सदस्य चर्चा:प्रसाद साळवे/जुनी चर्चा २

गावांबद्दलच लेखन

संपादन

नमस्कार,

आपण अलिकडे ग्रामीण वाड्या वस्त्यांबद्दलच्या ज्ञानकोशीय लेखन करत आहात त्याच स्वागत आहे.मी ग्रामीण गावांबद्दल लेखन करताना सहसा चौगाव नावाच्या गावातील माहितीशी तुलना करून बघत असतो. कदाचित आपणासही आवडेल म्हणून लक्ष वेधले.

दुसरे तर सत्यकथा (मासिक) मराठी साहित्यातील महत्वाचा टप्पा आहे. अनंत अंतरकर श्री.पु.भागवत राम पटवर्धन आणि इतरही संबंधीत नाव आहेत.नामदेव ढसाळांच्या कविता राम पटवर्धनांनी सत्यकथेतून पुढे प्रकाशित केल्या. सत्यकथेस इतरही पैलू आहेत .मी इतरही सदस्यांना या संदर्भाने मराठी विकिपीडियावर लेखनाचि विनंती करणार आहे.आपल्या सवडी प्रमाणे आपण वेळ देऊ शकल्यास स्वागत आहे. इतर लेखना सोबतच चरित्रात्मक लेखनाची समीक्षा करणारा ह्या दुव्यावरील लेखन आपल्या सवडीनुसार अभ्यासून मराठी विकिपीडियावर सुयोग्य मुद्द्यांचा आंतर्भाव करता आल्यास स्वागतच असेल.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३९, ६ नोव्हेंबर २०१३ (IST)Reply

गाजर गवत लेखाच्या निमीत्ताने

संपादन

नमस्कार,

गाजर गवत ह्या लेखाची आपली सुरवात पाहून मी या तणाची आमेरीकेतील सद्द स्थितीची माहिती आंतरजालावर शोधण्याचा प्रयत्न केला असता १८७६ मध्ये तीथे प्रथम आढळलेले हे तण तेथील काही राज्यात अद्यापही टिकून आहे असे दिसले.शिवाय मराठी माध्यमातील माहितीही तपासली क्वचीत चुकीच्या माहितीचा/मांडणीचाही प्रसार होतो आहे असे दिसले.तेव्हा मीही गाजर गवत लेखाच्या लेखनात सक्रीय सक्रीय सहभाग देण्याचा प्रयत्न करेन.सहसा दुर्लक्षील्या जाणाऱ्या महत्वपूर्ण विषयाच्या निवडी बद्दल अभिनंदन.

अर्थात ह्या लेखाच्या निमीत्ताने इतरही काही महत्वाच्या गोष्टी शेअर कराव्याश्या वाटतात, त्यातील एक म्हणजे कॉपीराईटेड लेखनाचे कॉपीपेस्टींगचा मोह आवर्जून टाळावयास हवा.आपली स्वत:ची व्यक्तीगत मत लिहायची नाहीत, तिसरीकडचे संदर्भ द्यायचे पण त्याचे कॉपीपेस्टींग न करता स्वत:च्या शब्दात लिहिणे, हे सुरवातीस अवघड वाटते, पण हे कोडेही सवयीने सुटते.

काही सोप्या टिप्स देतो आवडल्यातर पहा शंका असल्यास कळवा:

१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत,थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे विस्तार करावा.आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा.एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते.

हि पहिली पद्धत अधिकृत आणि सर्वात उत्तम बाकी खाली दिलेले शॉर्टकट आणि पळवाटा आहेत.

२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.

सोबतच अबकड यांचे मत असे आहे आणि हळक्षज्ञ यांचे मत असे आहे,अशी वाक्य रचना अंशत: समीक्षणात मोडते आणि कॉपीराईटच्या प्रश्नातून सुटकेचा हा अजून एक मार्ग आहे.

३) "सुर्य पुर्वेला उगवतो" वाक्याचे "पुर्वेला सुर्य उगवतो" असा फेरफार जमले तर क्रियापदे बदलावीत.

४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो.कारण "एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे"ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात "हे" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा,जसे "एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे"

गाजर गवत लेखाच्या सद्य स्थितीचे उदाहरण घ्यावयाचे झाले तर;
  • "सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे.";
  • गाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.
  • या गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. यागाजर गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो. असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत.( बाकी वाक्य बरोबर आहे पण कॉपीराईटचा प्रश्न अंशत: शिल्लक राहतोच;" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते." असा वाक्य रचनेत फेरफार करता येऊ शकतो पण त्या पेक्षा अबकड या तज्ञांच्या मतानुसार " श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते."(सोबत संदर्भ) हे सर्वात सेफ.

वर काही शॉर्टकट्स दिल्या आहेत म्हणजे त्या मी प्रोमोट करतो असे नाही.पण कॉपीराईट कायद्याचा पूर्ण भंग होण्या पेक्षा बरे.

कॉपीराईट बद्दल अधिक माहितीही देता येईल पण तत्पुर्वी आपल्या काही शंका असल्यास कळवाव्यात.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:१६, ७ नोव्हेंबर २०१३ (IST)Reply

काळजी घेण्याची विनंती

संपादन

नमस्कार,

जसे संभाजीराजे भोसले या एक पेक्षा अधिक वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि या गोष्टीची कल्पना नसेल तर गल्लत होऊ शकते तसेच काहीसे मालोजीराजे भोसले आणि बाबाजीराजे भोसले यांच्या जवळच्या(निकटच्या) नात्यातील काही नावात साधर्म्य असावे (अथवा इंटरनेटवर उपलब्ध माहितीत गल्लत असण्याची शक्यता असावी) असे काहीसे आठवते.मूळ ऐतिहासिक दस्तएवज पडताळण्यास न मिळाल्यामुळे अधिक लेखन मी स्वत: टाळले होते असे आठवते.इतरांकडूनही अनवधानाने कुठे गल्लत होऊ नये म्हणून हि पाने धूळपाटी पानांकडे वळवली आहेत.

मूळ ऐतिहासिक दस्तएवज पहाण्यास मिळे पर्यंत अथवा इतिहास विषयावर काम करणाऱ्या इतर जाणकार सदस्यांकडून peer review मुल्यांकन होई पर्यंत हे दोन लेख धूळपाटीवर असू द्यावीत गैरसमज नसावा हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२६, १२ जानेवारी २०१४ (IST)Reply

अनुदिनीचे संदर्भ व दुवे

संपादन

Salveramprasad,

शक्यतोवर अनुदिनी (blog) चे संदर्भ आणि बाह्यदुवे लेखात देणे टाळावे. टाळलेच पाहिजेत असे काही धोरण अजूनपर्यंत पाहण्यात/वाचण्यात नाही पण आपणास सुचवावेसे वाटले म्हणून. तसा आग्रह नाही. -- संतोष दहिवळ (चर्चा) १८:१६, १३ जानेवारी २०१४ (IST)Reply

बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य

संपादन

नमस्कार

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:जी साहित्य निर्मिती केली आहे त्या वर इतर अभ्यासंकांनी बऱ्या पैकी अभ्यास आणिअ अभ्यासपूर्ण लेखन केलेले असणार आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या साहित्य निर्मितीबद्दल इतर अभासकांच्या अभ्यासावर निरीक्षणांवर मतांवर समीक्षणावर आधारीत भीमराव आंबेडकरांचे साहित्य अथवा बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य असा एक पूर्ण वेगळा ज्ञानकोशीय लेख बनवण्यास घेता येऊ शकेल असे वाटते.किंवा विशीष्ट पुस्तकाचे समिक्षण मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर विशीष्ट ग्रंथा बद्दल लेख सुद्धा लिहिता येईल.

मी मराठी विकिबुक्स प्रकल्पात बुद्ध आणि त्यांचा धम्म या लेखाची आपण सुरवात केल्याचे पाहीले.विकिबुक्स आणि विकिस्रोत प्रकल्पांच्या कार्यकक्षे बाबत जरासा घोटाळा होतो.विकिबुक्स हा प्रकल्प अकॅडेमीक बुक्सचे नवे लेखन करण्या पुरते मर्यादीत आहे.एखादे जुने पुस्तक जसेच्या तसे लिहावयाचे असल्यास त्या करता विकिस्रोत प्रकल्प वापरला जावयास हवा.अर्थात बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य (१९५६ +६० वर्षे =) ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रताधिकारीत कॉपीराईटेड असणे अपेक्षीत आहे.पण बाबासाहेबांचे ग्रंथ २०१६ त्यांच्या वंशजांशी आपण आता पासून पत्रव्यवहार करून ठेवलात आणि २०१६ च्या शेवटी पिडिएफ आवृत्या उपलब्ध करून ठेवण्याची विनंती केलीत तर २०१७ पासून त्यांचे ग्रंथ आपल्या विकिस्रोत प्रकल्पात घेता येऊ शकतील.

धन्यवाद. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१९, १५ जानेवारी २०१४ (IST)Reply

नागराज मंजुळे यांचे छायाचित्र

संपादन

नागराज मंजुळे यांच्या बद्दल जे वर्णन वाचले त्यावरून ते संपर्क करण्यास सोपे आहेत. त्यांना छायाचित्र प्रताधिकारमुक्त करून मागितल्यास बरे राहील. व्यक्ती प्रसिद्धीस येई पर्यंत छायाचित्रे मिळतात पण एकदा प्रसिद्धी मिळाल्या नंतर स्वत:ची छायाचित्रे देणे याचे सुद्धा सेलिब्रिटीजना (पुरुष कलावंतांना सुद्धा) उत्पन्न मिळत असते. आपल्याकडून कॉपीराईट भंग होणे म्हणजे एका कलावंताच्या उत्पन्नाचे नुकसान ठरते त्यामुळे शोर्टकटचा मोह दूर ठेऊन कॉपीराईट फ्री छायाचित्र मिळवण्याचा प्रयास करावा ही नम्र विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५१, ८ मार्च २०१४ (IST)Reply

लक्ष्मण वाठोरे यांचे योगदान

संपादन

नमस्कार,

विशेष:योगदान/लक्ष्मण_वाठोरे यांचे योगदान तपासावे. त्यांनी कॉपीपेस्ट न करता कॉपीराईटचा भंग न करता विकिपीडिया साठी स्वत: मेहनतीने लिहिले असेल तर ते मराठी विकिबुक्स बन्धू प्रकल्पात जतन केले हवे असे वाटते. पण शिक्षक मंडळींपैकी कुणी कन्फर्म करावयास हवे की त्यात कॉपीराईटचा भंग नाही. (बालभारतीची पुस्तके सुद्धा कॉपीराईटेड असतात) .

पण काही कन्फर्मेशन नाही आले तर त्यांनी लिहिलेले लेख मराठी विकिपीडियाच्या परिघात बसत नसल्यामुळे वगळावे लागतील असे दिसते.

आपल्या आवडीचे वाचन लेखन होत राहो ही शुभेच्छा. आणि धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:३९, ८ मार्च २०१४ (IST)Reply


रमाई भीमराव आंबेडकर

संपादन

रमा , रामी, रमू, रामू, इ . नावाने रमाई आंबेडकर ओळखल्या जात असत. स्वतः: बाबासाहेब आंबेडकर त्यांना रामू या नावाने बोलावत असत. पण सर्वत्र त्यांचे रूढ झालेले नाव “रमाई” असेच आहे.त्यांच्या जीवनावर रमाई नावाने चित्रपट निघालेला आहे.तसेच डॉ.यशवंत मनोहर यांनी देखील त्यांच्या जीवनावर रमाई नावानेच पुस्तक लिहिलेले आहे.सर्व आंबेडकरी जनता त्यांना रमा किंवा रमाबाई यापेक्षा “रमाई” या नावानेच ओळखते आहे. साळवे रामप्रसाद २३:३९, १९ मार्च २०१४ (IST)

आक्षेप मान्य

संपादन

परंतु, विकिपीडियाच्या मथळ्यात किंवा माहिती चौकटीत व्यक्तीचे औपचारिक नाव लिहिण्याची पद्धत आहे, अशी माझी समजूत आहे. . त्यानुसार शिवाजीवरच्या लेखाचा मथळा ’शिवाजी शहाजी भोसले’ असाच होता. तो केवळ अपवाद म्हणून छत्रपती शिवाजीराजे भोसले किंवा असाच काहीतरी करावयास विकिपीडियाने अनुमती दिली, असे मला आठवते.. उपाधी, पदवी आणि आदरार्थी शब्दयोगी किताब जोडून बनलेले असे अनौपचारिक नाव ठेवल्याने शिवाजीला छत्रपती म्हणात हे माहीत नाही अशा माणसाला ते पान उघडता येत नाही. लेखात अधूनमधून शिवराय, शिवबा, शिवछत्रपती अशी नावे आली तरी ती शिवाजीचीच नावे आहेत असा बोध होत नाही, असे अनेक मराठी वाचक भारतात किंवा परदेशात आहेत. बाबासाहेब भोसल्यांच्या ’राजा शिवाजी’ या भव्य नाट्यप्रयोगाला अनेक प्रसंग समजत नसल्याने मध्येच उठून गेलेली मराठी माणसे मी जबलपुरात पाहिली आहेत.

याच नियमाने जे खरेखुरे आंबेडकरवादी नाहीत अशांपैकी निदान काहींना ’रमाई’ कोण हे माहीत नसू शकते. ’रमाई’ आणि ’माई’ या दोघी एकच आहेत अशी समजूत असणारे एका वृत्तपत्रवाचकाचे पत्र माझ्या वाचनात नुकतेच आले आहे.

विकिपीडिया सर्वांचा आहे, विशिष्टवादींचा नाही. . मात्र, लेखात रमा आंबेडकरांचे औपचारिक नाव आणि त्याबरोबर अन्य घरगुती नावे एकदा सांगून झाली की रमाई, रमाबाई, रमाबाईसाहेब यांपैकी कोणतेही एक, किंवा त्यांचे अन्य कोणतेही नाव लेखाच्या अंतर्भागात येण्यास हरकत नसावी. किंबहुना, लेखाचे वाचन थोडेफार रसाळ होण्यास ते आवश्यक आहे.

उपरिनिर्दिष्टकारणे, लेखाच्या मथळ्यात किंवा माहिती चौकटीत व्यक्तीचे केवळ अधिकृत व औपचारिक नाव असावे असे मला वाटते. तरीही, मी केलेला बदल जर अनुचित वाटत असेल तर, चर्चापानावर त्याचे समर्पक कारण लिहून मजकूर पूर्ववत करण्यास कुणाचीच हरकत असायचे कारण नाही. J (चर्चा) १५:३३, २१ मार्च २०१४ (IST)Reply

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

संपादन

नमस्कार प्रसाद साळवे/जुनी चर्चा २,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

सुषमा अंधारे यांच्या विषयीच्या लेखातील संदर्भ आणि विकिकरण

संपादन

नमस्कार,

सुषमा अंधारे या लेखाचे संदर्भ जोडून जरासे विकिकरण केले. आपण सुषमा अंधारे यांच्या लेखात दैनिक सकाळ सप्तरंग पुरवणी मधील त्यांच्या 'मी कात टाकली' स्तंभाच्या १३ जानेवारी २०१३ च्या लेखाचा हा संदर्भ दिला आहे (मी सुद्धा सध्या तो संदर्भ वापरला आहे परंतु,). हा लेख ललित लेखन शैलीने असल्यामुळे त्यात त्यांनी त्रयस्थ 'सारंगी' नावाच्या व्यक्तीरेखेची माहिती दिली आहे की त्यात त्यांच्या स्वत: विषयीच्या आत्मकथनाचाही समावेश आहे ? हे मला पुरेसे स्पष्ट होऊ शकले नाही. (सुस्प्ष्टता नसल्यामुळे तुर्तास काही माहिती वगळावीही लागली आहे, तरीपण ज्ञानकोशीय परिघात संबंधीत लेखास जमेल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, लेखन करण्यासाठी त्यांच्या बद्दल शोध घेताना, आंतरजालावर पुरेशा सुस्प्ष्ट नोंदी आणि संदर्भांचा अभाव जाणवतो आहे.)

आपण दैनिक सकाळ मधील नातं मातीचं, नातं मातेचं! लेख पुन्हा एकदा तपासून त्या लेखात सुषमा अंधारे यांच्या स्वत: विषयी काही माहिती आहे अथवा नाही याची खात्रीशीर सुस्पष्ट माहिती मिळाल्यास कळवावे.

त्या शिवाय आंतरजालावर शोध घेतला असता सुषमा अंधारे हे नाव परळी आणि पुणे या दोन ठिकाणचे दिसते आहे, या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का वेगवेगळ्या त्या शिवाय लेखात आधी दिलेल्या जन्मवर्षा पेक्षा वेगळे जन्मवर्ष लेखाच्या चर्चा पानावर कुणीतरी नोंदविले आहे. त्या माहितीची सुद्धा पडताळणी आणि दुरुस्ती केली जाण्याची आवश्यकता आहे.

आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३९, २३ जून २०१५ (IST)Reply

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

स्मरण

संपादन

धन्यवाद

नमस्कार

संपादन

बरेच दिवसांनी तुम्ही परत आलेले पाहून आनंद झाला. सगळे ठीक असेलच!

अभय नातू (चर्चा) ०८:३८, १३ डिसेंबर २०१५ (IST)Reply

स्मरणाबद्दल

संपादन

स्मसणात ठेवाल्या बद्दल धन्यवाद अभय सर.... साळवे प्रसाद ००:४७, १९ डिसेंबर २०१५ (IST)

ताश्कंद करार

संपादन

सदर लेख इतर विकिपीडियांशी जोडला गेला आहे.

अभय नातू (चर्चा) ०७:१२, २३ जानेवारी २०१७ (IST)Reply

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

संपादन

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या लेखाचे नाव बदलून तुम्ही भगवान शब्द वगळला, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या द बुद्धा अँड हिज धम्मा चे मराठी भाषांतर असलेले पुस्तक पहा, त्यात ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' असाच आहे. म्हणजे या लेखात भगवान शब्द आवश्यक आहे. आणि बौद्ध धर्मात भगवान शब्दाचा अर्थ परमेश्वर किंवा ईश्वर असा होत नाही. संदेश हिवाळे (चर्चा) २१:३६, २५ जानेवारी २०१७ (IST)Reply

बुद्ध आणि त्यांचा धम्म

संपादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित मूळ इंग्रजी आवृत्तीत भगवान असा.कोठेही उल्लेख नाही. सुरवातीच्या काही आवृत्तीत भाषांतरकाराने तो अनावश्यक शब्द घालून चूक केलेली आहे. परंतु नंतर सुधारित अनुवादक : घन:शाम तळवटकर, प्रा. म. भि. चिटणीस, शां. शं. रेगे भाषांतरकाराने ती चूक दुरुस्त केली.[] भगवान('तृष्णेला नष्ट करणारा) शब्दाचा अर्थ ईश्वर होतो कि नाही हे महत्वाचे नाही. परंतु मूळ ग्रंथातील योग्य भाषांतर होणे आवश्यक आहे.एम.डी.रामटेके व अनेक अर्वाचीन अभ्यासकांनी भगवान हा शब्द त्याज्य मानला आहे.आपण निरनिराळ्या अनुवादकांची शिर्षकाबाबत पुस्तके पाहून खात्री करावी ही विनंती.संदेश हिवाळे प्रसाद साळवे १२:३७, २६ जानेवारी २०१७ (IST)Reply

भीमराव रामजी आंबेडकर

संपादन

मी या लेखातील भारतीय समाजावरील प्रभाव यामध्ये काही उपविभाग निर्माण केले होते, अस्पृश्यांची उन्नती, जातिव्यवस्थेचे उच्चाटन, बौद्ध धर्म प्रसार असे ५, तुम्ही यांच्यात चूकिचे बदल करू नका. हे सर्व उपलेख भारतीय समाजावरील प्रभाव या लेखांर्गतच येतात. संदेश हिवाळे (चर्चा) १७:२०, २७ जानेवारी २०१७ (IST)Reply

नोंद घ्यावी

संपादन

कृपया माझी वापरू नये. जर मला नोटिफिकेशन द्याचे असेल तर {{साद|Tiven2240}} असे करून बोलावे. चर्चापानावर तुमची सही मान्य करिता ~~~~ 4 Tides वापरावे. भीम आप् बद्दल प्रचालक त्यावर चर्चा करणार तुम्ही वरील गोष्टी नोंद ग्यावी --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:४१, २७ जानेवारी २०१७ (IST)Reply


सर, चर्चापानांवरील सही बाबत टायवीन म्हणताहेत ते बरोबर आहे, ज्यांच्या नावाने संदेश द्यावयाचा आहे त्यांचे नाव आधी लिहावे अशी विनंती. आहे. सध्या अनवधानाने आपल्याकडून स्वत:चे नाव संदेशाच्या शेवटी येण्या एवजी ज्यांच्याशी आपण चर्चा करु इच्छिता त्यांचे नाव शेवटी येत असल्याचे दिसते आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:१४, २८ जानेवारी २०१७ (IST)Reply

ईस्ट इंडियन भाषेतील लेख

संपादन

कॅथोलिक चर्चचे पवित्र साक्रामेंट हा लेख ईस्ट इंडियन भाषेत आहे. जो शुद्ध आहे. कृपा बिनकारांन वर्ग घालू नये --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:३०, २८ जानेवारी २०१७ (IST)Reply

संदेश देऊन 2 वेळी तुम्ही लेख खराब केली आहे. तो लेख बोलीभाषेचा आहे ज्याची माहिती तुमाला नाही .कृपा ते थांबावे नाहीतर योग्य करावाइ केली जाईल --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:४२, २८ जानेवारी २०१७ (IST)Reply

संदर्भ

संपादन

काही नोंद

संपादन

मी पहिले की सदर चित्रांवर माहिती बरोबर नाही तुम्ही पहिले असेल की मी त्याची नोंद प्रचालकांना दिले आहे परंतु काही कारवाहिच्या पूर्वी त्याची माहिती द्यावी

  1. [[चित्र:Fandryteam ameerkhan.jpg]]
  2. [[चित्र:Nagraj manjule.jpg]]
  3. [[चित्र:Gadgebaba prabodhan.jpg]]
  4. [[चित्र:Gadgebaba and tukadojimaharaj.jpg]]
  5. [[चित्र:Gadagebaba and dr.ambedkar.jpg]]
  6. [[चित्र:Traditional stone grinder.jpg]]
  7. [[चित्र:Namdevdhasal.jpg]]
  8. [[चित्र:Bhaiyyasaheb-ambedkar.jpg]]
  9. [[चित्र:Kalaram mandir satygrah.JPG]]
  10. [[चित्र:P22.gif]]

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:५९, २९ जानेवारी २०१७ (IST)Reply


# @Tiven2240: मला माझे काम करू द्या. आपण आपले डिलीट करण्याचे काम नियमित सुरु ठेवावे. @Mahitgar: सह अन्य प्रचालक तुमच्या सूडबुद्धीवर लक्ष ठेवतील अशी आशा आहे.
प्रसाद साळवे (चर्चा)१८:१२, २९ जानेवारी २०१७ (IST)Reply
Return to the user page of "प्रसाद साळवे/जुनी चर्चा २".