तिसरे इंग्रज-मराठा युद्ध

(तिसरे आंग्ल-मराठा युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)
खडकीची लढाई
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक नोव्हेंबर ५ इ.स. १८१७
स्थान खडकी, पुणे जिल्हा महाराष्ट्र
परिणती ब्रिटीश विजय
युद्धमान पक्ष
Flag of the Maratha Empire.svg पेशवा Flag of the British East India Company (1801).svg ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
सेनापती
Flag of the Maratha Empire.svg मोरोपंत दीक्षित Flag of the British East India Company (1801).svg कर्नल बर्र
Flag of the British East India Company (1801).svg कॅप्टन फोर्ड
सैन्यबळ
१८,००० घोडदळ
८,००० पायदळ सैनिक
२,८०० घोडदळ
बळी आणि नुकसान
५० ८६

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ.स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.व्दितीय इंग्रज मराठा युद्धाच्या नंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली,त्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटीशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले.अशा पार्श्वभूमीवर गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टींग्सची नियुक्ती झाली[१]. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला.नेपाळ युद्धाच्या समाप्तीनंतर पेंढारी लोकांशी संघर्ष सुरु करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले.[२]परिणामी इंग्रज-मराठा युध्द सुरु झाले. त्यात हेस्टींग्सने भोसले, पेशवा बाजीराव दुसरा आणि शिंदे ह्यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. अखेर पेशव्याने अंतिम युध्द करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणि मल्हारराव होळकर (यशवंतराव होळकरांचा पुत्र) ह्यांनी साथ दिली.पण युद्धात पेशवा,भोसले आणि होळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले.सीताबर्डीच्या लढाईत भोसल्यांचा, महित्पुरच्या लढाईत होळकरांचा आणि खडकी[३],कोरेगावआष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला.अशा प्रकारे इंग्रजांसमोर मराठ्यांचा टिकाव लागला नाही,वरील सर्वांनी शरणागती पत्करली.बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले.त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला.छत्रपतीचे सातारा राज्य व इतर मराठा सरदारांच्या प्रदेशावर ब्रिटीश नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने मराठा सत्तेची समाप्ती झाली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा


मागील:
दुसरे इंग्रज-मराठा युद्ध
इंग्रज-मराठा युद्धे
पुढील:
---