वामन केंद्रे
वामन केंद्रे हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म दरडवाडी (बीड जिल्हा केज तालुका) येथे झाला. वामन केंद्रे यांनी मुंबई विद्यापीठ मुंबई येथे २००३ साली अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स या नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या शाळेची स्थापना केली त्याच प्रमाणे त्या शाळेचे संचालक पद १० वर्षे सांभाळी त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली येथील संचालक पद सांभाळेल
वामन केंद्रे यांना दिग्दर्शित केलेली नाटके
संपादन- अशी बायको हवी (लेखक : प्र.के. अत्रे)
- एक झुंज वाऱ्याशी (लेखक : पु.ल. देशपांडे)
- चार दिवस प्रेमाचे (लेखक : रत्नाकर मतकरी)
- जानेमन (लेखक : मच्छिंद्र मोरे)
- झुलवा (लेखक : उत्तम बंडू तुपे).
- नातीगोती (लेखक : जयवंत दळवी)
- पिया बावरी (लेखन: भास 'मध्यमव्यायोग' | मराठी नाट्यलेखन वामन केंद्रे)
- प्रेमपत्र ()
- मोहनदास (लेखक : उदय प्रकाश | रूपांतरण : राधा भाटी)
- म्य़ुझिकल ’ती फुलराणी’ (पु.ल. देशपांडे)
- रणांगण (विश्राम बेडेकर)
- राहिले दूर घर माझे (लेखक : शफाअतखान)
- वेधपश्य (मूळ इंग्रजी 'इडिपस' लेखक - सोफोक्लिज; मराठी रूपांतर मच्छिंद्र मोरे)
- नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांना भारत सरकारचा नाट्यदिग्दर्शनासाठीचा ’संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ (२०१२) मिळाला आहे.
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीड शाखेच्या वतीने देण्यात येणारा ‘ डॉ. सुहासिनी इर्लेकर राज्यस्तरीय नाट्य पुरस्कार’ (२०१२)
- केंद्रे यांना २०१९ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१]
- बी.व्ही. कारंथ पुरस्कार (मार्च २०१९)
संदर्भ
संपादनhttp://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-waman-kendre-is-appointed-as-the-new-director-of-national-school-of-drama-nsd-4332712-NOR.html http://www.loksatta.com/vruthanta-news/shaktipeeth-in-drama-direction-159104/
- ^ "पद्म पुरस्कार यादी". २८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.