वूहान
वूहान (सोपी चिनी लिपी: 武汉 ; पारंपरिक चिनी लिपी: 武漢 ; फीनयीन: Wǔhàn) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हूपै प्रांताची राजधानी असून, हे मध्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे. वूहानास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०११ च्या आकडेवारीनुसार वूहान शहरांतर्गत मोडणाऱ्या शहरी आणि उपनगरी भागांची एकत्रित लोकसंख्या १,००,२०,००० एवढी आहे.
वूहान 武汉 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
वरपासून : वूहान शहराची आकाशरेखा, पिवळ्या क्रौंचाचा मनोरा, वूहान कस्टम भवन, यांगत्से नदीवरचा वूहान पूल |
|
हूपै प्रांताच्या नकाशावर वूहान महानगर क्षेत्राचे स्थान | |
देश | चीन |
राज्य | हूपै |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व २२३ |
क्षेत्रफळ | ८,४६७ चौ. किमी (३,२६९ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ९१,००,००० |
- घनता | ४,२७८ /चौ. किमी (११,०८० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
http://www.wuhan.gov.cn |
वूहान शहर च्यांग-हान मैदानी प्रदेशाच्या पूर्वेकडील भागात यांगत्से व हान नद्यांच्या संगमावर वसले आहे. मध्य चिनात मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या या शहरातून देशातील अन्य ठिकाणांस पोचवणारे अनेक द्रुतगतिमार्ग, महामार्ग, लोहमार्ग जात असल्यामुळे वूहान देशांतर्गत वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी and इंग्लिश व फ्रेंच भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)