धनंजय मुंडे
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
धनंजय पंडितराव मुंडे (जन्म १५ जुलै १९७५) हे एक मराठी राजकारणी व सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ] यापूर्वी ते महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते.[ संदर्भ हवा ]
धनंजय मुंडे | |
मंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
मागील | सुरेश खाडे |
---|---|
मतदारसंघ | परळी, महाराष्ट्र विधानसभा |
जन्म | १५ जुलै, १९७५ परळी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | • भारतीय जनता पक्ष (१९९४ ते २००९) • राष्ट्रवादी काँग्रेस (२००९ पासून पुढे) |
वडील | पंडितराव मुंडे |
पत्नी | राजश्री मुंडे |
नाते | • गोपीनाथ मुंडे (काका) • पंकजा मुंडे-पालवे (बहीण) • प्रीतम मुंडे-खाडे (बहीण) |
अपत्ये | ४ |
शिक्षण | बॅचलर ऑफ सोशल लॉ |
गुरुकुल | सिम्बॉयसीस कॉलेज पुणे |
व्यवसाय | राजकारणी, वकील, सामाजिक कार्यकर्ता |
धर्म | हिंदू |
संकेतस्थळ | www |
वैयक्तिक जीवन आणि शिक्षणसंपादन करा
मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ला नाथ्रा, परळी वैजनाथ, बीड येथे वंजारी कुटुंबात झाला.[१] त्यांच्या कुटुंबात त्यांची आई रुख्मिणी मुंडे, पत्नी राजश्री मुंडे आणि मुलगी आदिश्री मुंडे आहेत.[ संदर्भ हवा ] मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले.[ संदर्भ हवा ] तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसीस कॉलेज पुणे येथून झाले आहे.[ संदर्भ हवा ] त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे.[२]
बलात्काराचे आरोपसंपादन करा
२०२१ मध्ये त्यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेकडून बलात्काराचे आरोप करण्यात आले होते, नंतर ते आरोप मागे घेण्यात आले.[३] रेणू शर्मा यांची बहिण करुणा शर्मा यांच्यासोबत आपले परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंध होते, करुणा शर्मा पासून त्यांना दोन मुले असल्याचे मुंडे यांनी मान्य केले आहे.[४]
राजकारणसंपादन करा
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले.[ संदर्भ हवा ] सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते.[ संदर्भ हवा ] त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले.[ संदर्भ हवा ]
पुरस्कारसंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ^ "आजचा वाढदिवस - धनंजय मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री". 2021-01-31 रोजी पाहिले.
- ^ "Cousins collide". The Week (इंग्रजी भाषेत). 2021-01-16 रोजी पाहिले.
- ^ ""बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करा"". Loksatta. 2021-01-22. 2021-01-31 रोजी पाहिले.
- ^ Jan 15, Written bySagarika ChoudharySagarika Choudhary / Updated:; 2021; Ist, 06:43. "Singer Renu Sharma accuses Dhananjay Munde of rape; minister calls it blackmail". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2021-01-31 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "धनंजय मुंडे यांना सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार". 2021-01-31 रोजी पाहिले.
- ^ "Dhananjay Munde | Rewarded as Powerful Politician | Lokmat Maharashtrian Of the Year Award 2018 - YouTube". www.youtube.com. 2021-01-31 रोजी पाहिले.