राष्ट्रीय महामार्ग ७ (जुने क्रमांकन)


राष्ट्रीय महामार्ग ७ हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. २,३६९ किमी धावणारा हा महामार्ग वाराणसीकन्याकुमारी ह्या धार्मिक स्थळांना जोडतो[१]. वाराणसी, मिर्झापुर, मंगावान, रेवा, जबलपुर, लखनादोन, नागपूर, हैदराबाद, कुर्नूल, गूटी, बंगळूर, होसुर, कृष्णगिरी, धर्मपुरी, सेलम, नमक्कळ, करुर, दिंडीगुल, मदुराई, विरुधुनगर, तिरुनलवेली ही रा. म. ७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ७चा मोठा हिस्सा (लाखनादों ते कन्याकुमारी) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा भाग आहे.

भारत  राष्ट्रीय महामार्ग ७
लांबी २,३६९ किमी
सुरुवात वाराणसी, उत्तर प्रदेश
मुख्य शहरे वाराणसी - जबलपुर - नागपूर - हैदराबाद - बंगळूर - सेलम - मदुराई - कन्याकुमारी
शेवट कन्याकुमारी, तामिळनाडू
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. २ - वाराणसी
रा. म. २९ - वाराणसी
रा. म. ५६ - वाराणसी
रा. म. २७ - मंगावान
रा. म. ७५ - रेवा
रा. म. ७८ - कटनी
रा. म. १२ - जबलपुर
रा. म. २६ - लखनादोन
रा. म. ६९ - नागपूर
रा. म. ६ - नागपूर
रा. म. १६ - अरमुर
रा. म. २०२ - हैद्राबाद
रा. म. ९ - हैद्राबाद
रा. म. १८ - कुर्नूल
रा. म. ६३ - गूटी
रा. म. २०६ - अनंतपुर
रा. म. ४ - बंगळूर
रा. म. २०९ - बंगळूर
रा. म. ४६ - कृष्णगिरी
रा. म. ६६ - कृष्णगिरी
रा. म. २१९ - कृष्णगिरी
रा. म. ६८ - सेलम
रा. म. ४७ - सेलम
रा. म. ६७ - करुर
रा. म. ४५ - दिंडीगुल
रा. म. २०९ - दिंडीगुल
रा. म. ४९ - मदुराई
रा. म. २०८ - मदुराई
रा. म. ४५-बी - मदुराई
रा. म. ७-ए - तिरुनलवेली
रा. म. ४७ - कन्याकुमारी
राज्ये उत्तर प्रदेश: १२८ किमी
मध्य प्रदेश: ५०४ किमी
महाराष्ट्र: २३२ किमी
आंध्र प्रदेश: ७५३ किमी
कर्नाटक: १२५ किमी
तामिळनाडू: ६२७ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

शहरे व गावे संपादन

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना संपादन

  1. ह्या महामार्गावरील बंगळूर ते कृष्णगिरी या शहरांमधिल ९४ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
  2. ह्या महामार्गावरील लखनादोन ते कन्याकुमारी या शहरांमधिल १,२८२ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[३]

हेसुद्धा पहा संपादन

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ संपादन

  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग ७चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-10-01 रोजी पाहिले.
  3. ^ "राष्ट्रीय महामार्ग ७चे उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-10-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ