विकिपीडिया:ग्राह्य आणि अग्राह्य संदर्भ

सुरेश खोले

संपादन

प्रत्येक विधानाला वैध संदर्भ देणे विकी विश्वकोशात आवश्यक असते. त्यामुळे कोणते संदर्भ ग्राह्य आहेत आणि कोणते अग्राह्य आहेत याची चर्चा मी खाली सुरू केली आहे. यावर इतरांनी आपले मत मांडावे म्हणजे हे ही धोरण पुर्णत्त्वाकडे नेता येईल.

ग्राह्य संदर्भ

संपादन
  • विकीवर, जे सिध्द करता येतात असे आणि इतरांनी मानांकित केलेले आहेत, त्यामध्ये संशोधन निबंध, नामांकित प्रकाशनांची पुस्तके, बातम्या देणारी नामांकित संकेतस्थळे, संस्थांची मुखपत्रे असलेली संकेतस्थळे/वर्तमानपत्रे. असे जेजे काही नामांकित प्रकाशनांद्वारे प्रकाशित केले जाते आणि जे इतरांनी दुजोरा दिलेले असते असे सगळे प्रकाशित साहित्य संदर्भाला घेतले जाऊ शकते.
  • बातम्यांचे व्हिडीओ संदर्भाला चालु शकतील.
  • ऐतिहासिक बाबतीत असणाऱ्या लेखांना ऐतिहासिक विषय हाताळणाऱ्या पुस्तके व शोधनिबंधांचा संदर्भ दिला जाऊ शकेल.

अग्राह्य संदर्भ

संपादन
  • युट्युब व्हिडीयो संदर्भ म्हणुन दिले जाऊ शकत नाहीत, कारण तिथे कुणीही आणि कश्याही स्वरुपात व्हिडीयो टाकू शकते. फ़क्त एखाद्या नामांकित संस्थेच्या युट्युब चेनेलचे संदर्भ दिले जाऊ शकतात.
  • ब्लॉगचे संदर्भ, खाजगी संकेतस्थळांचे, एकांगी विचारांचे समर्थन करणाऱ्या संस्थांच्या संकेतस्थळांचे संदर्भ.
  • इंग्रजी विकीचा किंवा इतर विकीप्रकल्पांचे लेख इथे संदर्भ म्हणून.
  • संस्थाकडून चालवली जाणारी ब्लॉगसदृश्य संकेतस्थळे ज्यांच्यांवर मजकूराची तपासणीची काहीही व्यवस्था नाही अशा सर्व संकेतस्थळांचे संदर्भ.(marathiworld.com, manogat, marathimati, etc)

WikiSuresh (चर्चा) १९:३०, १७ एप्रिल २०१८ (IST)[reply]

अभय नातू

संपादन
  • इंग्लिश किंवा इतर विकिप्रकल्पांतील लेखांचा संदर्भ देऊ नये परंतु त्यातील संदर्भ वापरुन मराठी विकिपीडियावर केलेले लिखाण ग्राह्य आहे.