विकिपीडिया:नकल-डकव धोरणे

मराठी विकिपीडियावर इतर स्रोतांतून नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केलेला मजकूर चालत नाही.

असे करणे बव्हंश वेळा प्रताधिकारभंग ठरतो आणि यावर कायद्याने कारवाई होऊ शकते.

नकल-डकव सापडल्यास काय केले जाईल

  1. नकल-डकव सिद्ध झाल्यास असा मजकूर कोणताही संदेश दिल्याशिवाय लगेचच वगळला जातो.
  2. नकल-डकव करणाऱ्या सदस्यास असे न करण्याबाबत संदेश दिला जातो. या सदस्याने नकल-डकव केल्याची नोंद वेगळ्या पानावर केली जाईल. या पानावर फक्त प्रचालक बदल करू शकतात.
  1. दोन वेळा ताकीद दिल्यावरही पुन्हा नकल-डकव केल्यास सदस्याला मराठी विकिपीडियावरुन किमान ७ दिवस तडीपार केले जाईल. नेमकी मुदत प्रचालकांचा निर्णय असेल.
  2. तडीपार सदस्यांनी इतर प्रकारे (उदा. पाळीव खाते वापरुन अथवा नवीन खाते तयार करुन) नकल-डकव सुरू केल्यास इतर उपाय योजले जातील.

नकल-डकव कशी शोधावी

  • विकिमीडिया लॅबने तयार केलेले कॉपीव्हायो नावाचे संयोजन आंतरजालावरील नकल-डकव लगेच आणि सोप्या पद्धतीने शोधून काढते - https://tools.wmflabs.org/copyvios/
  • पुस्तके, नियतकालिके आणि स्रोत आंतरजालावर नसलेली नकल-डकव सापडल्यास {{प्रताधिकारित मजकूर शंका}} हा साचा अशा लेखांमध्ये लावावा.