सहाय्य:अनामिक सदस्य


नमस्कार प्रिय अनामिक सदस्य,

आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे! अर्थात येथील लेखन-संकेत आणि ज्ञानकोशीय संस्कृतीचे पालन होण्याच्या दृष्टीने खालील सूचनांकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे हि नम्र विनंती.

अत्यावश्यक सूचना: आपण निर्मित करू इच्छित असलेल्या लेखाचे शीर्षक आणि लेखातील मजकूर मराठी देवनागरी लिपीत असल्याची खात्री करून घ्या. लेखन मराठी देवनागरी लिपीत असणे बंधनकारक आहे. देवनागरी नसलेला मजकूर वगळला जाण्याची दाट शक्यता असते. Trial & Error करता मुख्य लेखपानात लेखन करण्याचे टाळून विकिपीडिया:धूळपाटी येथे ट्रायल एरर करावे तसेच नवीन लेख बनवताना किमान एक परिच्छेदतरी विश्वकोशीय परिघात बसणारा मजकुर लिहिणे आवश्यक आहे, एखाद्या विषयावर नव्याने लेखन इतरांनी लिहून हवे असल्यास त्याची नोंद :हवे असलेले लेख येथे करावी (कृपया रिकामे लेख बनवणे आणि प्रायोगिक संपादने जतन करण्याचे टाळावे).


संपादन या क्रियेत नवीन विश्वकोशीय मजकुर लिहिणे, जुन्या मजकुरात दुरुस्ती आणि सुधारणा करणे,संदर्भ नमुद करणे, अविश्वकोशीय मजकुर वगळणे इत्यादी क्रियांचा समावेश होतो. आपण मराठी विकिपीडियावर प्रथमच संपादन करत असल्यास येथील सहाय्य आणि लेखन संस्कृतीचा अल्पावधीत परिचय करून घेण्याच्या दृष्टीने कृपया सर्वप्रथम हे ऑनलाईन सादरीकरण (ऑनलाईन पॉवरपॉईंट) पाहून घ्यावे ही आग्रहाची विनंती.


__असंपादनक्षम__


__असंपादनक्षम__