चर्चा:ॲरिस्टॉटल
ऍरिस्टॉटल असे लिहावे काय?
संपादनAristotle चे देवनागरी लेखन 'ऍरिस्टॉटल' असे वाचल्याचे स्मरते. कोणी नेमकी माहिती/मत देऊ शकेल काय?
--संकल्प द्रविड 08:46, 16 जानेवारी 2007 (UTC)
- ऍरिस्टॉटल असे वाचलेले आठवते परंतु जेव्हा O हा स्वर इंग्रजीत एखाद्या दुसर्या स्वराच्या मागे येतो तेव्हा ऑ असा उच्चार न होता ओ असा उच्चार होतो असे वाटते. (जसे absolute, corporation, association etc) तज्ज्ञांनी खुलासा केल्यास योग्य बदल करता येईल.
- priyambhashini 13:53, 16 जानेवारी 2007 (UTC)
- O च्या उच्चाराचे दोन्ही प्रकार आहेत. स्टोर, स्मोर, स्टोव्ह, स्कोल्ड, स्पॉट, स्टॉक, स्मॉल, इ....
- ऍरिस्टोटल बरोबर आहे.
- अभय नातू 16:52, 16 जानेवारी 2007 (UTC)
Aristotle
संपादन- लेखाच्या मथळ्यातला Aristotle मला ॲरिस्टोटल (म्हणजे एक रिकामा उभा आयत आणि पुढे रिस्टोटल) असा दिसतो आहे. विकीवरती मनोगताप्रमाणे अॅ लिहायची सोय नाही.
- त्यापेक्षा ऍरिस्टॉटल लिहिलेले परवडले.
- इंग्रजीत O चे दोन नाहीत, तर चारापेक्षा अधिक उच्चार आहेत. Deo, another, cot, long, no, core, took, boot, door, poor, blood, œthel वगैरे शब्दांत O चे विविध उच्चार आहेत.
- Aristotle चा ब्रिटिश उच्चार अॅरिस्टॉटल असाच आहे.
- ..J १५:५०, १० मे २०११ (UTC)
नमस्कार !
ऍरिस्टॉटल लिहणे मराठीत चूक आहे. तो शब्द ॲरिस्टॉटल असा लिहवा.
मराठीत आपण ॲ हे अक्षर वापरतो तर हिंदीत ऍ हे अक्षर वापरतो. . . Ashish Gaikwad १६:०५, १० मे २०११ (UTC)
मराठीत उभा चौकोन हे अक्षर नाही, हिंदीतही नाही
संपादनलेखाचा मथळा म्हणजे एक उभा रिकामा चौकोन काढून पुढे रिस्टोटल लिहिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे पोकळ आयतासारखे दिसणारे हे अक्षर मराठीत नाही....J