ओस्त्राव्हा (चेक: Ostrava; जर्मन: Ostrau; पोलिश: Ostrawa) हे चेक प्रजासत्ताक देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर, प्राग खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर तसेच मोराव्हियन-सिलेसियन प्रदेशाची राजधानी आहे. देशाच्या ईशान्य भागात ओडर नदीच्या काठावर व पोलंड देशाच्या सीमेजवळ वसलेल्या ओस्त्राव्हा शहराची लोकसंख्या सुमारे ३.१ लाख तर महानगराची लोकसंख्या ११ लाखाहून अधिक आहे.

ओस्त्राव्हा
Ostrava
चेक प्रजासत्ताकमधील शहर


ध्वज
चिन्ह
ओस्त्राव्हा is located in चेक प्रजासत्ताक
ओस्त्राव्हा
ओस्त्राव्हा
ओस्त्राव्हाचे चेक प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 49°50′08″N 18°17′33″E / 49.83556°N 18.29250°E / 49.83556; 18.29250

देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
प्रदेश मोराव्हियन-सिलेसियन प्रदेश
स्थापना वर्ष इ.स. १२६७
क्षेत्रफळ २१४ चौ. किमी (८३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,१०,४६४
  - घनता १,४५० /चौ. किमी (३,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.ostrava.cz

चेकोस्लोव्हाकियाच्या कम्युनिस्ट राजवटीदरम्यान येथील कोळशाच्या खाणींमुळे ओस्त्राव्हामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह उत्पादन कारखाने काढण्यात आले. ह्यांमधील अनेक कारखाने बंद करण्यात आले असले तरी आजही ओस्त्राव्हा हे युरोपियन संघामधील सर्वात प्रदुषित शहरांपैकी एक मानले जाते.


जुळी शहरे संपादन करा

ओस्त्राव्हाचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

संदर्भ संपादन करा

  1. ^ "Dresden – Partner Cities". 2008 Landeshauptstadt Dresden. Archived from the original on 2010-06-17. 29 December 2008 रोजी पाहिले.
  2. ^ "Partnership towns of the City of Košice" (Slovak भाषेत). 2007–2009 City of Košice Magistrát mesta Košice, Tr. SNP 48/A, 040 11 Košice. Archived from the original on 2009-08-17. 12 July 2009 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन करा

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: