विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

"पोस्टक्रॉसिंग" हा एक ऑनलाईन प्रकल्प आहे. यात साईटवरील सदस्य व्यक्ती जगातील कोणत्याही देशात पोस्टकार्ड पाठवू शकते किंवा अन्य देशातून प्राप्त करू शकते. " तुम्ही एक पोस्टकार्ड पाठवा आणि जगातील स्वैर (random) ठिकाणाहून एक पोस्टकार्ड प्राप्त करा" हेच तर ह्या प्रकल्पाचे ब्रीद वाक्य आहे. या साईटवरील सदस्य हे पोस्टक्रॉसर म्हणून ओळखले जातात. तुम्हाला येणारे पोस्टकार्ड हे कुठून येणार हा कायम कुतूहलाचा विषय असतो, आणि आश्चर्यदायक सुद्धा .

पोस्टक्रॉसिंग हे नाव दोन शब्द जोडून बनवले आहे ज्यात एक आहे "पोस्टकार्ड" आणि दुसरा शब्द आहे "क्रॉसिंग". पोस्टक्रॉसिंग या नावाचे साधर्म्य बुकक्रॉसिंगशी आहे. परंतु हा प्रकल्प बुकक्रॉर्सिंगपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतो. दोन सदस्यांमध्ये देवाणघेवाण केवळ एकदाच होते/ होऊ शकते. परंतु प्रकल्पातील सदस्य हे आपापसात पोस्टकार्डची देवाणघेवाण करत असतात परंतु अशी देवाणघेवाण प्रकल्पाबाहेरील ज्याचा पोस्टक्रोसिंग प्रकल्पाशी काहीही संबंध नसतो. जर कुणाकडे कडे पत्ता आहे तर हा प्रकल्प त्यांना मोफत आणि खुला आहे. पोस्टकार्ड आणि पोस्टाचे शुल्क खर्च ही सदस्याची स्वतःची जबाबदारी आहे. मे २०१३ पर्यंत पोस्टक्रॉसिंग प्रकल्पाचे २१७ देशातीलतून जवळजवळ ४,०५,००० नोंदणीकृत सदस्य आहेत. त्यांनी आत्तापर्यंत १ कोटी ७० लाख पोस्टकार्डांची देवाणघेवाण केली आहे आणि या पोस्ट कार्डांनी ८८.६ अब्ज किलोमीटरचा प्रवास केला आहे.

पोस्टक्रॉसिंग सदस्यांची घनता अमेरिका, रशिया, चीन, तैवान, नेदरलेंड, जर्मनी, पोलंड, फिनलंड, बेलारूस, युक्रेन आणि ब्राझील ह्या देशांत अधिकआहे. जागतिक क्रमवारीत बघितले तर सर्वात जास्त सदस्य उत्तर अमेरिका, युरोप आणि पूर्वी आशियात. ह्याचाच अर्थ असा आहे की पोस्टक्रॉसिंग युरोप आणि पूर्वीची सोव्हियेट राष्ट्रे यात जास्त लोकप्रिय आहे. जानेवारी २०१२पर्यंत एकूण आकडेवारीच्या १/४ पेक्षा जास्त पोस्टकार्डे फिनलंड, रशिया, एस्टोनिया, लॅटीव्हिया, लिथुअनिया, बेलारूस आणि युक्रेन या देशांनी पाठवली आहेत.

कार्यपद्धतीसंपादन करा

मुख्यत्वे ह्या प्रकल्पाची मूळ संकल्पनाच ही आहे की जेव्हा एखादा सदस्य एक पोस्टकार्ड कुणा एका सदस्याला पाठवतो तेव्हा त्याला त्याला किमान एक पोस्टकार्ड जगातील कोणत्यातरी पोस्टक्रॉसिंग सदस्याकडून मिळेल.

प्रथमतः तुम्हाला एक पोस्टकार्ड पाठवण्यासाठी विनंती करावी लगेल. तेव्हा तुम्‍हाला वेबसाईटवर सदस्याची माहिती आणि पत्ता दिला जाईल, त्याचबरोबर जे कार्ड पाठवणार त्यावर टाकावा लागणार सांकेतिक क्रमांक जसा कि (e.g.: US-786). ह्या सर्व गोष्टी वेबसाईट तुम्हाला तुमच्या ईमेल वर पाठवते. एकदा तुम्हाला सर्व माहिती मिळाली की तुम्हाला एक पोस्टकार्ड लिहायचे आहे ज्यावर तुम्हाला दिलेला पत्ता आणि पोस्टकार्ड चा सांकेतिक क्रमांक टाकून पोस्टकार्ड पाठवायचे आहे . जेव्हा अपेक्षित सदस्याला तुमचे कार्ड मिळेल तेव्हा तो वेबसाईटवर जाऊन कार्डाची नोंदणी करतो आणि त्याच बरोबर तुम्ही एक पोस्टकार्ड प्राप्त करण्यास पात्र ठरतां. सुरुवातीला तुम्ही एका वेळी फक्त पाच पोस्टकार्ड पाठवु शकता . जेव्हा तुमच्या सर्व पोस्टकार्डांची नोंदणी होईल त्या ननतर तुम्ही आणखी पत्ते वेबसाईट वरून मागवू शकता, जसजसे तुम्ही जास्त पोस्टकार्ड पाठवल तसतसा तुम्ही जास्त पत्ते ठराविक टप्प्यानंतर मागवू शकता. वेबसाईट प्रमाणे दोन सदस्य एकदाच पोस्टकार्डची देवाणघेवाण करु शकतात. सदस्य आपल्या देश व्यतिरिक्त पोस्टकार्ड विविध देशात पाठवू शकतात, पण सदस्य कार्ड एकाच देशात परत परत पाठवणार असेल तशी सोय हि उपलब्ध केलेली आहे.

ह्या सर्व देवाणघेवाणीत असेही प्रकार घडतात ज्यात, पोस्टकार्ड इच्छित स्थळी न पहोचणे, कार्डवरील सांकेतिक क्रमांक नीट लिहिला नसतो तेव्हा कार्ड ची नोंदणी करणे अशक्य असते . खुपदा असेहि होते कि बरेच सदस्य निष्क्रिय राहतात जेव्हा त्यांच्या पत्त्यावर भरपूर कार्ड्स पाठवलेली असतात. प्रकल्पात ह्या सर्व बाबींची काळजी घेतली आहे त्यामुळे वेबसाईट कायम तुमची पाठवलेली आणि प्राप्त झालेली कार्ड्स ह्या मध्ये बरोबरी ठेवण्याचा प्रयत्न करते .

Users distributionसंपादन करा

Last updated April 24, 2014.

सर्वात जास्त सभासद असलेले देश[१]
क्रमवारी देश सभासद पाठवलेली पोस्टकार्ड्स
1.   रशिया 53,119 2,178,223
2.   अमेरिका 46,583 2,458,365
3.   चीन 44,286 1,038,499
4.   तैवान 44,134 1,024,997
5.   जर्मनी 36,138 2,844,279
6.   नेदरलँड्स 31,177 2,275,086
7.   पोलंड 23,836 734,788
8.   युक्रेन 20,627 1,024,997
9.   बेलारूस 19,096 1,103,336
10.   फिनलंड 16,339 1,947,411
11.   युनायटेड किंग्डम 9,875 482,200
12.   चेक प्रजासत्ताक 9,488 391,360
13.   ब्राझील 7,056 254,378
14.   कॅनडा 6,734 391,000
15. साचा:LIT 6,325 320,432
सर्वात जास्त पोस्टकार्ड पाठवणारे देश [१]
क्रमवारी देश सभासद पाठवलेली पोस्टकार्ड्स
1.   जर्मनी 36,138 2,844,279
2.   अमेरिका 46,583 2,458,365
3.   नेदरलँड्स 31,177 2,275,086
4.   रशिया 53,119 2,178,223
5.   फिनलंड 16,339 1,947,411
6.   बेलारूस 19,096 1,103,336
7.   चीन 44,286 1,038,499
8.   तैवान 44,134 1,024,997
9.   युक्रेन 20,627 1,024,997
10.   पोलंड 23,836 734,788
11.   युनायटेड किंग्डम 9,875 482,200
12.   जपान 6,051 481,665
13.   कॅनडा 6,734 391,571
14.   चेक प्रजासत्ताक 9,488 391,360
15.   फ्रान्स 6,198 346,722

इतिहाससंपादन करा

ह्या साईटची मूळ संकल्पना ही पाउलो Magalhães ची आहे, ज्याने हि साईट १४ जुलै २ ० ० ५ मध्ये सुरू केली. ह्या मागची प्रेरणा अशी होती कि स्वतः पाउलो ला पत्र प्राप्त करायला खूप आवडायचे विशेषतः पोस्टकार्ड." जगातील वेगवेगळ्या जागाहून जर तुम्हाला पोस्टकार्ड मिळत असतील आणि त्यामुळे तुमची पत्र पेटी एक आश्चर्यकारक पेटीत बदलून जात असेल तर ते कुणाला आवडणार नाही ?"

खरतर हा प्रकल्प पाउलो च्या छंदातून सुरू झाला. दिवसेंदिवस हा प्रकल्प लोकप्रिय होताना दिसत होता. पाउलो ने हा प्रकल्प घरात एका जुन्या संगणकावर सुरू केला नंतर लोकांची मागणी बघता त्याने हा प्रकल्प घरातील छोट्या संगणकावरून हलवून पोर्तुगाल मधील एका सीमावर्ती भागात वाढवल आणि मोठा केला.

कालांतराने प्रकल्पाने स्थानिक आणि आंतराष्ट्रीय मिडिया मध्ये सुद्धा प्रसिद्धी मिळवली आणि बरोबरच त्याची वाढ आणि लोकप्रियता वाढत गेली. पोस्टक्रोसिंग ने पाहिल्या १ million कार्डांची देवाणघेवाण एप्रिल २००८ मध्ये केली, आणि सातत्याने ह्यात वाढ होत आहे. २million ची देवाणघेवाण फेब्रुवरी २००६ मध्ये नोंदवली गेली जे जर्मनीतून नॉर्वे ला पाठवल गेल. ३rd million ची देवाणघेवाण सेप्टेम्बर २४ २००९ मध्ये नोंदवली गेली जे फिनलंडहून सोल्वेनिया ला पाठवलं गेल. ४th million ची देवाणघेवाण मार्च २८ २०१० मध्ये नोंदवली गेली जे चेक गणराज्यातून नेदरलंडला पाठवलं गेल.

जुलै २ ० १ ० ला पोस्टक्रोसिंग ने आपली पाच वर्ष पूर्ण केली त्या निमित्ताने पोस्टक्रोसिंग ने सदस्यांसाठी फोटोग्राफ चे एक छान कॉन्तेस्ट ठेवला होता. थोड्याच दिवसांनी प्रकल्पांने आपला ५ ० ० ० ० ० ० कार्ड्स चा टप्पा ओलांडला. २ ० १ १ मध्ये साईट ने ७ ० ० ० ० ० ० कार्ड्स चा पल्ला पार केला. सध्या साईट वर १ ० ० ० ० ० ० कार्ड्स ची नोंदणी गेल्या दोन महिन्यात झालीये.

Date Time (UTC) Million postcards from --> to
April 11, 2008 4:00 p.m. 1   तुर्कस्तान
--> साचा:ROM
February 26, 2009 6:30 a.m. 2   जर्मनी
-->   नॉर्वे
September 24, 2009 4:10 p.m. 3   फिनलंड
-->साचा:SLO
March 28,2010 11:20 a.m. 4   चेक प्रजासत्ताक
-->   नेदरलँड्स
August 24, 2010 8:00 p.m. 5   इटली
-->   नॉर्वे
December 30, 2010 12:00 p.m. 6 साचा:SPA -->   जर्मनी
April 19, 2011 7:00 p.m. 7   चीन
-->   नेदरलँड्स
August 2, 2011 11:30 a.m. 8   फिनलंड
-->   जपान
November 3, 2011 07:00 a.m. 9   चीन
-->   रशिया
January 27, 2012 4:50 p.m. 10   जपान
-->   जर्मनी
April 3, 2012 9:10 p.m. 11   अमेरिका
-->   आइसलँड
June 12, 2012 7:30 p.m. 12   अमेरिका
-->   नेदरलँड्स
August 22, 2012 06:10 a.m. 13 साचा:HKG -->   रशिया
October 25, 2012 9:50 p.m. 14   नेदरलँड्स
--> [[चित्र:|22x20px|border|होन्डुरास ध्वज]] होन्डुरास
December 31, 2012 1:46 p.m. 15   जर्मनी
-->   इटली
March 4, 2013 08:21 a.m. 16   युक्रेन
-->   रशिया
May 1, 2013 00:21 a.m. 17   रशिया
-->   ऑस्ट्रेलिया
July 3, 2013 ? 18   फिनलंड
-->   तैवान

See alsoसंपादन करा

Referencesसंपादन करा

  1. ^ a b http://www.postcrossing.com/explore/countries (नवीनतम आकडेवारी: २४.एप्रिल २०१४)

External linksसंपादन करा