मध्य भारत , ज्याला माळवा संघ म्हणूनही ओळखले जाते, हे पश्चिम-मध्य भारतातील एक भारतीय राज्य होते. हे राज्य २८ मे १९४८ रोजी पंचवीस संस्थानांचे एकत्रीकरण करून तयार केले गेले, जे १९४७ पर्यंत मध्य भारत एजन्सीचा भाग होते. त्याचे राज्यप्रमुख जिवाजीराव सिंधिया होते.

या राज्याचे क्षेत्रफळ ४६,४७८ चौरस मैल (१२०,३८० किमी) होते. ग्वाल्हेर त्याची हिवाळी राजधानी होती आणि इंदूर ही त्याची उन्हाळी राजधानी होती. राज्याच्या नैऋत्येला मुंबई (सध्याचा गुजरात आणि महाराष्ट्र ) , वायव्येला राजस्थान, पूर्वेला उत्तर प्रदेश आणि विंध्य प्रदेश व आग्नेयला भोपाळ आणि मध्य प्रदेश हे राज्य होते.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी, मध्य भारत हा विंध्य प्रदेश आणि भोपाळ या संस्थानांसह मध्य प्रदेशात विलीन झाला.

जिल्हे संपादन

मध्य भारत राज्यात १६ जिल्हे सामाविष्ट होते. हे जिल्हे ३ विभागांमध्ये विभागलेले होते. नंतर त्यांना घटवून २ विभाग करण्यात आले होते.

मध्य भारतातील जिल्हे :

१. भिंड

२. गिरद

३. मुरैना

४. गुना

५. शिवपुरी

६. राजगड

७. भिलसा

८. शाजापूर

९. उज्जैन

१०. इंदूर

११. देवास

१२. रतलाम

१३. धार

१४. झाबुआ

१५. रतलाम

१६. मंदसोर