जाॅन कॅल्व्हिन

(जॉन केल्व्हिन या पानावरून पुनर्निर्देशित)

जाॅन कॅल्व्हिन (फ्रेंच: John Calvin; १० जुलै १५०९, पिकार्दी, फ्रान्स - २७ मे १५६४, जिनिव्हा, स्वित्झर्लंड) हा प्रबोधन काळातील एक प्रमुख धर्मसुधारक होता. तो जन्माने फ्रेंच होता, पण त्याला तेथून हद्दपार करण्यात आल्याने तो स्वित्झर्लंडमध्ये जाऊन राहिला. जाॅन कॅल्व्हिन व्यवसायाने वकील होता. त्याने धर्मशास्त्रतत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून 'ख्रिश्चन धर्मसंस्था' (Institutes of Christian Religion) हा ग्रंथ लिहिला. तसेच त्याने प्रोटेस्टंट पंथास तत्त्वज्ञानाची बैठक प्राप्त करून दिली. लोकांनी बायबल वाचावे, प्रवचने ऐकावीत, बायबलमधील वचनाप्रमाणे वर्तन करावे, सामुदायिक प्रार्थना कराव्यात, उत्सव, खेळ, समारंभ व नाच टाळावेत असे त्याचे मत होते. त्यामुळे लोक त्याला कर्मठ हुकुमशहा असे म्हणत.

जाॅन कॅल्व्हिन

जाॅन कॅल्व्हिनने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असे म्हणले जाते. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रान्स, नेदरलॅंड, जर्मनी, हंगेरी, पोलंड, स्कॉटलंड इत्यादी देशांत दिसून येतो.

बाह्य दुवे

संपादन