ॲकितेन
अॅकितेन (फ्रेंच: Aquitaine; ऑक्सितान: Aquitània; बास्क: Akitania) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश आहे. फ्रान्सच्या नैऋत्य भागामध्ये पिरेनीज पर्वतरांगेमध्ये वसलेल्या अॅकितेनच्या दक्षिणेला स्पेन तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. बोर्दू ही अॅकितेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
आक्युतेन Aquitaine | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
आक्युतेनचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | बोर्दू | ||
क्षेत्रफळ | ४१,३०८ चौ. किमी (१५,९४९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३१,५०,८९० | ||
घनता | ७६.७ /चौ. किमी (१९९ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-B | ||
संकेतस्थळ | aquitaine.fr |
इतिहासपूर्व काळात अॅकितेन हा गॉलमधील एक प्रदेश होता. रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट ऑगस्टसने हा भाग इ.स. पूर्व २७ मध्ये काबीज केला. आकितेनच्या ड्युकने अनेक शतके येथे राज्य केले. इ.स. ११३७ मध्ये अॅकितेनच्या एलॅनॉरने सातव्या लुईसोबत लग्न केल्यानंतर अॅकितेनची सत्ता फ्रेंचांच्या ताब्यात आली परंतु इ.स. ११५४ साली एलॅनॉरने हे लग्न मोडून इंग्लंडच्या दुसऱ्या हेन्रीशी लग्न केले ज्यामुळे अॅकितेनची मालकी इंग्रजांकडे आली. इ.स. १४५३ मध्ये शंभर वर्षांचे युद्ध संपल्यानंतर अॅकितेन प्रदेश पुन्हा एकदा फ्रान्सच्या अंमलाखाली आला. अॅकितेन हा फ्रान्समधील एक कृषिप्रधान प्रदेश आहे. वाइन उत्पादन, शेती, मासेमारी हे येथील प्रमुख उद्योग आहेत. इ.स. ४८ पासून बनवली जात असणारी बोर्दू वाइन जगप्रसिद्ध आहे. सध्या येथे अंदाजे ७० कोटी बाटल्या वाइन बनवली जाते.
२०१६ साली ॲकितेन, लिमुझे व पॉयतू-शाराँत हे तीन प्रदेश एकत्रित करून नुव्हेल-अॅकितेन नावाचा मोठा प्रदेश स्थापन करण्यात आला.
विभाग
संपादनखालील पाच विभाग अॅकितेन प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.
खेळ
संपादनबाह्य दुवे
संपादन- (फ्रेंच) ॲकितेन प्रादेशिक समिती Archived 2016-10-12 at the Wayback Machine.
- (इंग्रजी) डीमॉझ
- (इंग्रजी) पर्यटन माहिती
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |