डॉ. कैलास रायभान दौंड (जन्म : १ जून, १९७३) हे मराठी भाषिक कवी आणि कादंबरीकार आहेत.

कैलास दौंड
जन्म नाव कैलास रायभान दौंड
जन्म १ जून, १९७३
सोनोशी , ता.पाथर्डी , जिल्हा अहमदनगर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र शिक्षण, साहित्यक्षेत्र
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, कादंबरी, ललित गद्य
प्रसिद्ध साहित्यकृती कापूसकाळ, तुडवण, अंधाराचा गाव माझा, तऱ्होळीचं पाणी, पाणधुई, उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा , एका सुगीची अखेर, माझे गाणे आनंदाचे, आगंतुकाची स्वगते ,जाणिवांची फुले , आई,मी पुस्तक होईन.
वडील रायभान
आई प्रयागा
पत्नी मिराबाई
अपत्ये विशाखा, प्रभंजन

कैलास दौंड यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील सोनोशी या गावी झाला.[ संदर्भ हवा ] त्यांचे बालपण व नंतरचा काळही खेड्यातच व्यतीत झालेला असल्याने शेती, शेतकरी, माती, निसर्ग याचा त्यांना विशेष लळा, कळवळा आणि ओढ आहे. त्यांच्या लेखनातून सतत याचा प्रत्यय येतो. कैलास दौंड यांचे प्राथमिक शिक्षण भुतेटाकळी व सोनोशी या गावी, तर माध्यमिक शिक्षण येळी या गावी झाले.[ संदर्भ हवा ] नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथून डी.एड. आणि पुसद (यवतमाळ) येथून बी.एडचे शिक्षण घेतले व पुणे विद्यापीठातून बहिःस्थ शिक्षण घेऊन त्यांनी बी.ए. व एम.ए. या पदव्या प्राप्त केल्या.[ संदर्भ हवा ] त्यानंतर त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद येथून 'मराठी ग्रामीण कादंबरीचा चिकित्सक अभ्यास (कालखंड २००० ते २०१०)' या विषयावर संशोधन करून, प्रा. दत्तात्रय प्रभाकर डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही पदवी संपादन केली.[ संदर्भ हवा ] (जुलै २०१५) तसेच प्राध्यापकपदासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षेतही (NET) ते उत्तीर्ण झाले आहेत.[ संदर्भ हवा ] पुणे विद्यापीठाच्या बहिशाःल शिक्षण मंडळाचे ते व्याख्याते आहेत.[ संदर्भ हवा ]

कैलास दौंड ह्यांनी १९९२पासून मांडवणे (ता. कर्जत जि. रायगड), नागापूरवाडी (ता. संगमनेर जि. अहमदनगर), हातगाव (ता. शेवगाव), शिंगोरी (ता. शेवगाव), सेवानगर (तोंडोळी ) ता. पाथर्डी, वडगाव(ता. पाथर्डी), मोहोजदेवढे (ता. पाथर्डी) आदी शाळांतून प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले.[ संदर्भ हवा ] काही काळ त्यांनी 'सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत विषयतज्ज्ञ म्हणूनही काम केले होते.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

संपादन

प्रारंभीच्या काळात कैलास दौंड हे मुख्यत्वे कवी म्हणून ओळखले गेले. त्यांच्या 'उसाच्या कविता' या कवितासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले होते.[ संदर्भ हवा ] ऊसतोड कामगारांचे जीवनानुभवाचे चित्रण करणारा हा मराठीतला पहिलाच कवितासंग्रह आहे. २०१८ मध्ये या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती निघाली. विविध प्रतिष्ठित दिवाळी अंकांतून व नियतकालिकांतून दौंड यांचे लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. बालकथा, कविता या व्यतिरिक्त ते समीक्षा लेखन आणि परीक्षण लेख लिहितात.[ संदर्भ हवा ] त्यांचे पन्नाहून अधिक समीक्षा लेख मान्यवर नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहेत.[ संदर्भ हवा ]

कैलास दौंड यांनी अनेक साहित्य संमेलनांतून व महाविद्यालयांमधून साहित्यिक स्वरूपाची व्याख्याने दिली आहेत व कविता सादर केल्या आहेत.[ संदर्भ हवा ] काही नव्या कवीच्या कवितासंग्रहाला व इतर पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तक परीक्षणे व समीक्षा मराठीतील आघाडीची दैनिके व प्रथितयश नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या आहेत.[ संदर्भ हवा ]

अभ्यासक्रमात समावेश

संपादन

कापूसकाळ या कादंबरीचा मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता.[ संदर्भ हवा ] ढव्ह नावाच्या कवितेचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्ष एसएल (?) मराठी अभ्यासक्रमात व माॅडेल काॅलेज घनसावंगीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता. तर उसाच्या कविता या कवितासंग्रहाचा कर्नाटक विद्यापीठात एम. ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.[ संदर्भ हवा ] उसाच्या कविता या कवितासंग्रहातील गोधडी नावाची कविता महाराष्ट्राच्या इयत्ता आठवीच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाली आहे.[ संदर्भ हवा ]

त्यांच्या कापूसकाळ व तऱ्होळीचं पाणी या पुस्तकांची नॅब संस्थेने अंधासाठी ऑडिओ बुक्स तयार केली आहेत.[ संदर्भ हवा ]

  • अंधाराचा गाव माझा : कवितासंग्रह (२०१२), मीरा बुक्स अँड पब्लिकेशन्स, औरंगाबाद.
  • उसाच्या कविता  : कवितासंग्रह (२००१), नीळकंठ प्रकाशन, पुणे.
  • एका सुगीची अखेर : कथासंग्रह, (२००९), अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर. या कथासंग्रहात विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या कथा आहेत.
  • कापूसकाळ : कादंबरी, (२००९), मीरा बुक्स अँड पब्लिकेशन्स, औरंगाबाद. मॅजेस्टिक प्रकाशन (२०१५ ,२०१७), ठाणे.
  • तऱ्होळीचं पाणी : ललित लेखसंग्रह, (२०१२), मीरा बुक्स अँड पब्लिकेशन्स, औरंगाबाद.
  • तुडवण : कादंबरी (२०१९) मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
  • पाणधुई : कादंबरी, (२००४), शांती पब्लिकेशन्स पुणे.
  • भोग सरू दे उन्हाचा : कवितासंग्रह (२००७), शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर.
  • वसाण कवितासंग्रह (२००२) चंद्रमौळी प्रकाशन पुणे.
  • माझे गाणे आनंदाचे : बालकविता संग्रह, (२०२०), अनुराधा प्रकाशन, पैठण जिल्हा औरंगाबाद.
  • आगंतुकाची स्वगते, कवितासंग्रह (२०२१), चपराक प्रकाशन, पुणे.
  • जाणिवांची फुले : बालकथासंग्रह (२०२१), इसाप प्रकाशन, नांदेड .
  • आई, मी पुस्तक होईन -बालकवितासंग्रह (२०२३), सौरव प्रकाशन, औरंगाबाद.

पुरस्कार

संपादन
  • अभिरुची गौरव साहित्य पुरस्कार, बडोदा[ संदर्भ हवा ]
  • दलुभाऊ जैन साहित्य पुरस्कार, जळगाव[ संदर्भ हवा ]
  • निरंजन उजागरे काव्य पुरस्कार, अहमदनगर[ संदर्भ हवा ]
  • महात्मा फुले साहित्य पुरस्कार, बंधुता - पुणे[ संदर्भ हवा ]
  • पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरानगर[ संदर्भ हवा ]
  • खानदेश कन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कार[ संदर्भ हवा ]
  • भी. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार, कोपरगाव[ संदर्भ हवा ]
  • भा.पा. हिवाळे व रूथबाई हिवाळे प्रथम पुरस्कार, अहमदनगर[ संदर्भ हवा ]
  • ॲड. देविदास जमदाडे साहित्य पुरस्कार, लातूर[ संदर्भ हवा ]
  • शांतिकुमार फिरोदिया स्मृती साहित्यरत्न पुरस्कार, अहमदनगर[ संदर्भ हवा ]
  • स्वा.से. गणपतराव बडे साहित्य पुरस्कार, लोणी (बीड)[ संदर्भ हवा ]
  • संत भगवान बाबा राज्यस्तरीय कवितासंग्रह पुरस्कार, यशवंतराव दाते संस्था, वर्धा[ संदर्भ हवा ]
  • साहित्य ज्योती पुरस्कार, कडा[ संदर्भ हवा ]
  • भाऊ भालेराव ललित लेखन पुरस्कार, अकोला[ संदर्भ हवा ]
  • उद्धव शेळके कादंबरी पुरस्कार, अकोला[ संदर्भ हवा ]
  • दहिवळ गुरुजी साहित्य पुरस्कार, शेवगाव[ संदर्भ हवा ]
  • रमेशलाल गांधी साहित्य पुरस्कार, पाथर्डी, अहमदनगर[ संदर्भ हवा ]
  • स्व. कडुबाई गर्कळ काव्य पुरस्कार, घोगस पारगाव, बीड[ संदर्भ हवा ]
  • दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार, तरवडी ता. नेवासा, अहमदनगर[ संदर्भ हवा ]
  • स्व. सूर्यकांता देवी पोटे राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार[ संदर्भ हवा ]
  • कादवा प्रतिष्ठान नाशिकचा स्व. चिंतामण शंकर उगलमुगले बालसाहित्य पुरस्कार[ संदर्भ हवा ]
  • दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान, चेंबूर चा बालसाहित्य पुरस्कार[ संदर्भ हवा ]
  • निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूर चा बालसाहित्य पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  • ग.ल.ठोकळ सर्वोत्कृष्ट ग्रामीण साहित्य पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे. आगंतुकाची स्वगते संग्रहास [ संदर्भ हवा ]
  • पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार,पिंपरी चिंचवड - आगंतुकाची स्वगते करीता.[ संदर्भ हवा ]
  • युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठान चिलेखनवाडी(नेवासाचा) ज्ञानसरीता साहित्यरत्न पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  • यांसह महाराष्ट्रातील व बाहेरील मिळून पंचवीसहून अधिक साहित्य पुरस्कार.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

संपादन