प्रीमियर लीग

(प्रिमियर लीग या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रीमियर लीग (इंग्लिश: Premier League) आंतरराष्ट्रीय नाव इंग्लिश प्रीमियर लीग ही इंग्लंड देशातील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. इंग्लंडमधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग जगातील सर्वोत्तम फुटबॉल स्पर्धांपैकी एक समजली जाते. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये इंग्लंड व वेल्समधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी फुटबॉल लीग चॅंपियनशिप ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर फुटबॉल लीग चॅंपियनशिपमधील सर्वोत्तम ३ संघांना प्रीमियर लीगमध्ये बढती मिळते. सध्या २१२ देशांमध्ये प्रसारण होणारी प्रीमियर लीग ही जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा आहे.

प्रीमियर लीग
देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
मंडळ युएफा
स्थापना इ.स. १९९२
संघांची संख्या २०
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी फुटबॉल लीग चॅंपियनशिप
राष्ट्रीय चषक एफ.ए. कप
एफ.ए. कम्युनिटी शील्ड
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चॅंपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते मॅंन्चेस्टर सिटी
(२०१८-२०१९)
सर्वाधिक अजिंक्यपदे मॅंचेस्टर युनायटेड (१३ विजेतेपदे)
संकेतस्थळ premierleague.com
2023–24

१९९२ मधील स्थापनेपासून आजवर एकूण ४८ क्लबांनी प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतला आहे. परंतु मॅंचेस्टर युनायटेड (१३), चेल्सी (४), आर्सेनल (३), मॅंचेस्टर सिटी (२), ब्लॅकबर्न रोव्हर्स (१) व लेस्टर सिटी (१) ह्या केवळ ६ संघांनी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले आहे.

इतिहास

संपादन

१९८० च्या दशकात इंग्लिश फुटबॉलची रया गेली होती. मैदानांची दुरावस्था, प्रेक्षकांसाठी अपुऱ्या सुविधा आणि प्रेक्षकांची हुल्लडबाजी यामुळे इंग्लिश क्लब्जना युरोपियन स्पर्धांमधे भाग घेण्यास मनाई करण्यात आली होती. इ.स. १८८८ पासून सर्वोत्तम आणि सर्वांत लोकप्रिय समजला जाणारा 'फुटबॉल लीग फर्स्ट डिव्हिजन' हा लीग इटालीच्या सेरी आ आणि स्पेनच्या ला लीगाच्या तुलनेत बराच मागे पडला. याच दरम्यान अनेक इंग्लिश खेळाडूंनी इतर युरोपियन क्लब्जबरोबर करार करण्यास सुरुवात केली. परंतु १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस ह्या परिस्थितीत चांगला बदल होण्यास सुरुवात झाली. इंग्लंडच्या संघाने इ.स. १९९० च्या फुटबॉल विश्वचषकात उपांत्य फेरीत धडक मारली. याच काळात यु.ए.फा. या युरोपियन फुटबॉल संघटनेने इंग्लिश क्लब्जवरील बंदी उठवली.

स्थापना

संपादन

इ.स. १९९१ च्या मोसमाच्या अखेरीस एका नव्या लीगच्या स्थापनेचा प्रस्ताव पुढे आला. १७ जुलै १९९१ रोजी खेळातील सर्वोत्कृष्ठ क्लब्जसाठी एफ. ए. प्रीमियर लीगची स्थापना झाली. ही नवी साखळी व्यवस्थापन आणि प्रसारण हक्क, प्रायोजक इ. साठी एफ. ए. (फुटबॉल असोसियशन) पासून पूर्णतः स्वायत्त होती.

सुरुवातीचा मोसम

संपादन

लीगचा पहिला मोसम १९९२-९३ हा ठरला. या लीगमध्ये एकूण बावीस क्लब्जच्या संघांचा समावेश होता. ब्रायन डीन याने प्रीमियर लीगमधला पहिला-वहिला गोल मॅंचेस्टर युनायटेड विरुद्ध झळकावला.

स्पर्धेचे स्वरूप

संपादन

प्रतिवर्षी प्रीमियर लीग या उच्च श्रेणीत एकूण २० क्लब्सची निवड होते. प्रत्येक क्लब इतर १९ क्लब्सविरुद्ध एक सामना घरच्या प्रेक्षकांसमोर आणि एक प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर, असे दोन सामने खेळतो. संपूर्ण मोसमात अशा प्रकारे प्रत्येक संघास ३८ सामने खेळावे लागतात. विजयासाठी ३ गुण, बरोबरीसाठी १ गुण आणि पराभवासाठी शून्य गुण बहाल केले जातात. एकूण गुणांच्या आधारावर संघांची क्रमवारी निश्चित केली जाते. गुणांची बरोबरी झाल्यास केलेले आणि स्विकारलेले गोल यांच्या फरकाद्वारे क्रम निश्चित केला जातो. मोसमाच्या अखेरीस सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संघास इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळते. इंग्लिश प्रीमियर लीगमधील सर्वोत्तम ४ संघ यु. ए. फा. चॅंपियन्स लीगसाठी पात्र ठरतात.

प्रमुख खेळाडू

संपादन

प्रमुख संघ

संपादन

सद्य संघ

संपादन

स्पर्धेचे गतविजेते

संपादन

गेल्या १४ वर्षांत मॅंचेस्टर युनायटेड या क्लबने ८ वेळा, आर्सेनल एफ.सी. या क्लबने ३ वेळा तर चेल्सी एफ.सी. या क्लबने २ वेळा विजेतेपद पटकावले आहे.

इंग्लिश प्रीमियर लीग - गतविजेते
मोसम विजेता क्लब
२००५-०६ चेल्सी एफ.सी.
२००४-०५ चेल्सी एफ.सी.
२००३-०४ आर्सेनल एफ.सी.
२००२-०३ मॅंचेस्टर युनायटेड
२००१-०२ आर्सेनल एफ.सी.
२०००-०१ मॅंचेस्टर युनायटेड
१९९९-०० मॅंचेस्टर युनायटेड
१९९८-९९ मॅंचेस्टर युनायटेड
१९९७-९८ आर्सेनल एफ.सी.
१९९६-९७ मॅंचेस्टर युनायटेड
१९९५-९६ मॅंचेस्टर युनायटेड
१९९५-९५ ब्लॅकबर्न रोव्हर्स
१९९४-९४ मॅंचेस्टर युनायटेड
१९९२-९३ मॅंचेस्टर युनायटेड

दूरचित्रवाणी प्रसारक

संपादन

बाह्य दुवे

संपादन