वंजारी

(वंजारी समाज या पानावरून पुनर्निर्देशित)

वंजारी ही भारतातील हिंदू धर्मातील एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती-(ड) (NT-D म्हणजेच NT-3) मधे वर्गीकृत आहे. यवन आक्रमकांच्या त्रासाला कंटाळून इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्थान मधून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेल्या विविध ३० (तीस) क्षत्रिय जाती जमाती पैकी ही एक जात होय. हा समाज ईशान्य भारत सोडून भारतातील सर्वच राज्यांत कमी जास्त लोकसंख्येत आढळतो. महाराष्ट्र राज्या बाहेरील वंजारी समाजाला तेथिल भाषेतील विविधते मुळे वंजारा, वंजरी संबोधले जाते. स्व. गणपत पांडुरंग संखे यांच्या महाराष्ट्र सरकार विरुद्ध मुंबई उच्च न्यायालया मधील प्रदीर्घ लढ्यामुळे [] वंजारी समाज OBC मधून (NT-3) म्हणजेच (NT-D) मधे वर्गीकृत केला गेला.

उत्पत्ती

वंजारी समाजाची उत्पत्ती ही रेणुका देवीच्या सन्तानींपासून झाली असे मानल्या जाते. रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे: वशूमंत, वस्तू, सूशौन, विश्ववस्तू व परशूराम हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषींना अनुक्रमे रघुपती, अधिपती, कानुपती आणि सुभानुपती हे पुत्र झाले.
यातील रघुपती पासून १) रावजीन,
अधिपती पासून २) लाडजीन,
कानिपती पासून ३) मथुरजन आणि
सुभानुपती पासून ४) भूसारजीन
अशा क्रमवार चार शाखांची उत्पत्ती झाली. आज या चारही शाखा एक आहेत व वंजारी म्हणून परिचित आहेत.[]

परंपरागत पूर्वीचा व्यवसाय

राजस्तान मध्ये वंजारी समाज हा महाराणा प्रतापसिंघ यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता. श्री भल्लसिंघ वंजारी व श्री फत्तेसिंघ वंजारी हे महाराणा प्रतापसिंघचे प्रधान सेनापती होते. त्यांच्या समाधी आजही उदयपूर राजस्तान मध्ये आहे.राजस्थानात असतांना हा समाज कडवा लढवय्या क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता. आजही राजस्थानात हा समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यवन आक्रमणांमुळे त्रस्त होऊन दक्षिणे कडे स्थलांतरित झाला. आणि व्यापार उदीम करू लागला. दळणवळण साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून मालवाहतुक/मालपुरवठा करण्याचे काम वंजारी समाज करत असे. महाराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वंजारी होते.पूर्वीच्या काळी वंजारी समाज मालवाहतूकीसह व्यापारही करत असे.

वंशज

वंजारी हे वीर असुन ते महाराणा प्रताप यांच्या सैनिक होते. महाराणा प्रताप यांचे सैनापती मल्ला हे जातीचे वंजारी होते.

आजची स्थिती

आज महाराष्ट्रातील मुठभर गर्भश्रीमंत लोक सरकारी अधिकारी कर्मचारी व्यावसायिक सोडले तर वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे.

चार पोटजातीत विभागलेला हा वंजारी समाज संत श्री भगवानबाबा (भगवानगड, ता पाथर्डी जी अहमदनगर) व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रयत्‍नांमुळे संघटित झाला आहे.या महापुरुषन मुळे आज संपूर्ण वंजारी समाज एक झाला आहे. व येणाऱ्या काळात संपूर्णन भारतभरात असलेला वंजारी समाज एक होताना दिसत आहे. मुंडे यांना वंजारी समाज नेता मानतो. [][].

व्यक्तिमत्त्वे

संत

कीर्तनकार व प्रवचनकार

राजकारणी


इतर

नाट्यकर्मी

लोककलावंत

सामाजिक संघटना

संदर्भ

  1. ^ "गणपत पांडुरंग संखे विरुद्ध महाराष्ट्र शासन" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ (ग्रंथ- वनजारी बनजारी भाग-१, लेखक- पांडुरंग कचेश्वर आंधळे, भाषा- मराठी, प्रकाशक- सुरकिर्ती प्रकाशन नाशिक-४२२००१, दिनांक- ३१ डिसेंबर १९९९)
  3. ^ "वंजारी समाजाच्या आमदारांचा आज ठाण्यात सत्कार[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper,Marathi News Paper in Mumbai". www.loksatta.com. 2018-03-20 रोजी पाहिले.
  5. ^ "संत आवजीनाथ महाराज".
  6. ^ "वंजारी संत - भगवान बाबा". ४ मार्च २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जुलै २०१२ रोजी पाहिले.
  7. ^ "जी. पी. संखे यांच्या निधनाने वंजारी समाजाची प्रचंड हानी". 2018-09-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-30 रोजी पाहिले.
  8. ^ "आज आद्य क्रांतिकारक धर्माजी मुंडे पुण्यतिथी". ३१ जुलै २०१२ रोजी पाहिले. line feed character in |दिनांक= at position 13 (सहाय्य)[permanent dead link]