ग्रेटर नोएडा
ग्रेटर नोएडा हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. दिल्लीच्या ४८ किमी आग्नेयेस यमुना नदीच्या काठावर वसवले गेलेले ग्रेटर नोएडा भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे. नोएडाच्या दक्षिणेस स्थित असलेले ग्रेटर नोएडा भारतातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. ग्रेटर नोएडा नोएडासोबत नोएडा−ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्ग व नोएडा मेट्रोद्वारे तर आग्रासोबत यमुना द्रुतगतीमार्गाद्वारे जोडले गेले आहे. भारतीय ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीसाठी वापरण्यात येणारे बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट ग्रेटर नोएड येथेच आहे.
ग्रेटर नोएडा | |
उत्तर प्रदेशमधील शहर | |
![]() |
|
देश | ![]() |
राज्य | उत्तर प्रदेश |
जिल्हा | गौतम बुद्ध नगर |
स्थापना वर्ष | इ.स. १९९१ |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,०७,६७६ |
- घनता | ७३० /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
अधिकृत संकेतस्थळ |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2015-05-20 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत