शिंदे घराणे

(शिंदे या पानावरून पुनर्निर्देशित)


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


शिन्दे घराणे अथवा हिन्दीमध्ये सिन्धीया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत. राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते. मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिन्दे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठावरील कण्हेरखेडे या गावचे पाटील होते. राणोजी शिन्दे हा मूळ कर्ता होता.

    या शिन्दे घराण्याचे कुलदैवत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीचा दक्खनचा राजा श्री जोतिबा.या जोतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये शिन्दे सरकार यांच्या शासनकाठीला पहिल्या मानाच्या अठरा शासनकाठ्या मध्ये नऊ क्रमांक चा मान आहे.सध्या शिन्दे ग्वाल्हेर याठिकाणी स्थायिक असल्यामुळे त्याची ही मानाची शासनकाठी त्यांच्या वतीने चालवण्याचा मान सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील करंजवडे गावाच्या ग्रामस्थांना शिन्देंनी फार पूर्वीपासून दिला आहे.तशी नोन्द सुद्धा  सिन्धिया देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे आहे.

शिन्दे घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्ती