डेसिबेल (dB) हे आवाजाची पातळी मोजण्याचे एक एकक आहे. ही पातळी ज्या ठिकाणी आवाज निर्माण होतो त्या ठिकाणी मोजली जाते. तेथून जसजसे दूर जाऊ तसतशी डेसिबेलची मात्रा कमीकमी होत जाते. हे लॉगरिथमिक स्केल असल्याने dBचे माप १०ने वाढले तर आवाजाची तीव्रता शंभरपट होते. शून्य dB म्हणजे ऐकू येणारा सर्वात हळू आवाज. त्याच्या दहापट मोठ्या आवाजाची मात्रा १० dB. २० dB आवाज म्हणजे सर्वात हळू आवाजाच्या १००पट मोठा आवाज; ३० dB म्हणजे हजारपट मोठा आवाज, वगैरे.

आवाजाच्या काही स्रोतांचे डेसिबेल मापनसंपादन करा

  • ऐकू येणारा सर्वात हळू आवाज (जवळजवळ पूर्ण शांतता) - शून्य dB
  • कुजबूज - १५ dB
  • सामान्य संभाषण - ३० dB
  • वाहनाचा किंवा यंत्राचा आवाज - ५० ते ६० dB
  • कारखान्याचा आवाज - ८० ते १०० dB
  • डॉल्बीचा
  या लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..
कृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.

आवाज - ११० dB

८० डेसिबेलपर्यंतचा आवाज सहन करता येतो. त्यापुढील आवाज सातत्याने ऐकला तर त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. कानात कापूस घालणे किंवा असे उपाय करून काही प्रमाणात होणारा त्रास कमी करता येऊ शकतो. मात्र हा निश्चित स्वरूपातील उपाय नाही. ९० डेसिबेलचा आवाज सतत ८ तास ऐकला तर कानाला इजा होते. १४० डेसिबेलचा आवाज ऐकला तर कानाचा पडदा तत्काळ फाटू शकतो.

मोठ्या आवाजामुळे कोणारे दुष्परिणामसंपादन करा

मोठय़ा आवाजामुळे उद्भवणार्‍या समस्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण करतात. पहिला प्रकार म्हणजे श्रवणशक्तीवर होणारा परिणाम किंवा ऐकण्याच्या समस्या. दुसरा भाग म्हणजे मानसिक किंवा इतर शारीरिक परिणाम.

ऐकण्याच्या समस्यांचा विचार केला तर तात्पुरते कमी ऐकू येणे किंवा अगदी कायमचा बहिरेपणाही येणे. कानावर झालेला परिणाम आवाज ऐकताना जणवत नाही पण त्यानंतर काही वेळाने ऐकू कमी येत असल्याचे किंवा दडे बसल्याचे जाणवते. हा परिणाम दोन-तीन दिवस राहू शकतो. त्यानंतर हळूहळू त्याचा परिणाम कमी होतो आणि ऐकू येऊ शकते. मात्र काहीवेळा मोठय़ा आवाजामुळे कानाचा पडदा, नसा यांवर गंभीर आघात होतात आणि परिणामी कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो.

कानात सतत वाजणार्‍या आवाजाचा (रिंगिंग इअर) त्रास तात्पुरता किंवा कायम स्वरूपाचा होऊ शकतो. ऐकण्याबाबतच्या समस्यांव्यतिरिक्त मोठ्या आवाजाचे शरीरावर इतरही अनेक दुष्परिणाम होतात. रक्तदाब वाढतो, डोके दुखते, घाबरल्यासारखे होते किंवा छातीत धडधडते. मोठा आवाज कानाच्या माध्यमातून मेंदू आणि शरीरापर्यंत पोहोचल्यावर हा शरीराकडून मिळणारा प्रतिसाद असतो.

डेसिबेल हे एकक आवाजाखेरीज अन्य कोणत्याही दोन शक्तींची तुलना करण्यासाठीही वापरतात. त्या दोन शक्तींपैकी पहिलीची मात्रा ही प्रमाण मात्रा म्हणून गृहीत धरलेली असते (Reference Value).


मापनाची एकके