हिंदी भाषा
हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही भारत सरकारच्या कामकाजाची भाषा आहे अनेकजण हिंदीला राष्ट्रभाषा असे समजतात परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व २२ भाषा अधिकृत आहेत. आपला देश समानतेला महत्त्व देतो त्यामुळेच सर्व भाषा समान आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हिंदीला देवनागरी लिपी मध्ये लिहीतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हिंदी | |
---|---|
हिन्दी | |
प्रदेश | उत्तर भारत व मध्य भारत, नेपाळ, पाकिस्तान |
लोकसंख्या | १८ कोटी (१९९१) |
भाषाकुळ |
इंडो-युरोपीय
|
लिपी | देवनागरी, फारसी(मूळलिपी) |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | hi |
ISO ६३९-२ | hin |
2011 च्या भारताच्या जनगणनेनुसार, हिंदी ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी भाषा आहे, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर काश्मिरी, मेईटी (अधिकृतपणे मणिपुरी म्हणतात) तसेच गुजराती, तिसऱ्या स्थानावर आणि बंगाली चौथ्या स्थानावर आहे.[१]
- जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.
- भारतातील सर्वात जास्त खप आणि आवृत्त्या असलेली वर्तमानपत्रे हिंदी भाषेत प्रसिद्ध होतात.
- हिंदी चित्रपट भारतातच नाही तर जगभर पाहिले जातात.
- हिंदी चित्रपटसंगीत सर्वत्र लोकप्रिय आहे.
- चिनी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
- आंतरजालावर वापरलेल्या भाषांतल्या पहिल्या दहात हिंदी आहे.
- जिच्यातले अधिकाधिक साहित्य अन्य जागतिक भाषांत अनुवादित होते अशा पहिल्या विसात हिंदी आहे.
- भारतात अन्य भाषांत हिंदीतल्या अनेक शब्दांचा शिरकाव झाला आहे आणि त्या भाषांच्या व्याकरणावर हिंदीचा प्रभाव जाणवू लागला आहे.
भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगिकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे. जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.
हे सुद्धा पहा
संपादन- ^ Desk, Aishwaryaa R,DH Web. "What census data reveals about use of Indian languages". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2024-05-29 रोजी पाहिले.