स्वागत Preeti, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Preeti, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१५ लेख आहे व २८२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

ज्ञ्यानेश्वर सुन्दर जगताप संपादन

नमस्कार,

आपण मराठी विकिपीडियावर संपादने करण्याचा प्रयत्न करत आहात आपल्या प्रयत्नांचे स्वागत आहे.परंतु आपल्या प्रायत्नात दोन एक अडचणी दिसतात.आपणास विकिपीडियालेखन तत्वांशी आणि शैलीशी परिचय होईपर्यंत आपण आपले लेखन तात्पुरते एखाद्या नवीन धूळपाटीवर करावे म्हणजे इतर संपादकांकडून लगेच वगळले जाण्याची शक्यता कमी असेल.येथील शैलीशी परिचय करून घेण्याकरिता काहीकाळ हातातील विषय बाजूला ठेवून इतर विषयातही थोडेफार लेखन केल्यास बरे पडेल.

आपण सध्या "ज्ञ्यानेश्वर सुन्दर जगताप" यांच्या बद्दल लेखनाचा जो प्रयत्न करत आहात त्या संदर्भात खालील दोनतीन मुद्यांकडे लक्ष वेधणे अभिप्रेत आहे.

  • कोणत्याही विषयावर लेखन करताना पहीला प्रश्न विश्वकोशाने दखलघेण्या एवढे महत्वपूर्ण Notability नोटॅबिलिटी आहे का चा असतो.या संदर्भाने "ज्ञ्यानेश्वर सुन्दर जगताप" यांची इतर वृत्तपत्रीय माध्यमांनी किंवा एखाद्या प्रकाशीत पुस्तकात दखल घेतली गेली असल्यास त्याचा संदर्भ उपलब्ध केल्यास बरे होईल . जसे नामदेव ढसाळांचे नाव त्यांच्या कार्याबद्दल परिचित आहे त्यामुळे ते दखल घेण्या जोगेमध्ये मोडते.
  • नवबौद्ध किंवा दलीत या लेखात नोंद घेण्यासारखे काही त्या चळवळीला दिशादेण्या सारखे काही काम केले असल्यास जरूर नमुद करावे. चळवळीत काम करणे आणि त्यातील सहभाग महत्वपूर्ण किंवा दिशा देणारा असणे यात फरक आहे हे आपण लक्षात घेऊ शकाल.
  • तीसरे लेखांची नावे मराठीच ठेवावीत. कुठे इंग्रजी मजकुर टाकल्यास सवडीने भाषांतरीत करावे.
  • "ज्ञ्यानेश्वर सुन्दर जगताप" ची मोठ्या माध्यमातून आपण प्रथमच परिचय करून देत असाल तर इतर मराठी संकेतस्थळांचा प्रथम विचार करावा.ते अधीक सोईचे असेल.
  • काही शंका असल्यास मोकळे पणाने विचारा स्वागत आहे.

आपणास मराठी विकिपीडियावर काम करताना आनंद वाटेल अशी अपेक्षा

माहितगार ०७:१२, २७ मे २०१० (UTC)

नमस्कार कृपया ,विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत पहा , लेख, वर्ग इत्यादींची शीर्षके मराठीत असणे अभिप्रेत आहे .वर्ग:Dalit शीर्षकाचे मराठी वर्गीकरणात स्थानांतरण करावे हि नम्र विनंती. माहितगार ११:३९, ६ जून २०१० (UTC)
विकिपीडियाच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने विकिपीडियन्स काही संकेत पाळण्याचे प्रयत्न करतात, आपणही विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा हे पान वाचावेत हि नम्र विनंती.
  • विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित माहितीची योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
  • आपल्या प्रिय नातेसंबध असलेल्या किंवा वैयक्‍तिक मित्रांची माहिती देण्याचे, आठवण करण्याचे ठिकाण नाही.
येथे लेखन करताना वरील मुद्यांकडे आपले लक्ष असेल असा विश्वास आहे.

माहितगार १२:२०, ६ जून २०१० (UTC)

  श्री. Preeti,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/लेख/जाहीरात; स्वतःच्याच इतरत्रच्या लेखनाचे/संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे. तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करुन घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! संदेश = कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. {{{संदेश}}}

{{{संदेश}}}

पुणे मरकळ गाव, संपादन

क्षमा असावी आपल्यावर आम्ही मराठी विकिपीडियाच्या संकेतांचा पाऊस पाडत आहोत, पण विकिपीडियाच्या दर्जा ची काळजी घेताना ते गरजेचे असते.आपण आत्त पर्यंत येथे चर्चेत सहभाग घेणे टाळल्याचे दिसते. तसे ते घेणे आवश्यक नाही पण काही वेळा सहाय्य अधीक सुयोग्यपणे पोहोचवणे सोपे जाते.
पुणे मरकळ गाव, हे शीर्षकपान केवळ मरकळ या नावावर स्थानांतरीत करून घ्यावे.पुणे जिल्ह्यातील इतर गावांचे वर्गीकरण कसे झाले आहे त्याचा अभ्यास करून त्या प्रमाणे वर्गीकरण करून घ्यावे.
मरकळ हे गाव आळन्दि पासुन ७ कि.मि.दुर आहे. हे वाक्य विश्वकोशिय उल्लेखनीयतेत बसते त्या बद्दल काही प्रश्न नाही.
तेथिल हनुमानाचि मुर्ति प्रसिद्ह् आहे. शक्यतो कोशलेखनात विशेषणे टाळावयाची असतात प्रसिद्ध या विशेषणाची गरज पुन्हा एकदा तपासून पहावी. नमुद करणे आवश्यकच असल्यास संदर्भ आवश्यक नसला तरी बरे.शिवाय वाक्य मोघम होते , अधीक नेमके हवे कोठे प्रसिद्ध आहे ? गावातल्या गावात ? पंचक्रोशीत , तालूक्यात ? जिल्ह्यात ? राज्यात ? नेमके कुठे व्यक्तीगत पातळीवर मला एखादी गोष्ट जगप्रसिद्ध वाटेल पण ती तुम्हाला माहित नसेल तर ती जगप्रसिद्ध होणार का ? सर्वात चांगले विशेषणे टाळावीत.
न्यानेश्वर जगताप हे तेथिलच रहिवासि होत.
  1. मी स्वतः पुण्याचा/मुंबईचा रहिवासी आहे हि बाब एखाद्या विश्वकोशाने दखल घेण्या एवढी विशेष नाही.मुंबई लेखात माझी दखल घेण्याकरिता , त्या गावाकरिता काही विशेष योगदान हवे .समजा माझे विशेष योगदान आहे तर सहसा कोशात येण्या पुर्वी एखाद्या ग्रंथातून/मासिकातून/वृत्तातून माझा संदर्भ योग्य उल्लेख झालेला असावा (ग्रामीण भागातील उल्लेखांबाबत संदर्भांच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने थोडी फ्लेक्झीबिलीटी दाखवली जाते, पण योगदानच नव्हेतर त्या योगदानात काही विशेषता असावयास हवी, तशी विशेषता असेल तर नमुद करावी आणि उल्लेखनीयतेतील स्विकार्हतेचा निर्णय इतर विकिपीडिया सदस्यांवर सोडून द्यावा या संडर्भाने आपण आपले मत विकिपीडिया:उल्लेखनीयता येथे मांडू शकता)
  2. समजा माझे पुणे/मुंबई करिता (किंवा माझ्या कार्यक्षेत्रातील) विशेष योगदान आहे सुद्धा, तरी सुद्धा विश्वकोशात नोंद होण्याकरिता मला स्वतःला किंवा माझ्या हितसंबधीयांना तसे वाटून उपयोग नाही, तर माझा उल्लेख विश्वकोशात असणे गरजेचे आहे असे कुणालातरी स्वतःहोऊन वाटावयास हवे.म्हणून या पूर्वी आपल्या चर्चा पानावर नोंदवल्या प्रमाणे प्रथमतः हितसंबध नसल्याची स्वतःच खात्री करून घ्यावी .
  3. आपण जी छातयाचित्रे चढवत आहात त्याच्या प्रतिक्रीया विभागात ती छायाचित्रांचे प्रताधिकार आपल्या स्वतः आहेत याची खात्रीकरून कोशातील वापराकरिता प्रताधिकारमुक्त करत आहात असे विशीष्टपणे नमुदकरणे अत्यावश्यक आहे.माहितगार ०६:४६, १२ ऑगस्ट २०१० (UTC)

संचिका परवाने अद्ययावत करा संपादन

नमस्कार Preeti,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत संपादन

नमस्कार Preeti,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.