मिलवॉकी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या विस्कॉन्सिन राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर विस्कॉन्सिनच्या पूर्व भागात लेक मिशिगनच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून ते शिकागो शहराच्या उत्तरेला ९० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.९५ लाख शहरी व १५.५५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मिलवॉकी अमेरिकेमधील २८वे मोठे शहर व ३९वे महानगर क्षेत्र आहे.

मिलवॉकी
Milwaukee
अमेरिकामधील शहर


ध्वज
मिलवॉकी is located in विस्कॉन्सिन
मिलवॉकी
मिलवॉकी
मिलवॉकीचे विस्कॉन्सिनमधील स्थान
मिलवॉकी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मिलवॉकी
मिलवॉकी
मिलवॉकीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 43°3′8″N 87°57′21″W / 43.05222°N 87.95583°W / 43.05222; -87.95583

देश Flag of the United States अमेरिका
राज्य विस्कॉन्सिन
स्थापना वर्ष जानेवारी ३१, इ.स. १८४६
क्षेत्रफळ २५१.७ चौ. किमी (९७.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६१७ फूट (१८८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५,९४,८३३
  - घनता २,३९९.५ /चौ. किमी (६,२१५ /चौ. मैल)
  - महानगर १५,५५,९०८
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
city.milwaukee.gov

मिलवॉकीची स्थापना १८४६ साली सॉलोमन जुनू ह्या फ्रेंच शोधकाने केली. त्यानंतर येथे जर्मन वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. मिलवॉकीवर जर्मन संस्कृतीचा पगडा आजही जाणवतो. विसाव्या शतकामध्ये एक मोठे औद्योगिक केंद्र असलेल्या मिलवॉकीची गेल्या काही दशकांमध्ये अधोगती झाली आहे.

भूगोल

संपादन

हवामान

संपादन

मिलवॉकीमधील हवामान थंड स्वरूपाचे आहे. येथील हिवाळे प्रदीर्घ, रूक्ष व अतिथंड तर उन्हाळे सौम्य असतात.

मिलवॉकी विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 63
(17)
68
(20)
82
(28)
91
(33)
94
(34)
104
(40)
105
(41)
103
(39)
99
(37)
89
(32)
77
(25)
68
(20)
105
(41)
सरासरी कमाल °फॅ (°से) 28.0
(−2.2)
32.5
(0.3)
42.6
(5.9)
53.9
(12.2)
66.0
(18.9)
76.3
(24.6)
81.1
(27.3)
79.1
(26.2)
71.9
(22.2)
60.2
(15.7)
45.7
(7.6)
33.1
(0.6)
55.87
(13.27)
सरासरी किमान °फॅ (°से) 13.4
(−10.3)
18.3
(−7.6)
27.3
(−2.6)
36.4
(2.4)
46.2
(7.9)
56.3
(13.5)
62.9
(17.2)
62.1
(16.7)
54.1
(12.3)
42.6
(5.9)
31.0
(−0.6)
19.4
(−7)
39.17
(3.98)
विक्रमी किमान °फॅ (°से) −26
(−32)
−26
(−32)
−10
(−23)
12
(−11)
24
(−4)
33
(1)
40
(4)
42
(6)
28
(−2)
18
(−8)
−14
(−26)
−22
(−30)
−26
(−32)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 1.85
(47)
1.65
(41.9)
2.59
(65.8)
3.78
(96)
3.06
(77.7)
3.56
(90.4)
3.58
(90.9)
4.03
(102.4)
3.30
(83.8)
2.49
(63.2)
2.70
(68.6)
2.22
(56.4)
34.81
(884.1)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 15.0
(38.1)
11.3
(28.7)
7.4
(18.8)
2.6
(6.6)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.4
(1)
3.7
(9.4)
11.9
(30.2)
52.4
(133.1)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 12.3 10.1 11.9 12.8 10.9 10.7 10.2 9.9 9.1 9.6 11.4 11.7 130.6
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 10.4 7.7 6.1 2.0 0 0 0 0 0 0.3 3.4 8.5 38.4
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 139.5 152.6 186.0 213.0 275.9 303.0 322.4 282.1 216.0 176.7 114.0 105.4 २,४८६.६
स्रोत #1: NOAA,[] National Weather Service (extremes)[]
स्रोत #2: HKO (sun, 1961-1990)[]

जनसांख्यिकी

संपादन
ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १८५० २०,०६१
इ.स. १८६० ४५,२४६ +१२५%
इ.स. १८७० ७१,४४० +५७%
इ.स. १८८० १,१५,५८७ +६१%
इ.स. १८९० २,०४,४६८ +७६%
इ.स. १९०० २,८५,३१५ +३९%
इ.स. १९१० ३,७३,८५७ +३१%
इ.स. १९२० ४,५७,१४७ +२२%
इ.स. १९३० ५,७८,२४९ +२६%
इ.स. १९४० ५,८७,४७२ +१%
इ.स. १९५० ६,३७,३९२ +८%
इ.स. १९६० ७,४१,३२४ +१६%
इ.स. १९७० ७,१७,०९९ −३%
इ.स. १९८० ६,३६,२१२ −११%
इ.स. १९९० ६,२८,०८८ −१%
इ.स. २००० ५,९६,९७४ −५%
इ.स. २०१० ५,९४,८३३ −०%

२०१० च्या जनगणनेनुसार मिलवॉकी शहराची लोकसंख्या ५,९४,८३३ इतकी होती जी २००० सालापेक्षा ०.४ टक्क्यांनी कमी आहे. अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ३० वर्षांदरम्यान येथील लोकसंख्या काही प्रमाणावर घटली आहे. येथील ३९.२ टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत. एका अहवालानुसार मिलवॉकी हे अमेरिकेमधील सर्वाधिक वर्णद्वेषी शहर आहे.[]

मिलवॉकीच्या स्थापनेपासून जर्मन वंशीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले असून सध्या येथील २० टक्के जनता जर्मन वंशीय कुळांची आहे.

अर्थव्यवस्था

संपादन

अमेरिकेमधील सर्वात मोठ्या १००० कंपन्यांपैकी १४ कंपन्यांची मुख्यालये मिलवॉकी महानगर क्षेत्रात आहेत. आरोग्यसेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग असून बँकिंग व इतर आर्थिक सेवा तसेच उत्पादन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख अंगे आहेत. मिलवॉकीच्या जर्मन इतिहासामुळे बीयर उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग होता. अनेक वर्षे मिलवॉकी हे बियर उत्पादन करणारे जगातील सर्वात मोठे शहर होते. इ.स. १८४३ साली मिलवॉकीमध्ये येथे १३८ बीयर कारखाने होते. तीव्र स्पर्धेमुळे येथील बरेचसे उत्पादक इतरत्र स्थानांतरित झाले व सध्या मिलवॉकीमध्ये केवळ एकच मोठा बियर उत्पादक राहिला आहे.

लेक मिशिगनच्या काठावरील स्थानामुळे पर्यटन हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.

वाहतूक

संपादन

अमेरिकेमधील बहुसंख्य शहरांप्रमाणे वैयक्तिक मोटार हा मिलवॉकीमधील नागरी वाहतूकीचा सर्वात मोठा पैलू आहे. मिलवॉकीला मॅडिसनशिकागोसोबत जोडणारा इंटरस्टेट महामार्ग ९४ग्रीन बेसोबत जोडणारा इंटरस्टेट महामार्ग ४३ हे येथील सर्वात मोठे द्रुतगती महामार्ग आहेत. तसेच इतर अनेक मोठे रस्ते व महामार्ग मिलवॉकीला उपनगरांसोबत जोडतात. नागरी वाहतूकीसाठी बससेवा उपलब्ध आहे.

खालील व्यावसायिक संघ मिलवॉकीमध्ये स्थित आहेत. तसेच नॅशनल फुटबॉल लीगमधील ग्रीन बे पॅकर्स हा संघ मिलवॉकीच्या १०० मैल उत्तरेला ग्रीन बे येथे स्थित असून तो मिलवॉकी भागामधीलच एक संघ समजला जातो.

संघ खेळ लीग स्थान
मिलवॉकी ब्रुअर्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल मिलर पार्क
मिलवॉकी बक्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन ब्रॅडली सेंटर

शहर रचना

संपादन
इ.स. १८९८ साली रेखाटलेले मिलवॉकीचे विस्तृत चित्र
रात्रीच्या वेळी टिपलेले आधुनिक मिलवॉकीचे चित्र

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "Climatography of the United States No. 20: Milwaukee Mitchell AP, WI 1971-2000" (PDF). National Oceanic and Atmospheric Administration. July 2011. 2010-04-27 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "Normals and Extremes for Milwaukee and Madison". National Weather Service. 2008. 2009-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-10-24 रोजी पाहिले.
  3. ^ "Climatological Normals of Milwaukee". Hong Kong Observatory. 2010-08-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-13 रोजी पाहिले.
  4. ^ "The 10 most segregated urban areas in America". www.salon.com. March 29, 2011.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: