सातवाहन साम्राज्य

रॉयल क्षत्रित मराठा साम्राज्य
(माठरीपुत्र शकसेन या पानावरून पुनर्निर्देशित)

सातवाहन (मराठी: सातवाहन साम्राज्य ; रोमन लिपी: Sātavāhana ;) हे इ.स.पू. २३० ते इ.स. २३० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले क्षत्रिय मराठा राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटकआंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नरपैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील बौद्ध लेणीच्या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली व्यापारी शहरे या राजवटीत उदयास आली. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रात आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्यसत्ता स्वतंत्र झाल्या त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली त्यापैकी सातवाहन घराणे हेदेखील एक महत्त्वाचे घराणे होय. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची महाराष्ट्रातील राजधानी होती. राजा सिमुक सातवाहन हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. सातवाहन घराण्याचा उदय सिरी सातवाहन यांच्यापासून असल्याचे पैठण येथील मिळालेल्या नाण्यावरून त्याची ओळख पटते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आलेले आहेत काही सातवाहन राजे यांच्या नावाची आईचे नाव लावत असत. जसे की गौतमीपुत्र सातकर्णि सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांची माता गौतमी बलश्री येणे गौतमीपुत्र सातकर्णि याचा गौरव केलेला आहे शक पलव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा तसेच सातवां कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा व ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत असा उल्लेख नाशिक येथील शिलालेखांमध्ये गौतमीपुत्रच्या मातेने केलेला आहे या उल्लेखावरून गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारलेले होते असे दिसते सातवाहन राजे आपल्या नावा आधी आईचे नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी वाशिष्टीपुत्र पुळूमावी इत्यादी सातवाहन शासकांची राजवट ही महाराष्ट्रामध्ये प्रभावी तसेच वैभवशाली व संपन्न राहिलेली आहे सातवाहन शासक हे प्रजा प्रेमी लोककल्याणकारी राजे होते या काळामध्ये महाराष्ट्राची एकूणच मोठी प्रगती घडून आली संस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राला या काळामध्ये वैभव संपन्नता प्राप्त झाली. सातवाहन हे बौद्ध धर्माचे मोठे उपासक असल्याचे त्यांच्या शिलालेखातून स्पष्ट दिसून येते. सातवाहन हे बौद्ध धर्मीय मरहट्ट (महारठी ; आजचे महारठ्ठा) असल्याचे नाणेघाट येथील शिलालेखातून स्पष्ट होते. त्यांनी बौद्ध स्तुपांसाठी आर्थिक मदत केल्याचेही आढळते. नाशिकच्या पांडवलेणी मध्ये गौतमीपुत्र सातकर्णीच्या आईने म्हणजेच माता बलश्रीने शिलालेख कोरून घेतला आहे, ज्यात गौतमीपुत्र सातकर्णीनी क्षत्रप(शक) यांना हरवून हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था अबाधित ठेवली असा स्पष्ट उल्लेख आढळतो. आणि त्या काळात राज्यव्यवस्था सूत्र क्षत्रिय सांभाळत असत. मराठा समाजातील साळवे हे कूळ सातवाहनांचेच वंशज आहे असं माहितीतून समोर येत. सातवाहन घराण्याचा सर्वश्रेष्ठ शासन गौतमीपुत्र सातकर्णी हा होईल गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा वर विजय मिळवला या विजयाने सातवाहनांची प्रतिष्ठा उंचावली गौतमीपुत्र सातकर्णीने मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिण वापरतात दिग्विजय केला त्यांनी दक्षिणेकडील राज्य अवंती सुराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शक राजांचा पराभव केला त्याचप्रमाणे मध्य भारतात व राजस्थान येथे असलेल्या गणराज यांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले नाशिक जिल्ह्यात जोगलटेम्भी येथे एका नाणेनिधी मिळालेला आहे शकराजा नहपानाची याच्या नाण्यांवर गौतमीपुत्राच्या मुद्रा उमटवलेल्या दिसतात त्यावरून नहपानावर विजय मिळवून त्याने आपलं सामर्थ्य सिद्ध केलं होतं हे स्पष्ट आहे गौतमिपुत्रा नंतर वशिष्ठपुत्र फुलमावी आणि यज्ञश्री सातकर्णी हे महत्त्वाचे राजे सातवाहन घराण्यात होऊन गेले त्यानंतर मात्र सातवाहनांचा ऱ्हास सुरू झाला आणि शक आणि सातवाहानांच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे सातवाहन सत्ता दुर्बल होत गेली

उदयोन्मुख लेख
हा लेख १ मार्च, २०१२ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१२चे इतर उदयोन्मुख लेख


सातवाहन साम्राज्य दर्शवणारा नकाशा (इंग्लिश मजकूर)

सातवाहन राजघराणे

संपादन

सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ४६० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता महाराष्ट्राट गोदावरीच्या खोऱ्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली आणि नंतर दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर पसरली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणातवायु पुराणात आला आहे कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हणले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारताच्या पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ओडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरूनच पडलेली आहेत, यावरून या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हणले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरून बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हणले तर वावगे होणार नाही. बौद्धजैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळअजिंठा-वेरूळची लेणी ही लेणी खोदली गेली.

पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती.

राज्यकर्ते

संपादन

सातवाहन काळात या राजघराण्याच्या तीस राज्यकर्ते होऊन गेले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी जुन्नर जिल्हा पुणे येथील नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्याच तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे.

 
शातकर्णी मुद्रा

नाणेघाटातील शिलालेखात ब्राह्मी लिपीत कोरून ठेवलेली खालील नावे दिसून येतात :

  • राजा सिमुक सातवाहन,
  • राणी नागनिका,
  • राजा श्री सातकर्णी (नागनिकेचा पती),
  • कुमार भाय (राजपुत्र),
  • महारठि त्रनकयिर अथवा महारथी त्रनकयिर (राणी नागनिकेचे पिता),
  • कुमार हुकुसिरी (राजपुत्र)
  • कुमार सातवाहन (राजपुत्र)

हे अतिशय समृद्ध असे राज्य होते.

 
ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेले इ.स.पू. पहिल्या शतकातले नाणे

महाराष्ट्र राज्य गॅझेटियर (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढीलप्रमाणे नोंदवितो.

  • सिरि सातवाहन ( सातवाहन घराण्याचा संस्थापक ) सातवाहन घराण्याची स्थापना ही सिरि सातवाहन यांच्यापासून झालेली आपणास पैठण येथील नाण्यामधून माहिती होते. सातवाहन हे सम्राट अशोकाच्या साम्राज्यात मांडलिक म्हणून काम करत होते. महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश म्हणून देखील यांच्याकडे पहिले जाते.
  • सिमुक सातवाहन(सातवाहन साम्राज्याचा संस्थापक (यालाच सिंधुक असेही नाव आहे.)
 
आंध्रपदेश येथे सापडलेली सातवाहन राजवंशातील कर्णभूषणे
 
इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुलुमावी यांच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र. हे चित्र भारतीय प्राचीन दर्यावर्दी होते हे सिद्ध करते, तसेच प्राचीन भारताच्या परदेशी व्यापाराचा पुरावाही देते.

सिमुक सातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिकभोज या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून कण्वाची सत्ता नष्ट करून आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दक्षिणापथपति ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती.

सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली.

सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती नाणेघाट येथील शिलालेखात आहे. अप्रतिहतचक्र ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती.

अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौशिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणाऱ्या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते.

सातवाहन राज्याची पार्श्वभूमी असलेले मराठी ललित साहित्य

संपादन
  • गाथा सप्तशती (सुमारे ७०० कवितांचा संग्रह)
  • नागनिका (कादंबरी, लेखिका : शुभांगी भडभडे)
  • रसिक महाराष्ट्र (गाथा सप्तशतीचा काव्यानुवाद : कवी : रामचंद्र गोविंद चोथे व शशांक रामचंद्र चोथे)
  • हाल सातवाहनाची गाथा सप्तशती (जोगळेकर)
  • हिरण्यदुर्ग (कादंबरी, लेखक : संजय सोनवणी)

सातवाहन राजांची वंशावळ

संपादन
 
 
 
सिमुक सातवाहन
 
 
 
 
 
कृष्ण सातवाहन
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पहिला सातकर्णी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
वेदिश्री
 
 
 
 
 
शक्तिश्री
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पूर्णोत्संग
 
 
 
 
 
 
 
 
 
 
स्कंदस्तंभि
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दुसरा सातकर्णी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
लंबोदर
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अपिलक
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मेघस्वाती
 
 
 
 
 
 
 
 
 
 
स्वाती सातवाहन
 
 
 
 
 
 
 
 
 
 
स्कंदस्वाती
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मृगेंद्र
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कुन्तल
 
 
 
 
 
 
 
 
 
 
स्वातिवर्ण
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पहिला पुलुमावी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अरीष्टकर्ण
 
 
 
 
 
 
 
 
 
 
हाल सातवाहन
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मण्टलक
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पूरींद्रसेन
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सुंदर सातकर्णी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
चकोर
 
 
 
 
 
 
 
 
 
 
शिवस्वाती
 
 
 
 
 
 
 
 
 
 
गौतमीपुत्र सातकर्णी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
वासिष्ठीपुत्र पुलुमावि
 
 
 
वासिष्ठीपुत्र स्कंदसातकर्णी
 
 
 
वासिष्ठीपुत्र सातकर्णी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
माठरीपुत्र शकसेन
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
गौतमीपुत्र विजय सातकर्णी
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
वासिष्ठीपुत्र चंद्रस्वाती
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
तिसरा पुलुमावी

बाह्य दुवे

संपादन