ग्रेट लेक्स

(अमेरिकेतील ग्रेट लेक्स या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रेट लेक्स (इंग्लिश: Great Lakes; भव्य सरोवरे) ही उत्तर अमेरिका खंडाच्या ईशान्य भागात अमेरिकेची संयुक्त संस्थानेकॅनडा देशांच्या सीमेवरील गोड्या पाण्याची मोठी सरोवरे आहेत. ग्रेट लेक्समध्ये मिशिगन सरोवर, ह्युरॉन सरोवर, ईरी सरोवर, सुपिरियर सरोवरओन्टारियो सरोवर ह्या ५ सरोवरांचा समावेश होतो. एकत्रितपणे ग्रेट लेक्स हा पृथ्वीवरील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तर घनफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा (रशियातील बैकाल सरोवराखालोखाल) मोठा गोड्या पाण्याचा संचय आहे.[][] ग्रेट लेक्सच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ २,०८,६१० चौरस किमी व घनफळ २२,५६० घन किमी इतके आहे. जगातील एकूण गोड्या पाण्यापैकी २१ टक्के पाणी ग्रेट लेक्समध्ये एकवटले आहे.

उत्तर अमेरिकेमधील भव्य सरोवरांचे उपग्रहाने टिपलेले चित्र

भूगोल

संपादन

अमेरिकेची संयुक्त संस्थानेकॅनडाच्या सीमेवरील ही पाच भव्य सरोवरे एकमेकांना नैसर्गिकरित्या जोडली गेली आहेत. ह्यामुळे उत्तर अमेरिकेच्या मध्य भागापासून अटलांटिक महासागरापर्यंत पाण्याची एकसंध कडी निर्माण झाली आहे. सुपिरियर सरोवर ते ह्युरॉन-मिशिगन सरोवर ते ईरी सरोवर ते ओन्टारियो सरोवर असा पाण्याचा प्रवाह आहे. ओन्टारियो वगळता इतर चारही सरोवरांची उंची साधारण सारखी आहे तर ओन्टारियो सरोवराची उंची तुलनेत बरीच कमी आहे. ईरी सरोवर ते ओन्टारियो सरोवर ह्या प्रवाहामध्ये नायगारा धबधबा स्थित असल्यामुळे ह्या टप्प्यात जलवाहतूक शक्य नाही.

तपशील

संपादन
ईरी सरोवर ह्युरॉन सरोवर मिशिगन सरोवर ओन्टारियो सरोवर सुपिरियर सरोवर
पृष्ठ क्षेत्रफळ ९,९४० चौ. मैल (२५,७०० चौ. किमी) २३,०१० चौ. मैल (५९,६०० चौ. किमी) २२,४०० चौ. मैल (५८,००० चौ. किमी) ७,५४० चौ. मैल (१९,५०० चौ. किमी) ३१,७०० चौ. मैल (८२,००० चौ. किमी)
पाण्याचे घनफळ ११६ घन मैल (४८० किमी) ८४९ घन मैल (३,५४० किमी) १,१८० घन मैल (४,९०० किमी) ३९३ घन मैल (१,६४० किमी) २,९०० घन मैल (१२,००० किमी)
उंची[] ५७१ फूट (१७४ मी) ५७७ फूट (१७६ मी) ५७७ फूट (१७६ मी) २४६ फूट (७५ मी) ६०० फूट (१८० मी)
सरासरी खोली[] ६२ फूट (१९ मी) १९५ फूट (५९ मी) २७९ फूट (८५ मी) २८३ फूट (८६ मी) ४८३ फूट (१४७ मी)
कमाल खोली २१० फूट (६४ मी) ७७० फूट (२३० मी) ९२३ फूट (२८१ मी) ८०८ फूट (२४६ मी) १,३३२ फूट (४०६ मी)
प्रमुख शहरे बफेलो
क्लीव्हलंड
ईरी
टॉलिडो
आल्पेना
बे सिटी
पोर्ट ह्युरॉन
सार्निया
शिकागो
गॅरी
ग्रीन बे
मिशिगन सिटी
मिलवॉकी
मस्केगन
ट्रॅव्हर्स सिटी
हॅमिल्टन
किंगस्टन
मिसिसागा
रॉचेस्टर
टोरॉंटो
डुलुथ
मार्के
सॉल्ट सेंट मरी
सुपिरियर
ग्रेट लेक्सची तुलनात्मक सरासरी उंची, खोली व पाण्याचे घनफळ
टिपा: प्रत्येक आयताचे क्षेत्रफळ सरोवराच्या घनफळाच्या प्रमाणाचे आहे.
संदर्भ: ईपीए[]
 
शिकागो हे ग्रेट लेक्स परिसरातील सर्वात मोठे शहर आहे.
 
टोरॉंटो हे ग्रेट लेक्स परिसरातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
डेट्रॉईट हे ग्रेट लेक्स परिसरातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे

ग्रेट लेक्सच्या भोवताली कॅनडाचा ओन्टारियो हा प्रांतअमेरिकेची मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, इंडियाना, मिशिगन, ओहायो, पेनसिल्व्हेनिया आणि न्यू यॉर्क ही राज्ये आहेत. मिशिगन सरोवर वगळता इतर चारही सरोवरांमधून अमेरिका व कॅनडाची सीमा ठरवली गेली आहे. मिशिगन सरोवर पूर्णपणे अमेरिकेच्या अंतर्गत आहे.

नद्या

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "LUHNA Chapter 6: Historical Landcover Changes in the Great Lakes Region". Biology.usgs.gov. 2003-11-20. 2011-02-19 रोजी पाहिले.
  2. ^ Ghassemi, Fereidoun (2007). Inter-basin water transfer. Cambridge, Cambridge University Press. ISBN 0-52-186969-2. line feed character in |publisher= at position 32 (सहाय्य)
  3. ^ a b "Great Lakes Atlas: Factsheet #1". United States Environmental Protection Agency. March, 9th, 2006 and French. 2007-12-03 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Grady, Wayne (2007). द ग्रेट लेक्स. Vancouver: Greystone Books and David Suzuki Foundation. p. pgs. 42–43. ISBN 9781553651970.

बाह्य दुवे

संपादन