बर्धमान
बर्धमान (बांग्ला: বর্ধমান) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पूर्व बर्धमान जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. बर्धमान बंगालच्या मध्य भागात कोलकातापासून १५४ किमी अंतरावर स्थित आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्गावर असलेले बर्धमान रेल्वे स्थानक देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. येथे हावडा राजधानी एक्सप्रेससह बहुतेक सर्व प्रमुख रेल्वेगाड्यांचा थांबा आहे.
बर्धमान বর্ধমান |
|||||||
पश्चिम बंगालमधील शहर | |||||||
[[Image: Clockwise from the top : Curzon Gate, Bardhaman Science Centre(outside) |300 px|center]]Maa Durga puja, Shopping Mall, Sarbamangala temple Railway Station |
|||||||
देश | भारत | ||||||
राज्य | पश्चिम बंगाल | ||||||
जिल्हा | पूर्व बर्धमान जिल्हा | ||||||
क्षेत्रफळ | ५९ चौ. किमी (२३ चौ. मैल) | ||||||
समुद्रसपाटीपासुन उंची | १०० फूट (३० मी) | ||||||
लोकसंख्या (२०११) | |||||||
- शहर | ३,४६,६३९ | ||||||
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत