्त प्रमाणात दिसत नाही. माझ्या मते सद्या असे कुठल्याही bot, userscript उपलब्ध नाही जे नकल-डकव आपोआप शोधू शकते फक्त earwing copyvio detector वापरून याची माहिती मिळू शकते. साचा नवीन तयार करण्यात येऊ शकते. एक नवीन जलद पृष्ठ हटविणे साचा व एक झाकवण्यास साचा ({{प्रताधिकारित मजकूर शंका}}) वापरून आपण यावर काम सुरू करू शकतो. नकल-डकवची टक्केवारी सुध्दा त्यात येऊ शकते परंतु ते आपोआप नाही तर मॅन्युअल करिकेने करू शकतो.

प्रचालकांच्या चावडीवर एक नवीन पान बनवून त्यात आपण नकल-डकव करण्याऱ्या सदस्याची नोंद व त्याला २ वॉर्निंग देऊया. जर तरीही ते सुदरतात नाही त्यावर २ महिने अवरोधित करूया. सदस्यांचे चर्चापानावर सूचित सुद्धा केले पाहिजे.

जर आपण हे अगदी सखोलपणे हाताळायचे असेल तर आपल्याला एक नवीन सदस्य अधिकार (eliminator) तयार करणे आवश्यक वाटते. याची सुद्धा कौल घेतली होती. hi:विकिपीडिया:उत्पात नियंत्रक यात सुद्धा असा अधिकार आहे आवश्यक असेल तर यावर सुध्दा चर्चा करूया. इतरांची मते ऐकायला आवडेल.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:३१, १२ एप्रिल २०१८ (IST)[reply]


@Tiven2240: सध्या ज्या प्रमाणात आणि ज्या लेखांमध्ये प्रताधिकार भंग मजकूर सापडला आहे त्यानुसार माझ्या मते अगदी 25 ते 30% लेख असे असतील की ज्यांमध्ये प्रताधिकार भंग सापडेल. आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की आतापर्यंत प्रताधिकार भंगासाठी कोणी कारवाईच केलेली नाहीये. त्यामुळे ह्या वर आपण जेव्हढ्या तातडीने आणि मोठ्या प्रमाणात काम करु तेव्हढे चांगले राहिल. शिवाय माझ्या आत्ताच्या तपासामध्येच सतत म्हणजे दहा पेक्षा जास्त वेळा प्रताधिकार भंग केलेले आणि फ़क्त प्रताधिकार भंगाद्वारेच आपली संपादने करणारे असे 4/5 सदस्य सापडले आहेत. त्यामुळे मला वाटते अश्या मजकूराचे प्रमाण आपल्या 50 ह्जार लेखांमध्ये मोठ्या प्रमाणावर असणार आहे. WikiSuresh (चर्चा) १६:४४, १२ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Tiven2240, अभय नातू, सुबोध कुलकर्णी, संदेश हिवाळे, आणि आर्या जोशी: @संतोष दहिवळ, Sankalpdravid, सुभाष राऊत, Kaustubh, Rahuldeshmukh101, Abhijitsathe, आणि : यांनीही आपली मते तसेच सुचना/सुधारणा/विरोध नोंदवावा जेणेकरुन ह्या चर्चेला धोरणाचे स्वरुप लवकरात लवकर देण्याकडे जाता येईल. सर्वच लेखांकडे लेखांच्या प्रतवारीसाठी, नकल-डकवसाठी, तपासण्याची गरज आहे असे मला वाटते त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे जर हे धोरण ठरवले व त्यावर काम केले तरच ते पुढे नेणे सुकर होईल. WikiSuresh (चर्चा) ११:१२, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

चर्चेच्या संदर्भात मी प्रताधिकार उल्लंघन शोधक नावाचे सदस्य स्क्रिप्ट तयार केले आहे. हे स्क्रिप्ट प्रताधिकार भंग शोधण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:३७, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

Pushkar Ekbote संपादन

प्रताधिकार भंग गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा आहे ज्याच्याबद्दल गुन्हा करणाऱ्यास प्रताधिकार कायदा, १९५७ कलम ६५बCopyright Act, 1957 अन्वये २ वर्षे कारावास आणि दंड यांची तरतूद आहे. ज्या संस्थेकडून या पद्धतीचा गुन्हा घडला असेल त्या संस्थेच्या तत्सबंधी जबाबदार व्यक्तीस (आपल्या संदर्भात प्रचालक) देखील शिक्षेची तरतूद प्रताधिकार कायदा, १९५७ कलम ६९ उपकलम (१) आणि (२) मध्ये करण्यात आली आहे. प्रताधिकार नियमावली, २०१३Copyright Rules 2013 अन्वये अशा पद्धतीचा गुन्ह्यात विकिमिडीया फाउंडेशनला नोटीस बजावत येऊ शकते. विकिपीडिया क्रिएटिव्ह कॉमन्स अनुज्ञप्ती वापरात असल्यामुळे त्यावरील मजकूर जर आधीच प्रताधिकारीत असेल तर नोटीस बजावली जाऊ शकेल. तसेच विकिमिडीया फाउंडेशन सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे त्यामुळे अशा मजकुराला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील प्रताधिकार कायदा, १९७८Copyright Act, 1978 (USA) अन्वये गुन्हा मानता येऊ शकते. विकिपीडियाला याबाबत कल्पना आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या इंग्रजीतील धोरणांमध्ये तसा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणून मराठी विकिपीडियावर नकल-डकव धोरणे कोणीही अडचणीत येण्यापूर्वी लवकरात लवकर लागू करणे अत्यावश्यक आहे. --Pushkar Ekbote (चर्चा) १३:५४, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

आर्या जोशी संपादन

नमस्कार! सदर मुद्दा महत्वाचा आहे.यावर आलेली मते पाहिली व वाचली आहेत.प्रचालकांनी असे स्वतंत्र पान तयार करावे व त्यावर अशी यादी जाहीर करावी व त्या त्या संपादकांना तसा संदेश जावा असे योग्य वाटते.तांत्रिक विषयात मी तज्ज्ञ नाही.पण अशा मजकुरातील भाग सुधारायचा असेल व स्वभाषेत विकीकरणाला अनुसरुन काम करायचे असेल तर त्यासाठीचे दायित्व घ्यायला मला आवडेल.मी सहकार्य करेन अशा लेखांसाठी.धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १४:०३, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

संदेश हिवाळे संपादन

मराठी विकिपीडियावर नकल-डकव केलेल्या मजकूराबद्दल तसेच प्रताधिकार व त्यांचे रक्षण करण्याबद्दलची येथील चर्चा महत्त्वपूर्ण आहे. सुरेश खोलेंनी ही चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नकल-डकव मजकूराला बदलने किंवा हटवणे हे दोन प्राथमिक पर्याय सदस्यांकडे असतात. सक्रिय सदस्यांपैकी नकल-डवक कुणी केले असेल तर तो सदस्य ते बदलेलही मात्र ज्या लेखाला कुणी वाली (निर्माणक) नाही, त्यावर कोण काम करणार? याचेही नियोजन करावे लागेल. आणि ३०% पेक्षा जास्त लेखात ही समस्या असू शकते. सुरेश खोलेंनी नातूंना या विषयीच्या प्रश्नांची मोठी यादी बनवली होती, त्याचे नियोजन केल्यास याबाबत काम करण्याची आपल्या सर्वांना योग्य दिशा मिळू शकते. कॉपीपेस्ट मजकूर लेखात नसावाच, मात्र तो झटपट हटवावा इतके मनुष्यबळ आपल्याकडे वाटत नाही. याने विकिपीडियावरील अनेक लेख रिकामे होऊ शकतात, व त्याला विस्तार करणारेही कुणी मिळणार नाही. म्हणून माझे असे प्राथमिक मत आहे की, कॉपीपेस्ट मजकूर हटवण्यापेक्षा त्यात बदल करणे योग्य राहिल. बाकी बहुमताने स्वीकारलेला निर्णय मला मान्य असेल.--संदेश हिवाळेचर्चा १९:१८, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

अभय नातू संपादन

आत्तापर्यंची चर्चा आणि पावले -

  • प्रताधिकारभंग होऊ न देणे आणि झाल्यास त्यावर लगेचच कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
  • प्रताधिकारभंग झालेला कळावा यासाठी आता आपल्याकडे साधन आहे (कॉपीव्हायो आणि इतर)
  • यावर उपाय करण्यासाठीचे धोरण आपण आखतो आहोत.
  • नवीन लेखांची कॉपीव्हायोतून पडताळणी करावी
  • प्रताधिकारित मजकूर शक्य तितक्या लवकर काढण्यासाठी -
  • शंका असलेला मजकूर टॅग करता यावा. यासाठी {{प्रताधिकारित मजकूर शंका}} हा साचा तयार केलेला आहे.
  • वरील चर्चेनुसार जर मूळ लेखकाचे किंवा इतरांचे उत्तर न आल्यास किंवा असा मजकूर बदलला न गेल्यास ३ दिवसांत असा मजकूर काढावा.
  • येथे ध्यानात ठेवण्याची गोष्ट आहे की आंतरजालावर विकिपीडियावरुन नकल-डकव करणारी डझनावारी (शेकडो?) संकेतस्थळे आहेत. अनेक वृत्तपत्रेही थेट मजकूर चोरतात. विकिपीडियावरील मजकूर मुक्त असल्यामुळे असे करण्यास कायदेशीर प्रतिबंध नाही. असा येथून उचलेला मजकूर जर कॉपीव्हायोमध्ये दिसत असेल तर तो प्रताधिकारभंग ठरत नाही. यासाठी विकिपीडियावरील मजकूराची तारीख आणि इतरत्र असलेल्या मजकूराची तारीख पाहणे आवश्यक आहे.
  • अशा संकेतस्थळांवर मराठी विकिपीडियातून मजकूर उचलल्याचा उल्लेख नसल्यास तेथे सूचना करावी.
  • जाणतेपणाने प्रताधिकारभंग करणाऱ्या सदस्यास ताकीद द्यावी
  • ताकीद देउनही पुन्हापुन्हा प्रताधिकारभंग केल्यास सदस्याला काही काळाकरिता अवरुद्ध करावे.
  • अवरुद्धता काळ लोटल्यावर पुन्हा असे झाल्यास सदस्याला कायमचे बॅन करावे.
अजून तीन दिवस (सोमवारपर्यंत) ही चर्चा संपवून धोरण आखणे सुरू होईल.
अभय नातू (चर्चा) २०:०९, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

नंदन हेर्लेकर'

अभय नातू यांनी म्हटल्यप्रमाणे विकीपिडियातला मजकुर सर्वत्र उचलला जातो, पण त्याची नोंद केली जात नाही. ते उचल्या ना कळणे जरुरीचे आहे. काही महत्वाच्या विषयांवर लिहायचे तर पूर्वसुरीनी केलेल्या अभ्यासाचे बोट धरुनच पुढे जावे लागते. त्यात आपण नवे काहीच करत नसतो. असा मजकुर यातल्या जाणकारानी लक्षात घ्यावा अशी आग्रहाची विनंति आहे. तिथे काँपीपेस्ट होत असते का ते पाहणे जरुरीचे आहे.


चर्चा स्थगिती संपादन

@Sureshkhole, प्रसाद साळवे, आणि संदेश हिवाळे:,

अरे काय लावलंय काय? एकमेकांच्या उरावर बसून विकीपीडिया लिहिणार आहात का?

वरचे उतारे वाचून असे वाटते आहे की ही चर्चा नको त्या थराला गेलेली आहे आणि त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही आहे.

अस असता या पानावरील चर्चा २४ तास स्थगित करण्यात येत आहे. इतर पानांवर एकमेकांवर व्यक्तिगत हल्ले/आरोप झाले तर सदस्यांना अवरुद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

थोडा दम खा. आपण येथे काय करतोय याची उजळणी करा. हे करताना आपले व्यक्तिगत बायस येथे आणतो आहोत का हे तपासा. मग पु्न्हा चर्चा करा.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २२:४१, १७ एप्रिल २०१८ (IST) ; प्रचालक[reply]

@अभय नातू: आपण जर या धोरणाला अंतिम रूप दिले तर चांगले होईल --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २०:०६, २५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

हे पहा - विकिपीडिया:नकल-डकव धोरणे

  1. ^ K.S., Challam (2008-10-16). Modernization and Dalit Education: Ambedkar's Vision (English भाषेत) (2008 edition ed.). Jaipur: Rawat Pubns. ISBN 9788131601921.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: extra text (link)
  2. ^ Ambedkar, B. R. (2011-01-11). The Buddha and His Dhamma: A Critical Edition (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780199088287.