स्वागत स्नेहल शेकटकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन स्नेहल शेकटकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,३६२ लेख आहे व १५१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादकात समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधांशिवाय 'छायाचित्र दिर्घीका, 'आलेख' (ग्राफ) इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होतात.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २३:३०, ६ जुलै २०१४ (IST)Reply

ॲरिस्टॉटल मधील ॲ ची समस्या

संपादन
 

नमस्कार,

संतोष दहिवळांनी तांत्रीक चावडीवर स्थानांतरीत केलेल्या चर्चेत आपण ॲ (मी ॲ असे टंकतो) हे अक्षर व्यवस्थीत दिसत नसल्याची समस्या मांडली होतीत. सध्या समस्या अभ्यासतो आहे. काही प्रश्न पडले आहेत

१) प्रथमत: आपली ॲरिस्टॉटल लेखातील समस्या सुटली का अद्याप तशीच आहे. (सुटली असेल तर कशी ?)

२) जर समस्या अद्याप सुटली नसेल तर अशीच समस्या ॲरिझोना या लेखात जाणवते का ?

३) जर समस्या अद्याप सुटली नसेल तर अशीच समस्या मराठी विश्वकोशातील या लेखातही जाणवते का ?

४) जर समस्या अद्याप सुटली नसेल तर अशीच समस्या सदस्य Docsufi यांच्या योगदानातील ॲ अक्षर लेखनाबाबत जाणवते का ?

५) समस्या जाणवताना वापरलेली आपल्या संगणकाची ऑपरेटींग सिस्टीम व न्याहाळक (ब्राऊजरची) माहिती मिळाल्यास बरे पडेल.

  • @J: आपणही चर्चा:ॲरिस्टॉटल येथे समस्या नोंदवली होती ती स्नेहल शेकटकर यांनी छाया चित्रात दर्शविल्या प्रमाणेच होती का निराळी होती ?
 
Aristotal incorrect Devnagri rendering issue
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:५०, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply


  • @Mahitgar: नमस्कार, वरील समस्या अजुन काही सुटली नाहीये. मला असे वाटाते आहे की ही समस्या ऑपरेटींग सिस्टीम ची असावी. मी लिनक्स (उबुन्टु वितरण) वापरतो आणि मोझिला फायरफॉक्स हे न्याहाळक वापरतो. धन्यवाद.

स्नेहल शेकटकर (चर्चा) ०९:४२, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply


शक्य आहे पण ऑपरेटींग सिस्टीम चीच समस्या असल्या बद्दलही दुजोऱ्याची गरज भासेल कारण दोन वळणांपैकी एक अक्षर वळण दिसते आहे. जर दोन्ही वळणांचे युनिकोड क्रमांकन एकच असेल तर दोन्हीही वळणे दिसावयास नकोत. पण एक दिसते आणि एक दिसत नाही हे जरासे विचीत्र आहे. समस्या केवळ तुमच्या पर्यंत मर्यादीत असेलच नाही म्हणून अधीक अभ्यासणे जरुरी असू शकते. मराठी विकिपीडियावर ॲ अक्षराचे प्रमाणीकरण बद्दल चर्चा वेळोवेळी निघतच असते विकिपीडिया:चावडी/चालू_चर्चा_१#अॅ_ऍ,_चौकोनी_आयत,_इ. हि जूनी चर्चा धसास लावणे इतर कारणांनीही गरजेचे आहे.
मराठी विश्वकोशातील या लेखातही जाणवते का ? लेख तपासून त्यातही आणि ॲरिझोना लेखातही समस्या जाणवते का ते कळवावे हि नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:५५, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

ॲरिझोना हा लेख मी प्रत्यक्ष उघडून पाहिल्यास मला सर्व काही व्यवस्थित दिसते. मात्र वर आपण जी लिंक दिली आहे त्यामध्ये ती समस्या आहे. दुजोऱ्याची समस्या भासेल म्हणजे काय हे नीट कळाले नाही.

स्नेहल शेकटकर (चर्चा) १०:०३, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply


मला वाटते ॲरिस्टॉटल मधील प्रॉब्लेमही [मराठी विश्वकोशातील च्या लिंकेतूनच आला आहे कारण बहुधा माहिती तिकडून इकडे कॉपी पेस्ट केली गेली असावी (ॲरिस्टॉटल लेखात कॉपीपेस्टींग करणाऱ्या लेखका कडून कॉपीराईट भंग होतोय म्हणून लेखाला लवकरच कात्री लावून साफ सूफ करावे लागेल हा भाग वेगळा) पण मुख्य म्हणजे तुमच्या समस्येच्या उगमाची मुख्य दिशा गवसली जी तिसरी कडेच आहे. मराठी विश्वकोशाचे डिजीटायझेशन करताना आलेली त्यांच्याही लक्षात न आलेली समस्या असू शकते. मराठी विश्वकोश चाळताना अशी अजून उदाहरणे दिसल्यास कळवावीत म्हणजे संबंधीतांच्या नजरेस हि गोष्ट आणता येईल.
कृपया केतकर ज्ञानकोशाच्या या लिंकेतील ॲपल हा शब्द आपणास नीट दिसतो का ते कळवावे म्हणजे प्रॉब्लेम सॉफ्टवेअर कंपनीचा असेल तर आयडेंटीफाय करणे सोपे जाईल.
ऑपरेटींग सिस्टीम चीच समस्या असल्यास दुजोऱ्याची गरज भासेल असे एवढ्या साठी म्हणालो की आपल्यासारखीच ऑपरेटींग सिस्टीम वापरणाऱ्या इतर कुणास सेम प्रॉब्लेम यावयास हवा तसे नसेल तर ती ऑपरेटींग सिस्टीमचा प्रॉब्लेम नसेल आणि ऑपरेटींग सिस्टीमचा प्रॉब्लेम नसतनाही तुम्ही विनाकारण सहन करत बसणार म्हणून बाकी काही नाही. तसे ही आपल्या तपासाची दिशा मराठी विशकोशाच्या दिशेने जाण्याची शक्यता अधीक वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२३, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

ही समस्या मराठी विश्वकोशामुळे आलेली नाही हे निश्चित. कारण विकीवरील सर्वच लेखांमध्ये ही समस्या आहे. मी स्वतः इतर संगणकांवरून लिनक्स वापरून उघडून बघतो आणि तुम्हाला कळवतो. धन्यवाद.

स्नेहल शेकटकर (चर्चा) १३:०३, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

फाँटच्या मर्यादांमुळे ? कदाचित लोहीत ? आपल्याला हा र्‍य व्यवस्थीत दिसतो का की र् +य असे दिसते ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१२, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

ऱ्य व्यवस्थित दिसतो. समस्या फक्त ॲ ची आहे

स्नेहल शेकटकर (चर्चा) १४:३१, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

ॲ विषयक जेंच्या समस्या

संपादन

अॅरिस्टॉटल या शब्दातील ’अॅ’च्या जागी मला, ॲ (उभा आयत आणि त्यांत ०१ हा मराठी आणि

त्याखाली 12 हा हिंदू-अरेबिक अंक) दिसतो आहे. हा विश्वकोशाचा दोष नाही. ऑपरेटिंग सिस्टिमचाही

नाही. माझ्या संगणकावर मोझिला फ़ायरफ़ॉक्स आणि विंडोज एक्सपी आहे. मी विंडोज ७ आणि ८ही

वापरून पाहिले आहे, ’अॅ’च्या जागी आत आकडे असलेला उभा आयतच उमटतो.

हा ’अॅ’वरील चंद्राची कोर, मराठीमध्ये सरळ-क्षितिजसमांतर असते, ती तशी येथे उमटत नाही. तुर्की

टोपीवर जसा (बहुधा तुर्कस्तानामधून दिसणारा) तिरपा चंद्र असतो, तशी ती दिसते. ही तिरपी

चंद्रकोर मल्याळम लिपीतील ’उ’वर काढली की त्या अक्षराचा उच्चार अतिर्‍हस्व होतो; तिथूनच ती

युनिकोडने आयात केली असावी.

ही चंद्रकोर ’अ’च्या बरोब्बर माथ्यावर पाहिजे, ती किंचित बाजूला उमटत असलेली दिसत आहे.

त्यामुळे ’अॅपे’ शब्दातली ’प’वरची मात्रा चंद्रकोरीला चिकटते, तसे व्हायला नको. मनोगतावर अॅ

व्यवस्थित काढता येतो..... J (चर्चा) १६:४७, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

हम्म... समस्या तर आहेत असे दिसते. मी ज्या कोणत्या संगणकांवरून वापरतो ॲरिस्टॉटल लेखातील ॲ व्यवस्थीत दिसतो. मनोगत वाले काही खास फॉण्ट तेही डायनॅमीक स्वरूपात वापरतात असे दिसते आणि मनोगत त्यांची यूनीक माहिती कितपत मोकळेपणाने शेअर करते या बाबत सहसा साशंकता असते (माझे व्यक्तीगत मत). तरीही तुलना माहित असलेली बरीच.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:५८, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

@स्नेहल शेकटकर आणि J: ॲरिस्टॉटल परिक्षण नावाचा लेख परिक्षण कालावधी साठी स्वतंत्रपणे तयार करून मी वापरत असलेल्या ॲ ने सर्व ॲ बदलविले. ॲरिस्टॉटल परिक्षण मध्ये आपणा दोघांनाही ॲ कसा दिसतो ते कृपया कळवणे.

@स्नेहल शेकटकर: वर संपादन खिडकीवरच्या मेन्यूपट्टीत प्रगत सुविधांच्या ओळीत उजव्या कोपऱ्यात शोधा आणि त्या जागी बदला अशी सुविधा आहे. त्यात वेगवेगळे ॲ टाकून बदलून परिक्षण करून पहावे ही विनंती. आपल्या परिक्षणांनतर आपण ते विशेष पान वगळूयात.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:१२, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply



मला र्‍य व्यवस्थित दिसतो आहे., पण ड्य-ट्य नाहीत. ड, ट, छ, ठ, ह यांना जोडण्यासाठी एक वाकड्या मानेचा खास ’य’ असतो. त्या ’य’ला पाऊण य म्हणतात, तो येथे उमटवता येत नाही...J (चर्चा) १६:५८, ८ सप्टेंबर २०१४ (IST).Reply

अॅ साठी दुजोरा

संपादन

मी Ubuntu 11.10 ऑपरेटिंग सिस्टिम व Firefox 20 ब्राऊजर वापरुन अॅरिस्टॉटल या पूर्ण पानाचा screenshot घेतला आहे ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 20 तो येथे आहे जेणेकरुन तुमच्या ब्राऊजरमध्ये असेच दिसते आहे का याचा तुम्हाला पडताळा घेता येईल व तुम्हाला ऊबुंटू वापरुन दिसत असलेल्या अॅ संदर्भात कुठे दुजोरा देण्याची गरज भासल्यास http://prntscr.com/4l6x33 ही लिंक देता येईल. आणखीही असे की Ubuntu 11.10 संगणक प्रणालीतून Firefox 7, 9, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 या न्याहाळकांच्या आवृत्यातही अॅरिस्टॉटल या पानाचे पूर्ण स्क्रिनशॉट घेतलेले आहेत आवश्यकता भासल्यास त्याचेही दुवे तुम्हाला उपलब्ध करुन देईल.

@J: तुमच्याही अवलोकनासाठी -- संतोष दहिवळ (चर्चा) २१:०४, ९ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

म्हणजे समस्या उबुन्टु चा आहे असे दिसते आहे. नाही का?

स्नेहल शेकटकर (चर्चा) २१:०७, ९ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

Ubuntu ची तर आहेच पण आणखीही संगणक प्रणाल्यात आहे. इतरत्र त्याचे स्क्रिनशॉट उपलब्ध करुन दिले आहेत. -- संतोष दहिवळ (चर्चा) २१:१२, ९ सप्टेंबर २०१४ (IST)Reply
@स्नेहल शेकटकर: Unicode Character U+0972 seems to be broken while rendering normally stackexchange वरील दुव्यातील हि चर्चा अगदी तुमच्या समस्येच्या संबंधाने आहे. काही उपयोग होईल का ते पहावे .
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०६:५८, १० सप्टेंबर २०१४ (IST)Reply

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.