मराठी विकिपीडिया एक विश्वकोश असल्यामुळे मजकूर विश्वकोशास साजेशा स्वरूपात बसवावा लागतो, म्हणजे काय ते आपण खाली पुढे पाहू परंतु आपल्या लेखना बद्दल दिलेले कोणतेही संदेश केवळ पुर्नलेखनाची विनंती असतात. असे पुर्नलेखन तुम्ही स्वतःच पूर्ण केले पाहिजे असेही नाही,इतर मंडळीनी करिता ते तसेच सोडण्यासही तुम्ही मुक्त असता . त्यामुळे आपण आपले इतर लेखन किंवा वाचन चालू ठेऊन खालील सहाय्यपर लेखन सुद्धा आपल्या सवडीने जरूर तेवढेच वाचू शकता.
आपण लेखन केलेल्या लेखानापुढे शीर्षकलेखन संकेत, पुर्नलेखन,विकिकरण,संदर्भ द्या,व्यक्तिगत मते,शुद्धलेखन,पक्षपात,पूर्वग्रह अशा अर्थाचे काही संदेश, लेखन करणार्या संपादकास घाबरवण्याकरिता नव्हे तर आपल्या सारख्या नवागत सदस्यांच्या लेखनाकडे नियमीत जाणत्या सदस्यांचे लक्ष जावे आणि विकिपीडियाच्या स्वरूपास अनुकूल विकिकरण (बदल) करण्यास आपल्याला सहाय्य आणि सहयोग उपलब्ध व्हावा असे असते आणि कालौघात लेखात दर्जात्मक सुधारणा व्हावी असा उद्देश असतो.
त्या शिवाय असा संदेश कुणी लावला आहे ते लेखाच्या इतिहासात पाहून संबंधीत सहसंपादकाच्या चर्चा पानावर लेखाच्या चर्चा पानावर ,चावडी, मदत केंद्र इत्यादी ठिकाणी आपण आपले शंका निरसन करून घेऊ शकता. असे संदेश लावण्यात आपल्यालाही पुढाकार घावयाचा असेल तर विकिपीडियाचा दर्जा सांभाळण्याच्या अमूल्य कार्यात विकिपीडिया:पहारा आणि गस्त ,विकिकरण आणि इतर विवीध समन्वय प्रकल्पात आपण स्वतः सुद्धा सहभागी होऊ शकता.
मराठी विकिपीडिया केवळ एक विश्वकोश आहे.संबधीत माहिती संबधीत प्रकरणात (लेखात) लिहिणे अपेक्षीत असते.
विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो, जो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजक) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.
(इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते, वाचकाचा दृष्टीकोण आम्ही मोजक्या Facts आणि statistics वाचतो आम्हाला इतरांची परस्पर विरोधी मते विशीष्ट संदर्भा सहीत सांगा पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका, असा असतो.)
सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.
ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किवा सवयीचा भाग असेलतर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधी पासून असलेल्या एखाद दुसर्या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन बरोबर करून घेऊ शकता .
आपल्याला इतर नवागत सदस्य काय चूका करत असत्तात ते नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन त्रूटी लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा या लेखात घेता येईल.
माहीतगार १०:४०, ४ सप्टेंबर २००९ (UTC)