नाशिक रोड
नाशिक शहराचे एक उपनगर
नाशिक रोड हे नाशिक शहराचे एक उपनगर आहे. येथे भारतीय रेल्वेचे स्थानक आहे.
नाशिक रोड येथे नोटांचा छापखाना आहे. तसेच नाशिक शहराचे रेल्वे स्थानकही आहे. नाशिकरोड येथे पूर्वी मद्यार्काचा सरकारी कारखाना होता. तो कारखाना आता बंद केला आहे. नाशिकरोडचा जेलरोड हा भाग वेगाने विकसित झाला आहे. जेलरोडवर सरकारी तुरुंग आहे.
पंचवटी, सीबीएस(सेन्ट्रल बस स्टेशन) तसेच नाशिकरोड येथून पांडवलेणीकरिता बसेस सुटतात.