हे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे.

लि ना अथवा ली ना (चिनी: 李娜; फीनयीन: Lǐ Nà, फेब्रुवारी २६, इ.स. १९८२) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. जानेवारी, इ.स. २०११मध्ये तिने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. किम क्लिस्टर्स हिने तिला अंतिम सामन्यात हरवल्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र लगेचच जून, इ.स. २०११मध्ये फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटालियन टेनिस खेळाडू फ्रांचेस्का स्क्यावोने हिला अंतिम फेरीत हरवत तिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये एकेरीचे अजिंक्यपद पटकावणारी ती पहिली आशियाई खेळाडू ठरली.

ली ना
२०१० श्टुटगार्ट स्पर्धेमध्ये ली ना
देश Flag of the People's Republic of China चीन
वास्तव्य वूहान, हूपै
जन्म २६ फेब्रुवारी, १९८२ (1982-02-26) (वय: ४२)
वूहान
उंची १.७२ मी
सुरुवात इ.स. १९९९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $१,३२,९९,१८९
एकेरी
प्रदर्शन 503–188
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३ (२८ ऑक्टोबर २००३)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१४)
फ्रेंच ओपन विजयी (२०११)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२००६, २०१०, २०१३)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (२०१३)
दुहेरी
प्रदर्शन 121–50
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ५४
शेवटचा बदल: जाने २०१३.


पदक माहिती
चीनचीन या देशासाठी खेळतांंना
आशियाई खेळ
सुवर्ण २०१० क्वांगचौ संघ
कांस्य २००६ दोहा एकेरी

विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या इ.स. २००६ सालातील मोसमात उपउपांत्य फेरीत पोचून अशी कामगिरी करणारी पहिली चिनी खेळाडू होण्याचा मान तिने पटकावला. इ.स. २००९ सालातील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत, तर इ.स. २०१० साली पुन्हा एकदा विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत तिने उपउपांत्य फेरीपर्यंत दौड मारली.

२०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजय मिळवून ली ने आपले दुसरे एकेरी ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवले.

कारकीर्द

संपादन

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०११ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   किम क्लाइस्टर्स 6–3, 3–6, 3–6
विजयी २०११ फ्रेंच ओपन क्ले   फ्रांचेस्का स्कियाव्होनी 6–4, 7–6(7–0)
उपविजयी २०१३ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   व्हिक्टोरिया अझारेन्का 6–4, 4–6, 3–6
विजयी २०१४ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   डॉमिनिका सिबुल्कोवा 7–6(7–3), 6–0

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत