२०१५-१७ आयसीसी आंतरखंडीय चषक
२०१५-१७ सालांतली आयसीसी आंतरखंडीय चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसीने) संस्थेच्या प्रमुख सहभागी सदस्य देशांदरम्यान भरवलेल्या आंतरराष्ट्रीय प्रथम वर्गीय क्रिकेट स्पर्धेची सातवी फेरी आहे. ही फेरी २०१७सालापर्यंत चालणार आहे. या २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेत नेहमीपेक्षा जरा वेगळे संघ आहेत. आयर्लंडचा आणि अफगाणिस्तानचा संघ हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी घेतलेल्या पात्रता प्रक्रिया रँकिंगमध्ये पात्र ठरले आहेत. मात्र देशांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी केन्या आणि नेपाळ हे देश वगळले आहेत. मात्र ते चार-दिवसीय सामन्यांत खेळू शकतील.
२०१५-१७ आयसीसी आंतरखंडीय चषक | |
---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती |
क्रिकेट प्रकार | प्रथम वर्गीय क्रिकेट |
स्पर्धा प्रकार | साखळी सामने |
यजमान | बदलते (देशातील आणि देशाबाहेरील) |
सहभाग | ८ |
सामने | २९ |
जानेवारी २०१४ मध्ये आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संरचनेत केलेल्या बदलाचा एक परिणाम म्हणून, २०१५-१७ आंतरखंडीय चषक (आणि स्पर्धेच्या पुढील आवृत्त्यांचा) विजेता संघ कसोटी क्रमवारीमधील तळाच्या संघांशी चार पाच-दिवसीय सामने खेळेल (दोन मायदेशी आणि दोन परदेशी), जी स्पर्धा २०१८ आयसीसी कसोटी चॅलेंज म्हणून ओळखली जाईल.[१][२][३][४] आंतरखंडीय चषक विजेते राष्ट्र जर आयसीसी कसोटी चॅलेंज स्पर्धासुद्धा जिंकले तर ते राष्ट्र ११वे कसोटी राष्ट्र होईल.[५]
संघ
संपादन२०११-१३ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेत, २०१४ विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत आणि २०१५ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन निकालाधारित स्पर्धेत खालील ८ संघ सहभागी आहेत.
- आयर्लंड (१:-२०११-१३ आयसीसी विश्व क्रिकेट लीग)
- अफगाणिस्तान (२:-२०११-१३ आयसीसी विश्व क्रिकेट लीग)
- स्कॉटलंड (१:-२०१४ विश्वचषक क्रिकेट पात्रता)
- संयुक्त अरब अमिराती (२:-२०१४ विश्वचषक क्रिकेट पात्रता)
- हाँग काँग (३:-२०१४ विश्वचषक क्रिकेट पात्रता)
- पापुआ न्यू गिनी (४:-२०१४ विश्वचषक क्रिकेट पात्रता)
- नेदरलँड्स (१:-२०१५ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन)
- नामिबिया (२:-२०१५ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन)
तयारी
संपादन२०१५-१७ आयसीसी आंतरखंडीय चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठ संघांपैकी केवळ पापुआ न्यू गिनीचा संघ याआधी प्रथम-श्रेणी सामना खेळलेला नाही.[६] अफगाणिस्तान, आयर्लंड, नामिबिया, स्कॉटलंड, नेदरलँड्स आणि युएई हे सर्व संघ याआधी २०११-२०१३ आंतरखंडीय चषक स्पर्धेत सहभागी झाले होते आणि हाँगकाँग याआधी २००५ आंतरखंडीय चषक स्पर्धेत आणि २००६ च्या शेवटी २००६/०७ एसीसी फास्ट ट्रॅक कंट्रीज टुर्नामेंटमध्ये सहभागी झाला होता.
एकही प्रथम श्रेणी सामना न खेळलेला पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघ हा २०१३ आणि २०१४ मध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियन प्रीमियर लीगमध्ये दोन दिवसांचे क्रिकेट खेळला आहे. दोन्ही हंगामात हा संघ अगदी तळाशी होता तरी त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या तीन-दिवसीय सामन्यात हाँगकाँग संघाचा धुव्वा उडवला. ह्या सामन्यांमुळे बहु-दिवसीय सामन्यांत आपल्या खेळाडूंना अनुभव मिळाल्याचे पीएनजीच्या सलामीवीरांपैकी एकाने कबूल केले.[६]
वेळापत्रक
संपादनसामने खालील वेळापत्रकानुसार होतील:[७]
गुण तालिका
संपादनसंघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णित | रद्द | गुण | भाग |
---|---|---|---|---|---|---|---|---|
अफगाणिस्तान | ५ | ४ | ० | ० | १ | ० | ८१ | १.८७७ |
आयर्लंड | ५ | ४ | १ | ० | ० | ० | ८० | १.३३३ |
नेदरलँड्स | ५ | २ | २ | ० | १ | ० | ४९ | ०.८४८ |
पापुआ न्यू गिनी | ५ | २ | ३ | ० | ० | ० | ४० | ०.८३० |
हाँग काँग | ५ | १ | २ | ० | ० | १ | ३९ | १.०१४ |
स्कॉटलंड | ४ | ० | १ | ० | २ | १ | ३० | ०.८९६ |
संयुक्त अरब अमिराती | ५ | १ | ३ | ० | १ | ० | २७ | ०.८५१ |
नामिबिया | ४ | १ | ३ | ० | ० | ० | २० | ०.६५२ |
- विजय – १४ गुण
- बरोबरी – ७ गुण
- अनिर्णित (जास्त १० तास गमावले तर) – ७ गुण (अन्यथा ३ गुण)
- गोलंदाजी एकही चेंडू न खेळवता – १० गुण
- पहिल्या डावात आघाडी (अंतिम परिणाम स्वतंत्र) – ६ गुण (३ गुण पहिल्या डावात बरोबरी झाल्यास)
सामने
संपादनफेरी १
संपादनपहिल्या फेरीचे सामने ५ मे २०१५ रोजी जाहीर करण्यात आले.[८]
१०-१३ मे २०१५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: नामिबिया, फलंदाजी.
- प्रथम-श्रेणी पदार्पण: बाबर हयात, इहसन नवाझ, हसीब अमजद, रॉय लम्सम, निझाकात खान, सखावत अली, तनवीर अफझल आणि वकास बरकत (सर्व हाँग काँग).
२-५ जून २०१५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी.
- पाऊस आल्यामुळे सामना उशिरा चालू झाला.
- एड जॉईसच्या २३१ धावा ह्या अनेक-दिवसीय क्रिकेटमधील आयर्लंडतर्फे सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आणि घरच्या मैदानावर आयरिश खेळाडूतर्फे पहिले दुहेरी शतक.[९][१०]
२-५ जून २०१५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: अफगाणिस्तान, गोलंदाजी.
- पाऊस आल्यामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशीही मैदान ओले असल्यामुळे दुपारी २ वाजता डाव चालू झाला. तिसऱ्या दिवशी सुद्धा खेळ दुपारी २.५० चालू झाला. चौथ्या दिवशी चहापानानंतर पाऊस सुरू झाला.
- प्रथम-श्रेणी पदार्पण: अँड्र्यू उमीद (स्कॉटलंड).
१६-१९ जून २०१५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पापुआ न्यू गिनी, गोलंदाजी
- प्रथम-श्रेणी पदार्पण: मॅक्स ओडोवद (नेदरलँड), चार्ल्स अमिनी, माहुरू दाई, विली गव्हेर, वणी मोरिया, लॉअ नॉउ, जॉन रेवा, लेग सिक्का, टोनी उर, असद वाला, नॉर्मन वेण्या आणि जॅक वारे (सर्व पीएनजी).
- पापुआ न्यू गिनीचा पहिला प्रथम-श्रेणी सामना होता.[११]
फेरी २
संपादनदुसऱ्या फेरीचे सामने ऑगस्ट २०१५ मध्ये जाहीर करण्यात आले.[१२]
८-११ सप्टेंबर २०१५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: स्कॉटलंड, गोलंदाजी.
- १ल्या दिवशी ओल्या मैदानामुळे खेळ होऊ शकला नाही.
- प्रथम-श्रेणी पदार्पण: राहील अहमद आणि बेन कूपर (दोन्ही नेदरलँड).
११-१४ नोव्हेंबर २०१५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: हाँगकाँग, फलंदाजी.
- प्रथम-श्रेणी पदार्पण: एजाज खान, अंशुमन रथ, ख्रिस्तोफर कार्टर, किंचित शाह (हाँगकाँग); योधीन पूंजा, काईस फारुक, राजा आदिल आणि लक्ष्मण श्रीकुमार (संयुक्त अरब अमिराती).
२१-२४ नोव्हेंबर २०१५
धावफलक |
वि
|
||
फेरी ३
संपादन३ऱ्या फेरीचे सामने डिसेंबर २०१५ मध्ये जाहीर करण्यात आले.[१३]
२१-२४ जानेवारी २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- मैदानावर पाणी साठून राहिल्यामुळे खेळ शक्य झाला नाही.[१४]
२१-२४ जानेवारी २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
- प्रथम-श्रेणी पदार्पण: फरहान अहमद, मोहम्मद शाहझाद, मोहम्मद उस्मान, मुहम्मद कलीम, कादिर अहमद आणि सकलेन हैदर (संयुक्त अरब अमिराती).
- जानेवारी २००८ मध्ये युएईला पराभून केल्यानंतर आयसीसी आंतरखंडीय चषक स्पर्धेत नेदरलँडचा हा पहिलाच परदेश विजय.[१५]
३१ जानेवारी - ३ फेब्रुवारी २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पापुआ न्यू गिनी, गोलंदाजी.
- १ल्या दिवशी अपुरा सुर्यप्रकाश आणि पावसामुळे २१ षटकांचा खेळ वाया.[१६]
- नायल ओ'ब्रायनचा (आयर्लंड) आंतरखंडीय चषक स्पर्धेत ५०वा बळी.[१७]
फेरी ४
संपादन४थ्या फेरीच्या तारखा एप्रिल २०१६ मध्ये जाहीर करण्यात आल्या.[१८][१९]
२९ जुलै - १ ऑगस्ट २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: अफगाणिस्तान, गोलंदाजी
- प्रथम-श्रेणी पदार्पण: शेन स्नॅटर (ने) आणि इहसानुल्लाह (अ)
- दौलत झाद्रानची (अ) कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी (७/७७).[२०]
९-१२ ऑगस्ट २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: स्कॉटलंड, गोलंदाजी.
- १ल्या दिवशी ओल्या मैदानामुळे सामना ३ वाजता सुरू झाला.
- दुसऱ्या दिवशी पावसामुळे फक्त ७ षटकांचा खेळ होऊ शकला.
- ३ऱ्या आणि ४थ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
- प्रथम-श्रेणी पदार्पण: मार्क वॅट आणि ख्रिस सोल (स्कॉ) आणि मोहम्मद कासिम (सं)
३० ऑगस्ट - २ सप्टेंबर २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: आयर्लंड, फलंदाजी
- प्रथम श्रेणी पदार्पण: एहसान खान, निनाद शाह, तन्वीर अहमद, वकास खान (हॉ)
- निझाकत खानचे (हॉ) पहिले प्रथम-श्रेणी शतक
१६-१९ ऑक्टोबर २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पापुआ न्यु गिनी, फलंदाजी
- प्रथम श्रेणी पदार्पण: दोगोडो बाउ (पान्युगि)
- पापुआ न्यु गिनीचा घरच्या मैदानावरील पहिला इंटरकॉन्टिनेन्टल चषक सामना.[२१]
फेरी ५
संपादनअफगाणिस्तान आणि आयर्लंड दरम्यानच्या सामन्याची तारीख क्रिकेट आयर्लंडने जुलै २०१६ मध्ये जाहीर केली.[२२] हाँगकाँग आणि नेदरलँड्स सामन्यांची तारीख कोनिंक्लिज्के नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाने डिसेंबर २०१६ मध्ये जाहीर केली.[२३]
१०-१३ फेब्रुवारी २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: नेदरलँड्स, गोलंदाजी
- प्रथम श्रेणी पदार्पण: मॅट स्टिलर (हाँ) आणि सिकंदर झुल्फिकर (नेदरलँड्स)
७-१० एप्रिल २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पापुआ न्यु गिनी, फलंदाजी
- प्रथम श्रेणी पदार्पण: नोसैना पोकाना (पान्युगि) आणि इम्रान हैदर (युएई).
- मुहम्मद उस्मान, साकलेन हैदर (युएई) आणि लेगा सिआका (पान्युगि) ह्या सर्वांची पहिली प्रथम-श्रेणी शतके.
फेरी ६
संपादन२०१७
[ धावफलक] |
वि
|
||
२०१७
[ धावफलक] |
वि
|
||
२०१७
[ धावफलक] |
वि
|
||
फेरी ७
संपादन२०१७
[ धावफलक] |
वि
|
||
२०१७
[ धावफलक] |
वि
|
||
संदर्भ
संपादन- ^ ब्रुक्स, टिम. "इज द आयसीसी टेस्ट चॅलेंज रियली द होली ग्रेल?". ऑल आऊट क्रिकेट (इंग्रजी भाषेत). १४ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.
- ^ "असोसिएट्स टू गेट अ शॉट ॲट टेस्ट क्रिकेट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.
- ^ विग्मोर, टिम. "आयसीसीच्या प्रस्तावामध्ये असोसिएट्ससाठी काय?". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१४ रोजी पाहिले.
- ^ गोल्लापुडी, नागराज. "११वा कसोटी देश?". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
- ^ "इंटरकॉन्टिनेन्टल कप २०१५–१७ साठी स्पर्धक सज्ज". आयसीसी (इंग्रजी भाषेत). 2015-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ मे २०१५ रोजी पाहिले.
- ^ a b मीट हनुबाडाज लेटेस्ट फ्लॅगबीअरर - द राईज ऑफ पीएनजीज लेगा सिआका बाय टिम विगमोर
- ^ "आयसीसी विश्व क्रिकेट लीग आणि इंटरकॉन्टिनेन्टल चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2015-02-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ फेब्रुवारी २०१५ रोजी पाहिले.
- ^ "इंटरकॉन्टिनेन्टल चषकाची सुरवात नामिबीया-हाँगकाँग सामन्याने". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मे २०१५ रोजी पाहिले.
- ^ "जॉयसच्या द्विशतकामुळे आयर्लंड वरचढ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०१५ रोजी पाहिले.
- ^ "इंटरकॉन्टिनेन्टल कप: युएईविरुद्ध आयर्लंडच्या एड जॉयसच्या विक्रमी २२९ धावा". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ३ जून २०१५ रोजी पाहिले.
- ^ "वालाच्या शतकाने पापुआ न्यु गिनीचा ऐतिहासिक विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ जून २०१५ रोजी पाहिले.
- ^ "टी२० क्वालिफायर को-चँप्स फेस ऑफ इन आय-कप अँड डब्लूसीएल चँपियनशीप". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ ऑगस्ट २-१५ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "तिसऱ्या फेरीमध्ये आयर्लंडचा सामना पापुआ न्यु गिनीशी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.
- ^ "इंटरकॉन्टिनेन्टल कप: पावसामुळे स्कॉटलंड वि हाँग काँग सामना रद्द". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "डच ओव्हरकम अन्वर टन टू बीट युएई". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंटरकॉन्टिनेन्टल कप: आयर्लंड एज डे वन अगेन्स्ट पापुआ न्यु गिनी". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंटरकॉन्टिनेन्टल कप: पापुआ न्यु गिनीला हरवून आयर्लंड अग्रस्थानी". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ३ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "स्कॉटलंड टू होस्ट युएई इन ऑगस्ट". इएसपीएन क्रिकइन्फो. १० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "इंटरकॉन्टिनेन्टल कप आणि आयसीसी डब्लूसीएल चँपियनशीपचे ४थ्या फेरीचे सामने जाहीर". इएसपीएन क्रिकइन्फो. 2016-04-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झहीर, दौलतमुळे अफगाणिस्तानचा डावाने विजय". १० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वालाच्या शतकामुळे पापुआ न्यु गिनीचा नामिबियावर विजय". १० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड आणि अफगाणिस्तानची नऊ सामन्यांची मालिका जाहीर". क्रिकेट आयर्लंड. 2016-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "नेदरलँड्स नार दुबई एन हाँगकाँग". कोनिंक्लिज्के नेदरलँड्स क्रिकेट बाँड (डच भाषेत). 2016-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.