इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
नोव्हेंबर २०१६ आणि जानेवारी २०१७ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघ पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने जुलै २०१६ मध्ये दौऱ्याच्या तारखा जाहीर केल्या.[४] कसोटी मालिका समाप्त झाल्यानंतर इंग्लंडचा संघ मायदेशी परतला आणि एकदिवसीय सामन्यासाठी पुन्हा भारतात आला.[५]
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७ | |||||
भारत | इंग्लड | ||||
तारीख | ९ नोव्हेंबर २०१६ – १ फेब्रुवारी २०१७ | ||||
संघनायक | विराट कोहली | अलास्टेर कुक (कसोटी) आयॉन मॉर्गन (ए.दि. व टी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (६५५) | ज्यो रूट (४९१) | |||
सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (२८) | आदिल रशीद (२३) | |||
मालिकावीर | विराट कोहली (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | केदार जाधव (२३२) | जासन रॉय (२२०) | |||
सर्वाधिक बळी | हार्दिक पंड्या (५) जसप्रीत बुमराह (५) |
ख्रिस वोक्स (६) | |||
मालिकावीर | केदार जाधव (भा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुरेश रैना (१०४) | ज्यो रूट (१२६) | |||
सर्वाधिक बळी | युझवेंद्र चहल (८) | ख्रिस जॉर्डन (५) | |||
मालिकावीर | युझवेंद्र चहल (भा) |
भारताने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सुधारित डीआरएस पद्धत वापरण्यास सहमती दर्शवली.[६][७] २००८ मध्ये एकदा चाचणी केल्यानंतर पहिल्यांदाच भारताचा समावेश असलेल्या द्विपक्षीय मालिकेमध्ये डीआरएस प्रणाली वापरली गेली.[८] परंतू, हॉटस्पॉटचा वापर केला गेला नाही.[९]
सदर कसोटी मालिका ॲंथोनी डीमेलो चषकासाठी खेळवली गेली, ज्यामध्ये भारताने ५-सामन्यांची मालिका ४-० अशी जिंकली.[१०] मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने ७ बाद ७५९ धावांवर डाव घोषित करून कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली.[११] पाचव्या कसोटीतील विजयामुळे भारत सलग १८ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहिला आणि स्वतःचा १७ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहण्याचा विक्रम मोडला.[१२] त्याशिवाय भारताने एका वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक ९ कसोटी सामने जिंकले.[१२]
मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघ जाहीर होण्या आधी, महेंद्रसिंग धोणीने मर्यादित षटकांच्या क्रिकेट कर्णधार पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले.[१३][१४] टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड करण्यात आली.[१५] भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोणीचा शेवटचा सामना होता इंग्लंड XI विरुद्ध १० जानेवारी २०१७ रोजी झालेला ५०-षटकांचा सामना.[१६]
एकदिवसीय मालिकेमध्ये तब्बल २०९० धावा केल्या गेल्या, तीन किंवा कमी सामन्यांच्या मालिकेमधील हा एक विक्रम आहे.[१७] सर्वच्या सर्व डावांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा नोंदवल्या गेल्या. भारताने एकदिवसीय आणि टी२० मालिका २-१ अशा जिंकल्या. इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मालिका जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ.[१८]
संघ
संपादनकसोटी | एकदिवसीय | टी२० | |||
---|---|---|---|---|---|
भारत[१९][२०] | इंग्लंड[२१][२२] | भारत[१५] | इंग्लंड[२३] | भारत[१५] | इंग्लंड[२३] |
- दुखापतीतून सावरल्यानंतर जेम्स अँडरसनचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला.[२४]
- दुखापतीतून सावरल्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुलचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला.[२५][२६]
- शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी दुखापतीतून सावरलेल्या भुवनेश्वर कुमारची भारतीय संघात निवड करण्यात आली, तर गौतम गंभीरला वगळण्यात आले.[२७]
- डाव्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याने मोहाली येथील तिसऱ्या कसोटीसाठी वृद्धिमान साहा ऐवजी पार्थिव पटेलची निवड करण्यात आली.[२७]
- पीसीए मैदानावर नेट्समध्ये सरावादरम्यान लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या ह्यांना दुखापत झाली. पंड्याला संघातून वगळण्यात आले, परंतु लोकेश राहुल चवथ्या कसोटीसाठी तंदरुस्त होण्याची अपेक्षा आहे.[२८]
- तिसऱ्या कसोटीदरम्यान इंग्लंडच्या हसीब हमीदच्या हाताला दुखापत झाल्याने, शस्त्रक्रियेसाठी त्याला मायदेशी परतावे लागले.[२९] त्याच्या ऐवजी किटन जेनिंग्सची संघात निवड करण्यात आली.[३०]
- पाठीच्या दुखण्यामुळे झफर अन्सारी ऐवजी लियाम डॉसनची इंग्लंडच्या संघात निवड करण्यात आली.[३०]
- इशांत शर्माला त्याच्या लग्नासाठी शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमधून सुट्टी देण्यात आली. त्याशिवाय दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने वृद्धिमान साहा चवथ्या कसोटीत सुद्धा खेळू शकणार नाही[३१][३२]
- बोटाला झालेल्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे शेवटच्या दोन कसोटींना मुकला. त्याची जागा मनीष पांडेने घेतली.[३३]
- मोहम्मद शमीचा गुडघा सुजल्यामुळे संघात शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली.[३३]
- दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे उर्वरित मर्यादित षटकांच्या सामन्यातून ॲलेक्स हेल्सला वगळण्यात आले.[३४]
- टी२० मालिकेसाठी हेल्स ऐवजी जॉनी बेरस्टोला निवडण्यात आले.[३५]
- टी २० मालिकेआधी, भारतीय संघातून रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली, त्यांच्या ऐवजी अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांना संघात स्थान देण्यात आले.[३६]
सराव सामने
संपादन५० षटके: भारत अ वि. इंग्लंड XI
संपादनवि
|
||
सॅम बिलिंग्स ९३ (८५) कुलदीप यादव ५/६० (१० षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड XI, गोलंदाजी
- महेंद्रसिंग धोणीचा (भा) कर्णधार म्हणून शेवटचा सामना.[१६]
- कुलदीप यादवचे (भारत अ) लिस्ट अ सामन्यायत पहिल्यांदाच ५ बळी.[३७]
५० षटके: भारत अ वि. इंग्लंड XI
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड XI, फलंदाजी
- प्रत्येकी १२ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: हसीब हमीद (इं).
- हसीब हमीद हा इंग्लंडचा सर्वात कमी वयाचा कसोटी सलामीवीर ठरला.[३८]
- ह्या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना.
- स्टुअर्ट ब्रॉडची (इं) ही १०० वी कसोटी.[३९]
- अलास्टेर कुक, इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे सर्वात जास्त ५५ कसोटीत नेतृत्व करणारा खेळाडू ठरला.[४०]
- अलास्टेर कुकचे इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील शतक हे त्याचे भारतातील पाचवे, आणि कोणत्याही पाहुण्या खेळाडूची सर्वात जास्त शतके.[४१]
- कर्णधार म्हणून अलास्टेर कुकचे १२वे शतक, इंग्लंडच्या कर्णधारांतर्फे त्याने सर्वात जास्त शतकांचा विक्रम केला.[४२]
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: भारत, गोलंदाज
- कसोटी पदार्पण: जयंत यादव (भा)
- विराट कोहली (भा) आणि ज्यो रूट (इं) दोघांची ५० वी कसोटी.[४३]
- मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा (भा) या दोघांच्या ३,००० कसोटी धावा पूर्ण.[४४]
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: करुण नायर (भा)
- पार्थिव पटेल हा दोन कसोटी सामन्यांच्या दरम्यान सर्वात जास्त (८३) कसोटी सामन्यांना मुकणारा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला.[४५]
४थी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: किटन जेनिंग्स (इं).
- पहिल्या दिवशी भुवनेश्वर कुमारने क्षेत्ररक्षण करताना फेकलेला चेंडू लागून मैदानावरील पंच पॉल रायफेल यांना दुखापत झाल्याने, त्यांच्या जागी मराईस इरास्मुस यांनी पंचगिरी केली आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन यांनी तिसऱ्या पंचांची भूमिका केली.[४६][४७]
- पदार्पणात कसोटौ शतक झळकावणारा किटन जेनिंग्स हा इंग्लंडचा पाचवा सलामीवीर तर कसोटी इतिहासातील ६९वा फलंदाज.[४८] त्याच्या ११२ धावा ह्या भारताविरुद्ध कसोटी पदार्पणात सलामीवीरातर्फे सर्वाधिक धावा.[४९]
- विराट कोहलीच्या (भा) ४,००० आणि कर्णधार म्हणून २,००० कसोटी धावा पूर्ण. तसेच भारतीय कर्णधार म्हणून आणि इंग्लंड विरुद्ध भारतातर्फे सर्वाधिक वैयक्तिक धावासंख्येचा विक्रम.[५०][५१]
- जयंत यादवचे (भा) पहिले शतक आणि नवव्या क्रमांकावरील भारतीय फलंदाज म्हणून पहिलेच शतक.[५१]
- रविंद्र जडेजा (भा) चे १०० कसोटी बळी पूर्ण.[५२]
- भारताची त्यांच्या सलग १७ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याच्या विक्रमाशी बरोबरी (१७ कसोटी).[५३]
- भारताची त्यांच्या सलग ५ कसोटी मालिका जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी.[५३]
५वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: लियाम डॉसन (इं)
- अलास्टेर कुक (इं) हा कसोटी क्रिकेटमध्ये ११,००० धावा पूर्ण करणारा दहावा आणि सर्वात लहान खेळाडू.[५४]
- करुण नायर (भा) हा पहिल्या कसोटी शतकाचे त्रिशतकात रुपांतर करणारा पहिला भारतीय फलंदाज. तसेच कसोटी त्रिशतक करणारा दुसरा भारतीय आणि त्याच्या नाबाद ३०३ धावा ह्या इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजाच्या सर्वात जास्त धावा तसेच कसोटी क्रिकेटमधील भारतीय फलंदाजातर्फे तिसरी सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या.[५५]
- पहिल्या डावातील भारताची धावसंख्या ही कसोटी क्रिकेटमधील भारतातर्फे सर्वात मोठी धावसंख्या, तसेच इंग्लंडविरुद्ध कोणत्याही संघातर्फे सर्वोच्च धावसंख्या[५५][५६]
- रविंद्र जडेजाचे (भा) कसोटी सामन्यामध्ये पहिल्यांदाच बळी.[१०]
- भारतीय संघाने सलग १८ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहून स्वतःचा विक्रम मोडला.[१२]
एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- बेन स्टोक्स हा इंग्लंडतर्फे भारतामध्ये सर्वात जलद एकदिवसीय अर्धशतक करणारा फलंदाज ठरला.[५७]
- इंग्लंडची भारतामध्ये आणि भारताविरुद्ध सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावसंख्या.[५७]
- विराट कोहलीचे (भा) यशस्वी पाठलाग करताना १५वे एकदिवसीय शतक, कोणत्याही फलंदाजातर्फे हा एक विक्रम आहे.[५७]
- भारताची धावसंख्या ही इंग्लंडविरुद्ध कोणत्याही संघाची यशस्वी पाठलाग करताना सर्वात मोठी धावसंख्या.[५८]
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- इंग्लंडची भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या, त्यांची पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा अयशस्वी पाठलाग[५९]
- महेंद्रसिंग धोणी आणि युवराजसिंग यांची २५६ धावांची भागीदारी ही इंग्लंडविरुद्ध भारताची सर्वोच्च भागीदारी.
- महेंद्रसिंग धोणीचे इंग्लंडविरुद्ध पहिले शतक.
- जेव्हा इंग्लंडच्या संघाच्या ३६० धावा झाल्या, ती वेळ ही कोणत्याही संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५० पेक्षा जास्त धावा करण्याची १००वी वेळ होती[६०]
- षटकांची गती कमी राखल्याने इंग्लंडच्या संघाला सामन्याच्या मानधनाच्या १०% तर कर्णधार आयॉन मॉर्गनला २०% दंड ठोठावण्यात आला.[६१]
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारग, गोलंदाजी
- विराट कोहलीच्या (भा) कर्णधार म्हणून सर्वात कमी डावांमध्ये १,००० धावा पूर्ण (१७ डाव).[१७]
टी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: परवेझ रसूल (भा)
- नितीन मेनन (भा) यांचा पंच म्हणून पहिला टी२० सामना.
- विराट कोहलीचा (भा) कर्णधार म्हणून पहिला टी२० सामना[६२]
- ह्या मैदानावरील पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना[६२]
- आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १,५०० धावा करणारा, आयॉन मॉर्गन हा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज.[६३]
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: रिषभ पंत (भा). भारतातर्फे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू.[१८]
- टी२० मध्ये पाच बळी घेणारा युझवेंद्र चहल हा भारताचा पहिलाच गोलंदाज. त्याची गोलंदाजीतील कामगिरी ही आंतरराष्ट्रीय टी२० मधील तिसरी सर्वोत्तम कामगिरी होय.[१८]
- टी२० अर्धशतक करण्यासाठी भारताच्या महेंद्रसिंग धोणीला सर्वात जास्त (६२) डाव खेळावे लागले.[६४]
- इंग्लंडच्या संघाचे ८ फलंदाज अवघ्या ८ धावांत बाद झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात वाईट कामगिरी आहे.[१८]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "इंग्लंडचा २०१६ चा बांगलादेश दौरा स्काय स्पोर्ट्स थेट प्रक्षेपित करणार". द गार्डीयन (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडच्या २०१६ बांगलादेश दौऱ्याचे प्रक्षेपण हक्क स्काय स्पोर्ट्सकडे". स्काय स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआय तर्फे सहा नव्या कसोटी मैदानांची घोषणा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारत-इंग्लंड कसोटी ९ नोव्हेंबरला सुरू होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारताचा मालिका विजय". महाराष्ट्र टाईम्स (इंग्रजी भाषेत). 2016-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि इंग्लंड: कसोटी मालिकेसाठी निर्णय पुनरावलोकन प्रणाली वापरण्यास यजमानांची सहमती". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "टीम इंडिया वापरणार डीआरएस". महाराष्ट्र टाइम्स. २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "इंग्लंड कसोटीसाठी भारत डीआरएस आजमावणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारत-इंग्लंड कसोटीसाठी हॉटस्पॉट नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "जडेजाच्या सात बळींनी मालिकेत भारताचा ४-० ने विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "नायरच्या त्रिशतकामुळे इंग्लंडचा अस्तित्त्वासाठी संघर्ष". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2016-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c "इंग्लंडच्या ४७७: डावाच्या पराभावाने शेवट झालेली सर्वात मोठी धावसंख्या". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वन डे, टी२०चं कर्णधारपद धोनीने सोडलं". महाराष्ट्र टाइम्स. 2017-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले". लोकसत्ता. ५ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c "टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी कोहली कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "भारत अ वि इंग्लंड: सराव सामन्यातील विजयाने पाहुण्यांची विश्वासू सूरवात". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "२०९० धावा आणि सहा ३०० पेक्षा अधिक धावसंख्यांची मालिका". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c d "रेकॉर्ड बोलिंग फिगर्स फॉर इंडिया, ॲंड अ नियर-रेकॉर्ड कॉलॅप्स फ्रॉम इंग्लंड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पंड्याचं 'हार्दिक' स्वागत, इशांतचं पुनरागमन". महाराष्ट्र टाइम्स. २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "रोहित, राहुल आणि धवन पहिल्या दोन इंग्लंड कसोट्यांना मुकणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात कोणताही बदल नाही". इंग्लंड ॲंड वेल्स बोर्ड (इंग्रजी भाषेत). २५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड कसोटी संघ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "भारतीय एकदिवसीय दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडच्या संघात येण्यास ॲंडरसन सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "लोकेश राहुलचे विशाखापट्टणम कसोटीत पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "विशाखापट्टणम येथे होणाऱ्या भारत वि इंग्लंडच्या २ऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुलचा भारतीय संघात समावेश". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात पार्थिव पटेलची वर्णी". लोकसत्ता. २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दुखापतग्रस्त हार्दीक पंड्या, लोकेश राहुलला भारतीय संघातून सुट्टी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "हाताच्या शस्त्रक्रियेसाठी हमीद मायदेशाकडे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "जेनिंग्स आणि डॉसन संघामध्ये". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). ७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पार्थिव मुंबई कसोटी खेळण्यासाठी सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "शमी, साहा चेन्नई कसोटीमधून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "बोटाच्या दुखापतीमुळे रहाणे शेवटच्या दोन कसोटींना मुकणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "हाताच्या फ्रॅक्चरमुळे हेल्स उर्वरित दौऱ्यातून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारतातील टी२० मालिकेसाठी ॲलेक्हेस ल्सची जागा जॉनी बेरस्टो घेणार". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मिश्रा, रसूलची भारतीय टी२० संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत).
|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ "बिलींगच्या ९३ धावांमुळे इंग्लंड XI चा ३०५ धावांचा यशस्वी पाठलाग". इएसपीएन क्रिकइन्फो. १० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "हसीब हमीदचे इंग्लंडकडून सलामीवीर म्हणून पदार्पण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ट्रायल बाय स्पेन बिगीन्स ॲज इंडिया रिन्यू रायव्हलरी विथ इंग्लंड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अलास्टेर कुक: इंग्लंडच्या कर्णधार भारत कसोटी मालिकेनंतर पायउतार होण्याची शक्यता". बीबीसी स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्जंडच्या संभाव्य विजयाच्या ४ गड्यांआधी सामना समाप्त". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारतापेक्षा इंग्लंडच्या स्पिनर्सची कामगिरी उजवी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "होम स्ट्रेंग्थ सेट टू बी टेस्टेड अगेन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "कोहलीचे मोठे शतक आणि पुजाराच्या ३००० धावा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अ लॉंग वेट, अ रेयर कमबॅक". इएसपीएन क्रिकइन्फो. २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "डोक्याला चेंडू लागल्याने रायफेल रुग्णालयात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मुंबई कसोटी:भूवीच्या थ्रोने अंपायर जखमी". महाराष्ट्र टाइम्स. ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "भारत वि इंग्लंड: जेनिंग्सच्या पदार्पणातील शतकाने इंग्लंडच्या डावाला धार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "किटन जेनिंग्सचा पदार्पणातील शतकाने ठसा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "कोहलीची गावस्कर, तेंडुलकर आणि द्रविडशी बरोबरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "कर्णधार कोहलीचे झळाळते वर्ष". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "कोहलीच्या भव्य द्विशतकामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "भारताची सर्वात मोठी अजिंक्य धाव आणि अश्विनचे सामन्यात अनेकवेळा दहा बळी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि इंग्लंड: चेन्नई कसोटी मध्ये मोईन अलीचे शतक, ज्यो रूट ८८". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "नायरच्या शतकाने भारत आघाडीवर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / कसोटी सामने / सांघिक नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c "आणखी एक विक्रमी पाठलाग, आणखी एक कोहलीची विशेष खेळी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि इंग्लंड : विराट कोहली आणि केदार जाधवचे पाठलाग करताना आकर्षक नेतृत्व". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि इंग्लंड: युवराज आणि धोणीने कटक मध्ये मालिका जिंकली". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १९ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "३५० पेक्षा जास्त धावसंख्येचे शतक". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि इंग्लंड: मालिका पराभवानंतर, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने इंग्लंडला दंड". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "भारत वि इंग्लंड, १ला टी२० सामना, कानपूर - पूर्वावलोकन". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2017-01-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि इंग्लंड: आयॉन मॉर्गन, ज्यो रूट आणि गोलंदाजांमुळे कानपूर टी२० मध्ये इंग्लंडचा विजय". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि इंग्लंड: युझवेंद्र चहल आणि महेंद्रसिंग धोणीचे टी२० मालिकेवर शिक्कामोर्तब". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन
इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७ |