अमिनी पार्क हे पोर्ट मॉरेस्बी, पापुआ न्यू गिनी स्थित क्रिकेट मैदान आहे.[१] बोरोकोच्या उपनगरातील बिसिनी परेड क्रीडा संकुलाचा भाग असलेले हे मैदान म्हणजे क्रिकेट पापुआ न्यू गिनीचे मुख्यालय आहे.

अमिनी पार्क
मैदान माहिती
स्थान बोरोको, पोर्ट मॉरेस्बी
स्थापना १९७१
मालक पापुआ न्यू गिनी क्रिकेट मंडळ
प्रचालक पापुआ न्यू गिनी क्रिकेट मंडळ

यजमान संघ माहिती
पापुआ न्यू गिनी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ (२००६-सद्य)
पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघ (१९७१-सद्य)
शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१७
स्रोत: हरारे स्पोर्टस् क्लब, क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

पापुआ न्यू गिनीच्या पुरुष आणि महिला संघात खेळलेल्या अमिनी कुटुंबाच्या अनेक सदस्यांच्या नावावरून मैदानाला नाव देण्यात आले.[२]

ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि व्हिक्टोरिया पुरुष संघ तर जपानचा महिला क्रिकेट संघ ह्या मैदानावर खेळला आहे.[३]

मे २०१६ मध्ये, २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेदरम्यान ह्या मैदानावर पहिला लिस्ट अ सामना खेळवला गेला, ज्यामध्ये पापुआ न्यू गिनी संघाने केन्या संघाला ६ गडी राखून पराभूत केले.[४] ऑक्टोबर २०१६ मध्ये मैदानावर पहिला प्रथम श्रेणी सामना खेळवला गेला. ह्या सामन्यामध्ये २०१५-१७ आयसीसी इंटरकॉंटिनेन्टल चषकाच्या ह्या सामन्यात पापुआ न्यू गिनी संघाने नामिबिया संघाला पराभूत केले.[५][६]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ अमिनी पार्क क्रिकआर्काईव्ह
  2. ^ पापुआ न्यू गिनी खेळाडू (अ) क्रिकेट आर्काईव्ह
  3. ^ अमिनी पार्कवरील इतर सामने क्रिकेट आर्काईव्ह
  4. ^ "आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा, २३वा सामनाः पापुआ न्यू गिनी वि. केन्या, पोर्ट मॉरेस्बी, २८ मे २०१६" (इंग्रजी भाषेत). २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "आयसीसी इंटरकॉंटिनेन्टल चषक ४थी फेरी आणि विश्व क्रिकेट लीग स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर". Archived from the original on 2016-04-29. 2017-02-21 रोजी पाहिले.
  6. ^ "आयसीसी इंटरकॉंटिनेन्टल चषक, पापुआ न्यू गिनी वि. नामिबिया, पोर्ट मॉरेस्बी, १६-१९ ऑक्टोबर २०१६" (इंग्रजी भाषेत). २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.