सम्राट कनिष्क
सम्राट कनिष्क (बॅक्ट्रियन भाषा: Κανηϸκι, कनेष्की; मध्ययुगीन चिनी भाषा: 迦腻色伽, कनिसक्का) हा मध्य आशिया आणि उत्तर भारताचा कुषाणवंशीय सम्राट होता. हा अंदाजे इ.स. १२७ ते इ.स. १५१ दरम्यान सत्तेवर होता. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सत्तेमध्ये येत राहिल्या त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुषण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमधील ज्यांनी राज्य स्थापन केले भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषण राज्यांनी केली नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशान शासकानी सुरू केली कुशान शासक कनिष्क याने साम्राज्याचा मोठा विस्तार केला कनिष्काचे साम्राज्य हे पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद ही काश्मीरमधल्या कुंडलवनात भरवण्यात आली कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले श्रीनगर जवळ असलेले कांपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले आहेत कनिष्काच्या दरबारात चरक प्रसिद्ध वैद्य होता.तो 'चरकसंहिते'चा दुसरा संपादक होता.कनिष्काने सोन्याचे नाणे प्रकरणांमध्ये आणले या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाहू नानू शाहू कनिष्क असा लेख आहे याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान असा आहे नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बुद्ध असे लिहिलेले आहे. त्याला दोन पत्नी होती ज्याचे नावामध्ये राणी सुप्रिया प्रमुख होती आणि दूसरी बायको विद्यामती होती. सुप्रियाकडून त्याला हुविष्क नावाचा मुलगा झाला आणि हुविष्काला नंतर आपली पत्नी भाग्यश्रीकडून वासुदेव प्रथम झाला.
सम्राट कनिष्क | ||
---|---|---|
सम्राट, धर्मनायक, कनिष्क महान | ||
सम्राट कनिष्क कालीन स्वर्ण मुद्रा, ब्रिटिश संग्रहालय | ||
अधिकारकाळ | इ.स. १२७ - इ.स. १५० | |
राज्यव्याप्ती | अफगाणिस्तान चीन कझाकस्तान भारत नेपाळ पाकिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान | |
राजधानी | पेशावर (पाकिस्तान) | |
जन्म | इ.स. | |
पेशावर, पाकिस्तान | ||
मृत्यू | इ.स. १५० | |
पेशावर, पाकिस्तान | ||
पूर्वाधिकारी | विमा कडपिसेज | |
उत्तराधिकारी | हुविष्क | |
पत्नी | सुप्रिया आणि विद्यामती | |
राजघराणे | कुषाण | |
धर्म | बौद्ध धर्म |
साम्राज्य
संपादनकनिष्क व बुद्ध मुर्ती
संपादनया कालावधी मध्ये अनेक बौद्ध कवी, जाणकार सम्राट कानिष्क यांनी जेव्हा पाटलीपुत्रवर हल्ला केला. त्याकाळी पाटलीपुत्र अजूनही बौद्ध संस्कृती नांदत असावी असे लक्षात येते, अनेक विद्वान यांना तो लढाई जिंकल्यानंतर तेव्हा तो विद्वान यांना सोबत घेऊन गेला असे लक्षात येते त्यामुळे तेथून पुढे तो बौद्ध धम्मात रुची घेऊ लागला व बौद्ध झाला. अश्वघोष याचे बौद्ध चरित्र त्याच्या काळात निर्माण झाले, गांधार कला प्रचलित झाली, बौद्ध साहित्य निर्माण झाले, वसुमित्र यांच्या अध्यक्षतेखाली काश्मीरमधील कुंडलवन विहार अथवा जालंधर मध्ये चौथी धम्म संगीती भरवली गेली असे दिसून येते. त्यात ५०० बौद्ध विद्वानांनी सहभाग घेतला, त्रिपिटकाचे पुनः संकलन व पुनसंस्करण झाले. त्याकालावधीत बौद्ध ग्रंथाचे संस्कृतमध्ये भाषांतार झाले, व पालीची जागा संस्कृत भाषेने घेतली आणि महायान हा बौद्ध संप्रदाय निर्माण झाला. महायान पंथाने संस्कृत भाषेतून बुद्ध शिकवण पसरली तर थेरवाद हा बौद्ध संप्रदाय पाली भाषाच वापरली. महायान पंथ आशियातील तिबेट, चीन, जपान, कोरिया व वियेतनाम देशात खूप वाढला.[१]
कानिष्कांनी अनेक लढाया चीनमधील राजांबरोबर केल्या. एकदाच हरला नंतर मात्र ते नेहमी जिंकले. त्याच्या काळी निर्माण करण्यात आलेले शिक्के खूप प्रचलित आहेत त्यामध्ये ग्रीक, इराणी, काल्पनिक देव-देवता, चंद्र, सूर्य, वायू, अग्नी देवता तसेच उभी असलेली बुद्धमूर्ती पाहावयास मिळते, त्यामूर्ती असलेले शिक्के आपणास राजकीय संग्रहालय मथुरा येथे पाहावयास मिळते.[२]
उभी असलेली बुद्धमुर्ती
संपादनगांधार शैलीमधील उभी असलेली बुद्ध मूर्ती ही पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील आहे यावर बौद्ध इतिहासकार यांचे एकमत आहे, ती मूर्ती तोक्यो मधील राष्ट्रीय संग्रहालयात आढळते. गांधार प्रदेश जो ओळखला जायचा तो सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानात आहे.
बसलेली बुद्धमूर्ती
संपादनही बुद्ध मूर्ती देखील गांधार शैली मधील आहे पण ती बसलेली मुद्रेमधील आहे यामध्ये तथागत Wheels Of Dhamma *धम्म चक्रप्रवर्तन मुद्रा* सांगतानाचा संदेश देतात अशी आहे. या मुद्रेमधील ज्या मूर्ती प्रसिद्ध आहेत त्या आपल्याला सारनाथ व जमलग्रही या ठिकाणी उत्खनमध्ये सापडल्या आहेत , सारनाथ संग्रहालय व जमलग्रही येथे आढळते.
शाक्यमुनी बुद्ध मूर्ती
संपादनमैत्रय बुद्ध
संपादननाणी व शिक्के
संपादन-
सम्राट कनिष्क सुवर्ण नाणे
-
Kanishka with the divinity Mozdoano.
-
कनिष्क नाणे
-
अहीन पोष (Ahin Posh) येथे सापडलेले नाणे
-
नाणे
-
कनिष्क ब्रांझ नाणे
महायान
संपादनसम्राट कनिष्कांच्या काळातच महायान या बौद्ध संप्रदायाचा उदय झाला व सम्राट कनिष्कांनी महायान बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता.