पंकजा मुंडे

भाजपा नेत्या
(पंकजा पालवे या पानावरून पुनर्निर्देशित)

पंकजा मुंडे-पालवे (२६ जुलै, - हयात) ह्या मराठी राजकारणी आहेत. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभेत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे त्या २०१९ ऑक्टोबरपर्यंत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होत्या. []

पंकजा मुंडे-पालवे

आमदार
विद्यमान
पदग्रहण
ऑक्टोबर इ.स. २००९
मागील गोपीनाथ मुंडे
मतदारसंघ परळी विधानसभा मतदारसंघ

जन्म २६ जुलै
परळी, जिल्हा-बीड
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती चारुदत्त ऊर्फ अमित पालवे
निवास परळी: यशश्री, परळी, तालुका परळी, जिल्हा-बीड
पुणे:फ्लॅट नं. ४०२, चौथा मजला, सीटी टॉवर, ढोले-पाटील मार्ग, पुणे
मुंबई:१५, शुभदा, सर पोचखानवाला रोड, वरळी,मुंबई

राजकीय महत्त्वाकांक्षा

संपादन

पंकजा मुंडेंनी निवडून आल्या आल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला. पण भाजपच्या धुरीणांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यांना त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हार मिळाली.

पंकजा मुंडे यांच्यावरील राजकीय आरोप व आक्षेप

संपादन
  • पंकजा मुंडे यांनी शाळांकरता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचे आरोप झाले.
  • शनी शिंगणापूरला चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश न देण्याची प्रथा चालू ठेवावी असे पंकजा मुंडे यांचे मत होते.
  • दुष्काळाताही मराठवाड्यातील दारू कारखान्यांचा पाणी पुरवठा अविरत रहावा हा पंकजा मुंडे यांचा आदेश स्वार्थाने प्रेरित आहे अशी टीका केल्या गेली.
  • पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाची घरपोच आहार देण्याच्या योजनेसाठी काढलेली ६,३०० कोटी रुपयांची निविदा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवली.
  • जलसंवर्धन खाते काढून घेतल्यावर बँकॅक येथे त्या विषयावर होणाऱ्या जागतिक पाणी परिषदेला न जाण्याच्या त्यांनी ट्विटरवर उपस्थित केलेल्या निश्चयाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कडक प्रत्युत्तर दिले. ट्विटरवरच्या दोघांच्या या जाहीर संवादाबद्दल केंद्र शासनाने आपली नाराजी व्यक्त केली.
  • शेतकऱ्यांचे २ कोटी ४२ लाख रुपये थकविल्याबद्दल पंकजा मुंडे यांच्या वैजनाथ साखर कारखान्याचा गाळप परवाना रद्द झाला आहे. पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या लातूर व जालना जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचे गाळप परवानेही रद्द करण्यात आहेत.
  • जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांचे ऑनलाईन बदली धोरण पंकजा मुंडे यांनी ग्रामीण विकास मंत्री असताना यशस्वी पणे राबविले.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "चक्रव्यूहात गोपीनाथराव!". 2012-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन