व्हिक्टोरिया अझारेन्का

(व्हिक्टोरिया अझारेंका या पानावरून पुनर्निर्देशित)


व्हिक्टोरिया अझारेन्का (बेलारूशियन: Вікторыя Азарэнка; ३१ जुलै १९८९, मिन्स्क) ही एक बेलारूशियन टेनिसपटू आहे. अझारेन्काने आजवर दोन एकेरी (२०१२२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन), २ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा (२००७ यू.एस. ओपन२००८ फ्रेंच ओपन) तसेच १५ एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१२ सालची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून ती जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचली.

व्हिक्टोरिया अझारेन्का
व्हिक्टोरिया अझारेन्का
व्हिक्टोरिया अझारेन्का
देश बेलारूस ध्वज बेलारूस
वास्तव्य स्कॉट्सडेल, फीनिक्स महानगर, अमेरिका
जन्म ३१ जुलै, १९८९ (1989-07-31) (वय: ३५)
मिन्स्क, बेलारूशियन सोसाग, सोव्हिएत संघ (आजचा बेलारूस)
उंची १.८० मी (५ फु ११ इं)
सुरुवात २००३
शैली एकहाती फोरहॅंड, दोन-हाती बॅकहॅंड, उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $१९,३३४,९२८
एकेरी
प्रदर्शन ३५७ - १३२
अजिंक्यपदे १५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१२, २०१३)
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००९, २०११)
विंबल्डन उपांत्यफेरी (२०११)
यू.एस. ओपन ४थी फेरी (२००७)
दुहेरी
प्रदर्शन 186–73
शेवटचा बदल: फेब्रु. २०१३.

वयाच्या चौदाव्या वर्षापासून अझारेन्का अमेरिकेमधील फीनिक्स शहराच्या स्कॉट्सडेल ह्या उपनगरात राहते. टेनिस खेळताना तोंडामधून जोरजोरात आवाज काढण्याच्या सवयीसाठी अझारेन्कावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. २०११ विंबल्डन दरम्यान अझारेन्का ९५ डेसिबल इतक्या आवाजात किंचाळत होती.

कारकीर्द

संपादन

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

संपादन

महिला एकेरी

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१२ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   मारिया शारापोव्हा 6–3, 6–0
उप-विजयी २०१२ यू.एस. ओपन हार्ड   सेरेना विल्यम्स 2–6, 6–2, 5–7
विजयी २०१३ ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड   ली ना 4–6, 6–4, 6–3

बाह्य दुवे

संपादन
मागील
  कॅरोलिन वॉझ्नियाकी
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
३० जानेवारी २०१२ - चालू
पुढील
सध्याची