होळकर घराणे
होळकर घराणे हे भारतातील, इंदूर संस्थानचे संस्थानिक होते. संस्थानिक बनण्याअगोदर १८ व्या शतकाच्या सुरुवातीला होळकर घराण्याचा कर्ता मल्हारराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा सेनेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले व उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला. उत्तर भारतातील माळवा प्रांतातील व्यवस्था चोख रहावी यासाठी पेशव्यांनी होळकरांना खास अधिकार दिले व इंदूर येथे आपले बस्तान बसवण्यास प्रोत्साहित केले. होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील होते.
|
||||
|
||||
इंदूर येथील होळकरांचा राजवाडा |
||||
राजधानी | इंदूर, महेश्वर | |||
शासनप्रकार | संस्थान | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: मल्हारराव होळकर अंतिम राजा: यशवंतराव होळकर |
|||
अधिकृत भाषा | मराठी |
होळकर घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्ती
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत