हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग

(हावडा–अलाहाबाद–मुंबई रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. कोलकातामुंबई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा २,१२७ किमी लांबीचा मार्ग पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमहाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. बर्धमान, गया, अलाहाबाद, जबलपूर, भुसावळ, जळगाव इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. १८७० साली उघडण्यात आलेला हा मार्ग भारतामधील सर्वात जुन्या रेल्वेमार्गांपैकी एक आहे. आजच्या घडीला मुंबई व कोलकाता शहरांना जोडणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग हा कमी लांबीचा व संपूर्णपणे विद्युतीकरण झालेला मार्ग असल्यामुळे हावडा ते मुंबई धावणाऱ्या बव्हंशी गाड्या नागपूरमार्गेच जातात.

हावडा–अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग
प्रदेश पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमहाराष्ट्र
मालक भारतीय रेल्वे
चालक पूर्व रेल्वे, पूर्व मध्य रेल्वे, मध्य रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी २,१२७ किमी (१,३२२ मैल)
ट्रॅकची संख्या १/२
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण अंशत:
कमाल वेग १३० किमी/तास

प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.

  • हावडा-बर्धमान पट्टा
  • बर्धमान-आसनसोल पट्टा
  • आसनसोल-गया पट्टा
  • गया-मुघलसराई पट्टा
  • मुघलसराई-अलाहाबाद पट्टा
  • अलाहाबाद-जबलपूर पट्टा
  • जबलपूर-भुसावळ पट्टा
  • भुसावळ-कल्याण पट्टा
  • मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

१२३२१/१२३२२ मुंबई-हावडा मेल (अलाहाबाद मार्गे) ही गाडी संपूर्णपणे ह्या मार्गावरून धावते.