सदस्य:QueerEcofeminist/सायटोईड धूळपाटी

(सदस्य:Sureshkhole/सायटोईड धूळपाटी या पानावरून पुनर्निर्देशित)

जेव्हा तुम्ही एखादा लिहीत असाल तेव्हा त्या लेखामध्ये संदर्भ जोडण्यासाठी तुम्हांला सायटोईड नावाच्या अवजाराचा उपयोग करता येणार आहे. आपल्या विकीवर ते नव्यानेच जोडण्यात आलेले आहे. आणि त्याच्या सहाय्याने आपण संदर्भ स्वत:च अगदी सोप्या पध्दतीने जोडू शकाल. आता संदर्भ जोडण्यासाठी भलामोठा विकीकोड लिहायची गरज नाही.

आपण कुठल्याही लेखाच्या वरच्या बाजूला जिथे "संपादन" असे लिहीले आहे तिथे टिचकी मारल्यावर तुम्हांला संपादनाची खिडकी उघडल्याचे दिसेल.

त्याच्या वरच्या बाजूला अशी वेगवेगळी बटणे दिसतील, ज्यांचे वेगवेगळे उपयोग आपण संपादना साठी करतो.

संपादनाची खिडकी
संदर्भ जोडाचे बटण

यातील,  

संदर्भ देण्यासाठी आपल्याला ज्या वाक्याच्या शेवटी किंवा शब्दाच्या शेवटी संदर्भ जोडायचा आहे तेथे कर्सर नेऊन  “संदर्भ जोडा हे बटण दाबायचे आहे. ते दाबल्यावर संदर्भाचा क्रमांक दिला जाऊन त्या क्रमांकाची एक नविन खिडकी उघडेल ज्यामध्ये तीन पर्याय आहेत.

"संदर्भ जोडा हे बटण दाबल्यावर दिसणारी खिडकी

1)‌ स्वयंचलित – हा पर्याय आपणांला इंटरनेटवरून जर संदर्भ द्यायचा असेल तर वापरता येतो. यासाठी फ़क्त ज्या पुस्तकाचा, पत्रिका/ शोधनिबंधाचा, बातमीचा किंवा संकेतस्थळाचा संदर्भ द्यायचा आहे त्याचा दुवा दिलेल्या रिकाम्या जागेत भरला आणि संदर्भ तयार करा हे बटण दाबले की, संदर्भ आपोआपच तयार होतो. तयार झालेला संदर्भ आपण समाविष्ट करा हे बटण दाबल्यास मजकूरात जोडला जाईल.  कधी-कधी अश्या प्रकारे तयार केलेल्या संदर्भामध्ये आपल्याल काही माहिती जोडाविशी वाटु शकते जसे की, पुस्तकाच्या संदर्भात पान क्रमांक, किंवा संकेतस्थळाच्या संदर्भात लेखाचे नाव/लेखकाचे नाव इ. ती माहिती आपण समाविष्ट करा हे बटण दाबल्यानंतर किंवा संदर्भाच्या क्रमांकावर टिचकी मारल्यावर उघडणाऱ्या खिडकी मध्ये दिसणारे संपादन बटण दाबून उघडणाऱ्या रिकाम्या जागा भरा खिडकीमध्ये आपल्याला भरता येऊ शकते.   

स्वत: भरा हा पर्याय

2) स्वत: भरा - हा पर्याय आपणांला जर संदर्भ स्वत: भरायचा असेल तर, बहुतांश मराठी पुस्तके किंवा इतर स्त्रोत यांचे उल्लेख इंटरनेटवर सापडणे कठीण असू शकते. त्या पुस्तकांचा/स्त्रोतांचा संदर्भ देताना तुम्ही हा पर्याय वापरू शकाल.  तुम्हांला जो संदर्भ द्यायचा आहे त्याचा प्रकार म्हणजेच पुस्तक, बातमी, संकेतस्थळ किंवा पत्रिका/संशोधन निबंध या पैंकी जो प्रकार असेल तो निवडून त्यावर टिचकी मारायची आहे. त्यानंतर आवश्यक त्या(या मध्ये पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशन दिनांक, प्रकाशन संस्थेचे नाव आणि संदर्भाचा पान क्रमांक ही माहिती आवश्यक आहे) रिकाम्या जागा भरून समाविष्ट करा हे बटण दाबले की संदर्भ जोडला जातो.  

पुन्हा वापरा हा पर्याय

3) पुन्हा वापरा - पर्याय 1 किंवा 2 ने आधीच दिलेल्या संदर्भांचा परत वापर करायचा असेल तर या पर्यायावर जाऊन आपल्याला खाली दिसणाऱ्या यादी मधून हवा तो संदर्भ फ़क्त निवडायचा आहे आणि त्या संदर्भावर टिचकी मारताच तो संदर्भ मजकूराला जोडला जाईल.   

आता तुम्हांला फ़क्त पानाच्या शेवटी संदर्भ असा शे् थळ्यामध्ये लिहायचे आहे की त्या खाली आपोआपच संदर्भांची यादी तयार होईल.्