विलासराव बाळकृष्ण पाटील
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
विलासराव बाळकृष्ण पाटील – उंडाळकर | |
कार्यकाळ इ.स. १९६२ – इ.स. २०१४ | |
मतदारसंघ | कराड दक्षिण (विधानसभा मतदारसंघ) |
---|---|
जन्म | जुलै १५, इ.स. १९३८ उंडाळे, कराड, सातारा जिल्हा, महाराष्ट्र |
मृत्यू | जानेवारी ४, इ.स. २०२१ सातारा |
राजकीय पक्ष | भारतीय काँग्रेस पक्ष |
अपत्ये | ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर |
निवास | सातारा |
वयक्तिक माहिती
संपादनप्राथमिक_शिक्षण = जिल्हा लोकल बोर्ड, उंडाळे माध्यमिक_शिक्षण = टिळक हायस्कूल, कराड कॉलेज_शिक्षण = राजाराम कॉलेज, कोल्हापूर
- जिल्हा परिषद सदस्य 1967 ते 1972
- शिवाजी विद्यापीठ सेनेट सदस्य
- सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक Archived 2021-09-02 at the Wayback Machine. (1967 ते 2021)
- अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, सातारा
- सहकार चळवळ अभ्यासासाठी अमेरिका, इंग्लंड, जर्मन, फ्रान्स थायलंड दौरा
- जिल्हा परिषद सातारा 1967 ते 1972
- सातारा जिल्हा बँक Archived 2021-09-02 at the Wayback Machine. 1968 ते 2021
- लोकसभा 1979 तालुक्यातून - 33 हजारांची आघाडी
- कराड दक्षिण विधानसभा 1980 ते 85 - 21 हजार मतांनी विजय
- कराड दक्षिण विधानसभा 1985 ते 90 - 14 हजार मतांनी विजयी
- कराड दक्षिण विधानसभा 1990 ते 95 - 32 हजार मतांनी विजयी
- कराड दक्षिण विधानसभा 1995 ते 99 - 21 हजार मतांनी विजयी
- कराड दक्षिण विधानसभा 1999 ते 2004 - 23 हजार मतांनी विजयी
- कराड दक्षिण विधानसभा 2004 ते 2009 - 1 लाख मतांनी विजयी
- कराड दक्षिण विधानसभा 2009 ते 2014 - 15 हजार मतांनी विजयी
- दुग्धविकास, पशुसंवर्धनमंत्री 1991ते 1993 Archived 2021-09-06 at the Wayback Machine.
- विधी, न्याय व पुनर्वसनमंत्री 1999 ते 2003 Archived 2021-09-06 at the Wayback Machine.
- सहकार व वस्त्रोद्योगमंत्री 2003 ते 2004 Archived 2021-09-06 at the Wayback Machine.
- महाराष्ट्र शासनाचा चीन अभ्यास दौरा 2008
- 1975 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन
- देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची निर्मिती जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड सिंचन पॅटर्नची निर्मिती
- राज्यात मतदारसंघ विकासात अव्वल
- डोंगरी विकास निधीचे शिल्पकार
- . कोयना सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड, कराड
- . कराड तालुका सहकारी खरेदी - विक्री संघ लिमिटेड
- . शेती उत्पन्न बाजार समिती, कराड
- . ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे
- . स्वा. सै.शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, उंडाळे
- . कोयना सहकारी बँक लिमिटेड, कराड
- . रयत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, शेवाळेवाडी
- . धर्माध परिषद, मौजे तांबवे, ता.कराड
- . शैक्षणिक चिंतन परिषद, कराड
- . विज्ञान परिषद,कराड
- . डोंगरी परिषद,काळगाव ता. पाटण
- . घटना बचाव परिषद,कराड
महत्त्वकांशी उपक्रम
संपादन- 1975 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन 2) समाज प्रबोधन साहित्य संमेलन
- देशातील पहिला नदीजोड प्रकल्पाची निर्मिती
- जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड सिंचन पॅटर्नची निर्मिती
- राज्यात मतदारसंघ विकासात अव्वल
- डोंगरी विकास निधीचे शिल्पकार
- विधि मंडळामध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना राजीव फोर्सची स्थापना करून सरकार स्थिर राखले.
- 1967 सालापासून काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा आदेश अंतिम म्हणून आज अखेर निष्ठावान राहिले.
राजकीय प्रभाव क्षेत्र
संपादनकराड दक्षिण बरोबर सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर व पाटण मतदार विधानसभा संघात राजकीय प्राबल्य असून उर्वरित जिल्ह्यातील मतदार संघातील मोठ्या प्रमाणात जनसंपर्क व लोकसंग्रह केला.
- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Archived 2021-09-02 at the Wayback Machine. सन 1968 ते आज आखेर 50 वर्ष संचालक, काही काळ व्हाईस चेरमन व 40 वर्षे एक हाती नेतृत्व त्या काळामध्ये 6 वेळा नाबार्ड पुरस्कार प्राप्त बँक
- कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. कराड
- कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. खोडशी 4) शेती उत्पन्न बाजार समिती कराड
- स्वा. सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था लि. उंडाळे ता. कराड
- कोयना सहकारी बँक लिमिटेड कराड
- रयत सहकारी साखर कारखाना लि.शेवाळेवाडी
इ.संस्थावरती आजअखेर वर्चस्व राहिले.
शैक्षणिक क्षेत्रातील काम
संपादन- मौजे उंडाळे ता. कराड येथे ग्रामीण भागातील मुलामुलींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची Archived 2021-09-02 at the Wayback Machine. स्थापना.
सिंचन व्यवस्था
संपादनकराड दक्षिण विधान मतदार संघातील डोंगरी विभागात 20 वर्षापूर्वी नैसर्गिक पडणारे पावसाचे पाणी अडवून 2.5 टीएमसी पाणीसाठा केला.
देशातील पहिला नदीजोड प्रकल्प
संपादनसांगली जिल्ह्यातील वारणा नदीचे पाणी तीन डोंगर फोडून बोगदयावाटे दक्षिण मांड नदीच्या पात्रातून, सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीला मिळविले. त्यामुळे कराड दक्षिण विभागातील 2200 हेक्टर क्षेत्र बागायतीखाली आले.
दुष्काळी तालुक्यांना मदत
संपादन- माण व खटाव तालुक्यातील जनावरांना दुष्काळामध्ये, चारा छावण्या, देऊन मदत केली.
- माण, खटाव तालुक्यातील पावसाचे पडणारे पाणी, अडवण्यासाठी आमदार खंडातील 50 लाख रुपये एवढा फंड देणारे, एकमेव आमदार
वयाच्या 80 व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा 18 तास प्रवास करून मतदार संघातील जनतेशी जनसंपर्क ठेवला.
राजकीय व सामाजिक कारकिर्दीस प्रारंभ करताना 1967ला पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवून विजयी झाले. त्यानंतर म्हणजे 1968 साली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून निवड झाली. त्यापासून आजअखेर सलग 50 वर्षे काका संचालक म्हणून काम पाहत राहिले. त्यामधील काही वर्ष उपाध्यक्ष व त्यानंतर अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला. तसेच 40 वर्षे बँकेचे एकहाती नेतृत्व करून बँकेस नाबार्डचे 6 पुरस्कार प्राप्त करून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 1972 ते 1978 अखेर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. त्याच वेळी यशवंतराव चव्हाण (साहेब )कै. किसनवीर (आबा )यांच्या मुशीत काकांचे नेतृत्व तयार झाले. सन 1978 साली पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण साहेबांनी कराड लोकसभा मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी लोकसभा मतदार संघाचा कार्यक्षेत्रातील कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, महाबळेश्वर, जावळी या विधानसभा मतदार संघातून मताधिक्य मिळवत सातारा जिल्ह्यातील कराड लोकसभा मतदार संघातील तालुका मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. तथापि शिराळा व वाळवा तालुक्यामध्ये मताधिक्य कमी झाल्याने लोकसभेला काकांचा अल्पशा मतांनी पराभव झाला. परंतु लगेच 1980 साली झालेली विधानसभा निवडणूक लढवून ते प्रचंड मतांनी विजयी झाले. व खऱ्या अर्थाने मागासलेल्या डोंगरी भागातील विकास कामांची कोंडी फुटली व विकासाला चालना मिळाली.
1980 सालापासून ते सन 2014 पर्यंत सलग 35 वर्षे काकांनी कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. साखर कारखानदार, सरजमदाई प्रवृत्ती अशा राजकीय बलाढ्य शक्तीच्या विरोधात सर्व सामान्य माणसाचे नेतृत्व म्हणून रयत संघटनेच्या माध्यमातून विकासाची चळवळ उभी केली. ज्या कार्यकर्त्यांना राजकीय गॉडफादर नाही, अशा कार्यकर्त्यांना संघटनेच्या ताकतीवर सत्तेच्या केंद्रस्थानी आणले.
कराड दक्षिण मतदार संघाचे 1980 पासून आमदार असताना त्यामध्ये 1991 ते 1993 या कालावधी मध्ये दूध विकास, पशुसंवर्धन मंत्री, सन 1999 - 2003 विधी, न्याय, पुनर्वसन मंत्री, 2003 - 2004 सहकार व वस्त्रोद्योग मंत्री अशी महत्त्वाचे खाती संभाळली व त्यांनी या कालावधीत लोकउपयोगी महत्त्वाचे कायदे, किंवा योजना राबविण्याच्या दृष्टीने शासनास निर्णय घेण्यास भाग पाडले. सहकार चळवळ अनुभवासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड, जर्मन, फ्रान्स व थायलंड दौरा केला. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनामार्फत चीनचा अभ्यास दौरा 2008 साली काकांनी केला.
सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये डोंगरी परिषद, जाती व धर्मांध परिषद, घटना बचाव परिषद, विज्ञान परिषद, व शैक्षणिक चिंतन इत्यादी परिषद घेऊन आयोजन करून त्या यशस्वी करून दाखविल्या तसेच आजअखेर सुद्धा समाज प्रबोधनाचे काम अखंडपणे करीत राहिले. त्याचप्रमाणे कराडला मराठी साहित्य संमेल्लन घेऊन त्यांचे नीटनेटके नियोजन केले.
सन 1976 सालापासून काकांचे वडील स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गेली 42 वर्षे त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन उंडाळ्या सारख्या छोट्या खेड्यामध्ये भरविले. त्या माध्यमातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी पेन्शन, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच अधिवेशनामध्ये झालेल्या ठरावाची अंमलबजावणी शासन दरबारी पाठपुरावा करून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिकांचे वारस म्हणून खंबीरपणे भूमिका बजावली. स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याचा खऱ्या अर्थाने काकांनी प्रयत्न करून अनेकांची कुटुंबे उभी केली. तसेच त्याचबरोबर त्यांनी उंडाळे येथे समाज प्रबोधन साहित्य संमेल्लन, कवी संमेल्लन व विज्ञान मंच या माध्यमातून तरुण पिढीचे प्रबोधन करण्याचे महान कार्य केले.
महाराष्ट्र मध्ये विलासकाका यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये आपल्या कारकिर्दीत पावसाचे पडणारे पाणी जवळजवळ 2.5 टीएमसी एवढे अडवण्याचा प्रयत्न केला. व त्यामध्ये त्यांना यश आले. सिंचन व्यवस्थेबरोबर माणसांना आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा त्यामध्ये रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य या सुविधा सुद्धा प्रत्येक गावांमध्ये नव्हे तर वाडी-वस्तीवर पोचविल्या त्याचप्रमाणे देशातील महत्त्वाकांक्षी असा नदीजोड प्रकल्प म्हणून वारणेचे पाणी कृष्णा नदीला मिळवण्याकरिता तीन डोंगर फोडून वाकुर्डी उपसा सिंचन योजना यशस्वी करून दाखविले. त्यामुळे कराड दक्षिण डोंगरी विभागातील 2200 (बावीसे ) हेक्टर शेतीला मुबलक पाणी मिळाले. जिथे कूसळ उगवत नव्हते तेथे मुसळा एवढा ऊस पिकू लागला, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. मुंबईचा माथाडी कामगार आपल्या गावी येऊन विविध पिकांचे उत्पादन घेऊन आनंदी जीवन जगू लागला. अन् त्यामुळे मुंबईकडे धावणारा लोकांचा लोंढा आपोआप थांबला.
रयत संघटनेतील सामान्य कार्यकर्त्यांचा व शेतकऱ्यांचा स्वाभिमान अबाधित राहावा. म्हणून त्यांच्या आडीअडचणींना पत पुरवठा करण्यासाठी त्यांनी स्वा. सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व कोयना सहकारी बँकेची स्थापना करून खऱ्या अर्थाने सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. डोंगरी विभागातील मुला-मुलींना शिक्षण सहज घेता यावे यासाठी त्यांनी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची स्थापना करून दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
शेती उत्पन्न बाजार समिती कराड ही काकांच्या नेतृत्वाखाली आलेनंतर त्यामध्ये काकांनी भविष्याचा विचार करता शामराव पाटील फळे, फुले, भाजी मार्केटची जागा 15.60 हेक्टर घेऊन त्यामध्ये अदयावत असा बैलबाजार व भाजीपाला मार्केट उभे केले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी व शेतीमध्ये उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने कै. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे नावाने राष्ट्रीय स्तरावरील कृषी व पशुपक्षी प्रदर्शन गेली 15 वर्षे काकांच्या मार्गदर्शनाखाली भरवली जात आहे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी कराड दक्षिणच्या पश्चिमेकडील डोंगर विभागात रयत सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे गेली 40 वर्षे कराड खरेदी-विक्री संघाची एकहाती नेतृत्व करून संघ महाराष्ट्रात 1 नंबर वर ठेवला. त्याच बरोबर शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी म्हणून काकांनी सहकारी तत्त्वावरील कोयना दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादित दुधाला योग्य भाव देऊन त्याच्यामध्ये आर्थिक क्रांती घडवून आणली. आणि सातारा जिल्ह्यामध्ये सहकारी तत्त्वावरती कोयना दूध संघ आपल्या कडक शिस्तीच्या आणि योग्य नियोजनाने आजही महाराष्ट्रामध्ये कोयना दूध संघ अग्रेसर ठेवलेला आ हे.
महाराष्ट्र विधानसभेतील काका हे एकमेव आमदार आहेत. की त्यांनी आपल्या स्वतःचा आमदार फंडातील 50,00,000/- ( पन्नास लाख फक्त ) माण, खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यांना 'पाणी आडवा पाणी जिरवा' या योजनेसाठी दिले आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
.
कराड दक्षिण मतदार संघ राज्याच्या विकासाला नव्या संकल्प संकल्पना देणारा विकासाचा आयडॉल
संपादन
शासनाच्या विकास योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा, या उद्देशाने पंडित नेहरू यांच्यापासून इंदिरा गांधी, स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पर्यंतच्या राजकारण्यांनी विविध योजना राबवल्या. विकास योजना बनवल्या, अशा प्रकारच्या सर्व विकास योजनांची राबवनूक विलासकाकांनी मतदारसंघात करून राज्यापुढे विकासाचा आदर्श उभा केला. सर्वसामान्य माणसाचा विकास साधताना त्यांच्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी काही नव्या विकास योजनांची संकल्पना मांडली. या योजनांची मतदारसंघात राबवणूक करून राज्याच्या विकासाला गती दिली. कराड दक्षिणेतील विकासाबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून विलासकाकांनी राज्यात वेगळा ठसा उमटवला.
विलासकाका 1967 साली जिल्हा परिषद, सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारणात सक्रिय झाले. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेल्या घराण्याचा वारसा, स्व. यशवंतराव चव्हाण, किसनवीरांच्या मार्गदर्शनाखाली विलासकाकांनी राजकारण व सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. 1980 साली ते प्रथम विधानसभेवर निवडून गेले. साखर कारखानदारी, राजकीय बलाढ्य शक्तीविरोधात सर्वसामान्य माणसांचे नेतृत्व म्हणून 'रयत संघटनेच्या' माध्यमातून विकासाची चळवळ त्यांनी उभी केली. गावा गावातील सामान्य कार्यकर्त्यांचे संघटन करून 'विकास मावळ्यांचे' मतदारसंघात जाळे विणले. ज्या कार्यकर्त्यांना गॉडफादर नाही अशा कार्यकर्त्यांना संघटनेच्या ताकदीवर सत्तेच्या केंद्रस्थानी आणले. भल्याभल्यांचा पराभव करून सलग 6 वेळा विधानसभेत निवडून जाणारे ते एकमेव आमदार ठरले आहेत. स्वकर्तुत्वावर राज्याच्या राजकारणात त्यांनी दबदबा निर्माण केला. अनेक बड्या राजकारण्यांनी त्यांचा धसका घेऊन जनाधार असतानाही त्यांना राज्याच्या सत्तेबाहेरच ठेवले. मात्र सत्ता असो वा नसो मतदारसंघाच्या विकासाचा ध्याय घेऊन सरकारची तिजोरी सातत्याने मतदार संघाकडे वळवली. आपला सामान्य माणूस सुधारला पाहिजे ही सततची त्यांची धडपड राहिली.अनेक विकास योजनांचे ते शिल्पकार ठरले.राजकीय चारित्र्य स्वच्छ ठेवत स्वतःला समाजहितासाठी वाहून घेतले. आज विलासकाकांच्या त्यागाची, कल्पक नेतृत्वाची फळे येथील जनता चाखते आहे. त्याचे साक्षीदार आमदार म्हणून विलासकाकाच आहेत. यांचा अभिमान येथील जनतेला आहे.
राजकीय कारकिर्दीत पद, प्रतिष्ठा याला महत्त्व न देता, जिथे उभे राहतील तिथे समृद्धी साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कार्यकर्त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या घोंगड्यावर बसून मिळेल ती चटणी भाकरी खाऊन विकासाची चर्चा करणारे एकमेव आमदार म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.पी.ए. नाही. खिशाला पेन, मोबाईल नाही. अशा परिस्थितीत दांडगा जनसंपर्क त्यांनी साधला आहे. अशा या विकास नेतृत्वाच्या नव्या पिढीने आदर्श घ्यावा. त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे.
आमदार फंड सन 2005 – 2010
संपादन- प्राथमिक शाळा खोल्या 102 गावांसाठी 1.75 कोटी निधी
- सामाजिक सभागृहे 42 गावांसाठी 1.60 कोटी निधी
- विशेष दुरुस्ती रस्ता 66 गावासाठी 2.76 कोटी निधी
- पुरहानी योजनेतून रस्ते 138 गावांसाठी 1.80 कोटी निधी
- वैद्यकीय व पशुवैद्यकीय विकाससाठी 31 गावांमध्ये 1. 70 कोटी निधी
- चावडी व्यायामशाळा /व्यासपीठ यांच्यासाठी 17 गावामध्ये 0.51 कोटी
- समशानभूमी, दफनभूमी इत्यादीसाठी 54 गावांमध्ये 1.05 कोटी निधी
- गावांतर्गत रस्ते सुधार योजना 11 गावामध्ये 0.40 कोटी निधी
एकूण 461 गावांमध्ये 11.57 कोटी निधी
राज्याच्या विकासाला नव्या संकल्पना देणारा दक्षिण कराडचा विकास
संपादनविकासाला सीमा नसतात, मर्यादा नसतात मात्र विकासातून घडतो तो सामान्य माणूस. याची प्रचिती देणारा विकास कराड दक्षिण मतदारसंघात साधला आहे येथील लोकप्रतिनिधी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कल्पक व दूरदृष्टीच्या नेतृत्वातुन सर्वांगीण विकासाच्या योजनांना कराड दक्षिण मतदार संघाने जन्म दिला आहे. सर्वसामान्य माणसांच्या विकासाशी निगडित असणाऱ्या या योजनांचे जन्मदातेही दुसरे तिसरे कोणी नसून, विलासकाकाच आहेत. सलग 30 वर्षे विधानसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विलासकाकांनी प्रत्येक पंचवार्षिक मध्ये राज्यातील 288 आमदारांमध्ये विकास कामात सातत्याने वरचा क्रमांक कायम ठेवला आहे. प्रत्येक आमदारास 80 लाख ते 1 कोटी रुपयांचा आमदार फंड मिळतो. मात्र कराड दक्षिणेत तब्बल 10 कोटींचा विकास निधी आमदार फंडातून खर्ची पडलेला दिसतो. एक आमदार 10 आमदारांचा विकास निधी मतदार संघात आणत असताना यामध्ये शासकीय सर्व योजनाचा सहभाग आलेला आहे.
2009 मध्ये मतदार संघांच्या विकासावर दृष्टिक्षेप टाकला तर मतदारसंघात लोकांना आमदारांना मागण्यासारखे विकासाचे काम शिल्लकच राहिले नाही. रस्ते, सिंचन, शिक्षण, आरोग्य, पर्यटन यासह सर्व पातळ्यांवर येथील विकास राज्याला आदर्शवत आहे. 1980 पूर्वी या मतदारसंघात थेट उलटी परिस्थिती होती. रस्ते नाही, पाणी नाही, आरोग्य नाही, शिक्षणाचे बात तर दूरच होती. आदिवासी सारखे जिणे इथले लोक जगत होते. सर्व क्षेत्रांमध्ये पिछाडीवर असलेल्या या मतदारसघाची विकासाची दारे उघडली ती 1980 साली आमदार विलासकाकांच्या नेतृत्वामुळे. विलासकाका आले अन् विकासाची कोंडी फुटली.
आ. विलासकाकांनी विकासकामे राबवताना जनतेचे हित लक्षात घेऊन अनेक वेळा शासकीय नियम धाब्यावर बसवले. वेळप्रसंगी शासनाच्या विकास तरतुदीमध्ये ही सरकारला बदल करायला लावले. डोंगरी विकासनिधीच्या संकल्पने बरोबर समशानभूमी निधी, पूरग्रस्त गावांना बोटीसाठी आमदार निधी अशा नव्या संकल्पना मांडल्या. मतदारसंघात तांबवे, शेरे, दुशेरे, खुबी आदी पूरग्रस्त गावांना राज्यात प्रथम आमदार फंडातून बोटी दिल्या आहेत.
कृष्णाघाट
संपादनकृष्णाकाठच्या जनतेचा व कृष्णा नदीचा नित्याचा संबंध आहे. यामुळे नदीवर ग्रामस्थ,महिला यांची सततची वर्दळ असते. कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, नदीकाठावर पूजा, धार्मिक विधीसाठी गर्दी व्हायची. समशान भूमीही कृष्णाकाठावरच असल्याने जन्मापासून मृत्यूपर्यंत येथील जनतेचा कृष्णा नदीशी संबंध आहे. येथील जनतेच्या समस्या लक्षात घेऊन विलासकाकांनी कृष्णाकाठच्या गावात 'कृष्णा घाटा'ची संकल्पना राबवून मूलभूत सुविधाइतकी महत्त्वपूर्ण गरज भागवली. कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रुक, कार्वे, शेरे, गोंदी, दुशेरे, मालखेड, कोडोली, अटके, पाचवड, गोळेश्वर, रेठरे खुर्द, खुबी व कोयना काठच्या तांबवे गावी कृष्णघाट बांधून येथील ग्रामस्थांना महत्त्वाच्या सुविधा निर्माण केल्या. हे घाट गावाच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरले. रेठरे बुद्रुक कृष्णा घाटाला 'कै. आबासाहेब मोहिते कृष्णा घाट' असे नामकरण करून स्थानिक जनतेच्या भावना जोपासल्या. कृष्णा घाटाने पाचवडेश्वर पर्यटनस्थळाच्या सौंदर्यात भर घातली आहे. येथे येणाऱ्या भाविकांची ही चांगल्याप्रकारे सोय झाली आहे. कृष्णा घाटाच्या संकल्पनेमुळे कृष्णाकाठच्या गावाची वर्षानुवर्षेची समस्या मिटल्याने लोकप्रतिनिधींना येथील जनता धन्यवाद देत आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने मूलभूत विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या डोंगरी भागाच्या महात्मा गांधी, स्व. यशवंतराव चव्हाण, थोर स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या विकासाची प्रेरणा या विकासापाठीमागे आहे. खेड्यातला माणूस सुधारला पाहिजे यासाठी शासनाच्या अनेक योजना विलासकाकांनी राबवल्या. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नव्या योजनांची संकल्पना मांडून त्यांचे पहिले प्रयोग कराड दक्षिण मतदार संघात राबवले. इंदिरा गांधीजींचा मूलभूत विकासाचा 20 कलमी कार्यक्रम राबवणार व राज्यापुढे विकासाचा आदर्श ठेवणारा मतदारसंघ म्हणून कराड दक्षिण नावारूपास आला आहे. डोंगरी विकास , समशानभूमी सुधारणा, पूरग्रस्त गावांना बोटी, गावांतर्गत रस्ता सुधार योजना या योजनांचा पहिल्यांदा पाठपुरावा विलासकाकांनी विधानभवनात करून त्यांना मंजुऱ्याही आणल्या. आमदार फंडाचा वापर करताना त्यांनी कटाक्षाने गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवला. समाजमंदिरे, समशानभूमी, शाळा खोल्या, सार्वजनिक व्यासपीठ, रस्ते, व्यायाम शाळा, ग्रंथालये पिण्याच्या पाण्याची योजना या प्रकारच्या सुविधा प्राधान्याने मतदारसंघाला दिल्या. बहुविकासाचा कराड दक्षिण पॅटर्न निर्माण करून डोंगरी जनतेला खऱ्या अर्थाने विकासाचे स्वातंत्र्य मिळवून दिले. राजकारण निवडणुकीपुरते ठेवून समाजकारण केले. 'आमदार' ही शोभेची वस्तू नसून ते विकासाचे मॉडेल आहे. हे त्यांनी विकासकर्तृत्वातून सिद्ध केले. विकास आणि सामान्य माणूस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याची पुरेपूर जाणीव विलासकाकांनी ठेवून हे गाव माझ्या पाठीशी आहे, दुसरे नाही, असा कोणताही भेदभाव न ठेवता धनगरवाडा ते रेठरे पर्यंत समतोल विकास साधला. यामुळे कराड दक्षिणेतील जनतेसाठी विलास काकांचे नेतृत्व एक विकास वृक्षच ठरले आहे.
श्रीमती सोनिया गांधी यांची ऐतिहासिक सभा
संपादन1999च्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून संपूर्ण काँग्रेस भुईसपाट झाली. जिल्ह्यातील दोन लोकसभा व दहा विधानसभा मतदार संघांपैकी फक्त एकट्या कराड दक्षिण मतदार संघात काँग्रेसची विजयी पताका विलासकाकांनी कायम ठेवली. काँग्रेसने काकांना दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद बहाल केले. सातारा जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रवादीमय वातावरण असताना श्रीमती सोनिया गांधीची जाहीर सभा आव्हान होते. विलासकाकांनी ते आव्हान स्वीकारले. 19 ऑक्टोबर 2003 रोजी कराडच्या शिवाजी स्टेडियमवर श्रीमती सोनिया गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले. स्टेडियमची क्षमता 1 लाख लोकांची आहे. त्यातच सोनिया गांधी खटाव, कडेगाव दौरा करून कराडच्या जाहीर सभेला येणार होत्या. यामुळे लोक जमविण्याचे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीतही सोनिया गांधींच्या सभेसाठी स्टेडियमच्या आवारात क्षमतेपेक्षा जास्त लोक जमले. यामुळे विलासकाकांच्या जनधारांची प्रचिती राज्याच्या व केंद्राच्या नेत्यांना आली. या सभेस शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, रणजित देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती होती.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा उंडाळे
संपादनउंडाळे येथे 1975 पासून विलासकाका राज्यस्तरीय स्वातंत्र्यसंग्राम अधिवेशनाचे आयोजन करतात. या व्यासपीठावर देशभरातील स्वातंत्र्यसेनानी व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. या व्यासपीठावर देशातील सर्वोच्च व्यक्तीला आणण्याची काकांची इच्छा होती. 2009च्या अधिवेशनास अनेक अडचणीवर मात करत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना उंडाळेसारख्या ग्रामीण भागात आणले. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 1 असा हा कार्यक्रम झाला. भागातील 25 हजार शेतकरी महिलांच्या समुदायाने हा सोहळा पाहिला. यावेळी राष्ट्रपतींनी स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली 24 ऑगस्ट 1942 रोजी निघालेल्या मोर्चाच्या आठवणींना उजाळा दिला. विलासकाकांनी आयोजित केलेला स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा जागतिक अडचणीच्या परिस्थितीत भारताला दीपस्तंभ बनविण्यासाठी मार्गदर्शक बनेल, असे गौरवोद्गार काढून काकांना धन्यवाद दिले.
शैक्षणिक चिंतन परिषद
संपादनविलासकाकांच्या पुढाकारातून कराड येथे 31 मे ते 1 जून 2003 या काळाचे शैक्षणिक चिंतन परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर मु.गो. ताकवले, पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर अशोक केळकर, संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर, प्राचार्य पी. बी.पाटील, डॉक्टर स्नेहलता देशमुख, आचार्य वामनराव अभ्यकर प्राचार्य सौ. मीना चंदावरकर आदी मान्यवरांनी शिक्षणाविषयी आपले विचार व्यक्त करून पुढच्या शिक्षणाची दिशा स्पष्ट केली. या परिषदेचा लाभ तालुक्यातील 16 हजार विद्यार्थी, 200 विज्ञान शिक्षकांसह हजारो लोकांनी घेतला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी स्वा. दादा उंडाळकर स्मारक समिती, गोखले एज्युकेशन सोसायटी, शिक्षण मंडळ कराड यांनी प्रयत्न केले.
राजकीय कारकिर्दीत अनेक थोर स्वातंत्र्य सेनानी, नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ , साहित्यिक यांचा सहवास लाभला. सामान्य माणूस प्रगल्भ करण्यासाठी या मान्यवरांचा आपण उपयोग करून घेतला. विकासाला विज्ञान युगाची जोड हवी यासाठी माशेलकर, गोवारीकर, निगवेकर यासारख्या शास्त्रज्ञांना आणले. शिक्षण परिषद, वकील परिषद, साहित्य संमेलन, कृषी प्रदर्शन या माध्यमातून समाज घडविण्याचे काम केले.
आकडे नाही
संपादनगेल्या 5 वर्षाचा आढावा पहिल्यास गेल्या 5 वर्षात स्थानिक विकास निधीतून 2 कोटी 76 लाख,पुरहानीतून 1 कोटी 79 लाख, केंद्रीय रस्ते विकास निधीतून 22 कोटी 85 लाख, नाबार्ड योजनेतून 26 कोटी 10 लाख व अर्थसंकल्पीय बजेटमधून 35 कोटी, गौण खजिन व डोंगरी विकास व इतर निधीतून 2 कोटी असे एकूण रस्ते उभारणीकरीता 100 कोटी रुपये मतदारसंघात आणले आहेत.
सह्याद्रीच्या पाऊलवाटा बनल्या हमरस्ते
संपादनसह्याद्री पर्वताच्या प्रत्येक दऱ्याखोऱ्यात मतदार संघ विभागलेला आहे. यातील प्रत्येक गावाला जायचं तर 'वाई वरून सातारा' अशी परिस्थिती होती. मग ते येळगाव - गुढे रस्त्याचे असो अथवा जिंती - साळशिरंबे उंडाळे - कोळेवाडी अंबवडे - मार्गे तांबवे - साकुर्डी या रस्त्यांचे असो. डोंगर फोडून केलेले दोनच रस्ते त्यांच्या डोंगरा एवढ्या कार्याची प्रचिती देतात. कुंभारगाव येवती - ओंड रस्ता आणि काळगाव खोऱ्यातील 100हून कमी लोकसंख्या असलेल्या गावात साठी काढलेले कोट्यवधी रुपये खर्चाचे रस्ते, आज त्यांच्यातील विकासाभिमुख नेतृत्व गुणांची साक्ष पटविणारे आहेत. ज्या दऱ्या-खोऱ्यातून पावसाळ्यात आजारी माणसाला पालखीत घालून दवाखान्यात नेले जात होते, त्या सह्याद्रीतील गावांना कायमस्वरूपी पक्क्या रस्त्याने काकांनी जोडले आहे.त्यांनी नद्या वर उभारलेले पूल म्हणजे काही कोट्यवधीची कामे आहेत. प्रत्येक कामात दूरदृष्टी ठेवून व टक्केवारीला फाटा देत अति उच्च दर्जाचे त्यांनी कामे करून घेतली आहेत. त्यामुळे सह्याद्री पावसाचे प्रमाण सर्वाधिक असूनही येथील रस्ते दृष्ट लागण्या सारखे वाटतात.
"मतदार संघातील प्रमुख गावे विलासकाकांनी अथक प्रयत्न व शासनाचा मोठा निधी खर्चून चौफेर रस्त्यांनी जोडली आहेत. याचा सर्वाधिक फायदा काले, शेरे गावाला झाला आहे. विस्ताराने मोठे असणाऱ्या या गावांच्या शेतातील सर्व वस्त्यांना रस्त्यांची सुविधा मिळाली आहे. या बरोबर शेतात पिकणारा माल बाजारपेठत नेण्यासाठी हे रस्ते उपयुक्त ठरले आहेत. अशा प्रकारे मतदार संघातील प्रमुख गावांनाही चौफेर रस्ते आहेत. शरीरातील रक्तवाहिन्या प्रमाणे दक्षिण कराडच्या विकासाचे 'रस्ते' हे रक्तवाहिन्याच ठरल्या आहेत."
पावसाळा आला की, कृष्णा व कोयना काठच्या तांबवे, शेरे, खुबी, दुशेरे गावांमध्ये पुराची दहशत निर्माण व्हायची. पूर आला की संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा बसायचा. जीव मुठीत घेऊन या काळात लोक जीवन जगायचे. ही पूर्ण परिस्थिती काकांनी बदलली. या गावांना पुरकाळात संरक्षणासाठी बोटी दिल्या. प्रत्येक गावासाठी पूर परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विशेष रस्ते निर्माण केले आहेत. ही गावे आता पूर्वकाळातील चिंतामुक्त झाले आहेत.
रस्ते विकास निधी 2004 ते 2009
संपादन- केंद्रीय रस्ते विकास निधीसाठी 23 कोटी निधी
- नाबार्ड साठी 26 कोटी
- स्थानिक विकास निधी साठी 3 कोटी
- इतर विकास निधीसाठी 11 कोटी
- पुरहानी निधी 2 कोटी
- अर्थसंकल्प बजेट 35 कोटी
- एकूण 100 कोटी
महिला सबलीकरण
संपादनशिक्षणाबरोबर महिला सबल झाली पाहिजे यासाठी त्यांनी गाव तिथे आरोग्य, शाळा, रस्ते, शुद्ध पाणी पोचवून महिलांचे कष्टप्राय जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. शेती बरोबर दुग्ध व्यवसाय वाढला पाहिजे. याशिवाय महिलांच्या हातात पैसा येणार नाही. हे लक्षात घेऊन सातारा बँक, कोयना दूध संघाच्या माध्यमातून मतदारसंघात दुधाची क्रांती केली. महिलांचे बचत गट, त्यासाठी कर्ज पुरवठा याबरोबर महिला मेळाव्याच्या माध्यमातून प्रबोधन करून मतदारसंघातील महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले आहे. आज येथील महिला आदर्श गृहिणी, शेती बरोबर विविध व्यवसाय, राजकारण, शासकीय अधिकारी पदाबरोबर अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली, राष्ट्रपती भवनात जाऊन पोचल्या आहेत.
आरोग्याची विकास संजीवनी
संपादनशुद्ध आणि स्वच्छ पाणी असेल तर तेथील जनतेचे आरोग्य निरोगी राहते. आ. विलासकाकांनी डोंगरी भागातील वाडीवस्तीवर स्वच्छ पाणी पोहोचवले. गाव तिथे विहीर - बोरवेल, नळपाणी पुरवठा योजना कृष्णाकाठी जलशुद्धीकरण प्रकल्प राबवून जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा केला. 20 कोटी उंडाळे सह 17 गावे नळ पाणी पुरवठा योजना, कोडोलीची 1 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना दिली.
पूर्वी नारु, गॅस्ट्रो यासह या साथीच्या आजारांमुळे समाज त्रस्त होता. जनतेला तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी काले,येवती, रेठरे, कोळे, सुपने, तळमावले (पाटण), उंडाळे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुविधा उपलब्ध केली. मतदार संघातील चार ते पाच गावांसाठी आरोग्य उपकेंद्रे सुरू केली. मध्यवर्ती असणाऱ्या उंडाळे येथे ग्रामीण रुग्णालय आणले. या रुग्णालयाची 2 कोटी रुपये खर्चाची सुसज्ज इमारत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांचा वेळोवेळी आढावा घेऊन लागणारा निधी, सुविधा उपलब्ध करून जनतेचे आरोग्य जपण्याचे काम काका सातत्याने करत आहेत.
मतदारसंघातील जनतेचा व्यवसाय शेती हा असून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन हा जोड व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहासाठी पशुधन महत्त्वाचे असल्याने कराड तालुक्यात अद्यावत पशु वैद्यकीय सुविधा विलासकाकानी निर्माण केल्या आहेत. पशुवैद्यकीय खात्याचे मंत्री असताना कराड येथे जनावरांची एक्स-रे सुविधा उपलब्ध केली.ओंड, काले, उंडाळे, येळगाव, वाठार,सुपने, तांबवे, म्हसोली, शेरे, बेलवडे बुद्रुक, आटके या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करून शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सुविधा पुरवल्या. विलासकाकांनी जेथे - जेथे घातले तेथे - तेथे त्यांनी सोने केले. सर्वसामान्य माणसापर्यंत सुविधा पोहचवलीच पाहिजे, असा त्यांचा ध्यास राहिला आहे. पशुवैद्यकीय दवाखाने तालुकास्तर, विभागवार होते. मात्र एक्सरे प्रयोगशाळा सुविधा फक्त जिल्हास्तरावर होत्या. ही बाब पशुसंवर्धन मंत्री असताना लक्षात येताच राज्यातील प्रत्येक मोठ्या तालुक्यात पशुचिकित्सालयची सुविधा पुरवून एक्स-रे, प्रयोगशाळेसह आधुनिक सुविधा पुरवल्या. कराड येथे यामुळे शेतकऱ्यांना सर्व प्रकारची पशुवैद्यकीय सुविधा आज मिळत आहेत. सुमारे 50 लाख रुपयांचा निधी यासाठी टप्प्याटप्प्याने काकांच्या प्रयत्नामुळे मिळाला आहे.
वैद्यकीय सुविधा
संपादन- ग्रामीण रुग्णालय 1
- प्राथमिक आरोग्य केंद्र 7
- आरोग्य उपकेंद्र 21
पशुवैद्यकीय सुविधा
संपादन- पशुवैद्यकीय चिकित्सालय 1
- पशुवैद्यकिय दवाखाने 11
"30 वर्षाच्या सत्तेत सामान्य माणसाला निर्भय बनवण्याचे काम केले. मतदारसंघात मूलभूत सुविधा निर्माण करण्या बरोबर समाजाच्या अंतिम घटकापर्यंत विकास पोहोचवला. यामुळे मतदारसंघाला मानवी चेहरा देण्याचा आपणाला यश आले." - विलासकाका - उंडाळकर
सिंचन योजनांची माहिती
संपादनसिंचन प्रकल्प पाणीसाठा द.ल.घ.फुट बागायती हेक्टरमध्ये
संपादन- येवती - म्हासोली 258.00 2000
- घोगाव 42.59 270
- टाळगाव 32.00 200
- उंडाळे 70.00 500
- जिंती 42.64 350
- माटेकरवाडी 36.00 225
- तुळसण - सवादे 45.00 300
- गोटेवाडी 17.00 125
- येळगाव 70.00 450
- काळगाव 90.00 600
- अकाईचीवाडी 21.00 135
- खोचरेवाडी 16.00 100
- महारुगडेवाडी 18.00 128
- शेवाळवाडी (येवती) 17.00 125
- घराळवाडी 14.00 90
- पाचुपतेवाडी 19.00 130
- लोहारवाडी 16.00 100
- ग्रामतलाव 110.00 650
- जलसंधारण 350 2300
- वनतळी (वनविभाग) 150 -
- कोल्हापुरी बंधारे 50.00 300
- वाकुर्डे योजना 1000 6000
- मराठवाडी प्रकल्प 2000 12000
जलसंधारण
संपादनकराड दक्षिण डोंगरे विभागातील 25000 हेक्टर क्षेत्रामध्ये पाणी अडवण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून झाले. नागार्जुन विकास खोरे माध्यमातून डोंगर विभागाला तब्बल 6 कोटीचा निधी मंजूर झाला असून या माध्यमातून संपूर्ण डोंगरी भागावर जलसंधारणाचे काम झाले आहे. पाणी जिरवण्याबरोबर जमिनीची मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबली आहे. याबरोबरच पाण्याबरोबर वाहून जाणारे गाळाचे प्रमाण थांबल्यामुळे लघुपाटबंधारे, नदी, कृष्णा नदीवरील धरणामध्ये साठवणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी झाले आहे.
अशाप्रकारे कृषी विभागाबरोबर पर्यावरण संवर्धनाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने माड नदी खोऱ्यात झाले आहे. याचे संपूर्ण श्रेय आमदार विलासकाकांच्या नेतृत्वाला व कृषी विभाग अधिकाऱ्यांच्या चिकाटीला जातेमितीला कराड - पाटण तालुक्याच्या डोंगरे विभागात येवती - म्हासोली,येणपे, जिंती, उंडाळे, घोगाव- टाळगाव, साळशिरंबे, अकाईचीवाडी, खोचरेवाडी, महारुगडेवाडी, लोहारवाडी, माटेकरवाडी घराळवाडी येथे सिंचनप्रकल्प उभारून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक केली आहे. या प्रकल्पामुळे हा परिसर टॅंकरमुक्त झाला तर सुमारे 50 टक्के क्षेत्र हंगामी व कायमस्वरूपी बागायती करण्यात यश आले आहे. येवती कॅनॉल दुरुस्ती व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्तीसाठी या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रामध्ये 1कोटीचा निधी उपलब्ध करून येवती ते ओंड पर्यंतच्या शेतीला संजीवनी दिली आहे. सध्या तुळसण, सवादे व गोटेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पांचे काम सुरू आहे. 10 कोटी खर्चाचा येळगाव मध्यम प्रकल्प मंजूर झाला आहे. डोंगरी भागातील सिंचन प्रकल्प, जलसंधारण या माध्यमातून सुमारे 2300 द.ल. घ.फूट म्हणजे सुमारे 2 टीएमसी पाणी अडवण्यात यश आले आहे. दक्षिण मांड खोऱ्यात सरासरी 1000 मिमी. पाऊस पडतो. पावसाने सर्वसाधारणपणे 2360 द.ल. घ.फूट पाणी या विभागात उपलब्ध होते. हे सर्व पाणी अडवण्याची किमिया काकांच्या प्रयत्नातून साध्य झाली आहे. हा दक्षिण मांड जलसिंचनाचा प्रकल्प राज्याला आदर्शवत असा आहे.
येवती कॅनाल
संपादनयेवती मध्यम प्रकल्पवर म्हासोली, सवादे, तुळसण, विठ्ठलवाडी, उंडाळे, ओंड गावातील सुमारे 4 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. 2 हजार हेक्टर क्षेत्र येवती कॅनलवर अवलंबून आहे. पोटपाटाने या शेतीला पाणी दिले जाते. कॅनाल दुरुस्ती जलसेतू व केटीवेरसाठी 140 लाख रुपये मंजूर केले आहेत. ही कामे प्रगतीपथावर आहेत. सध्या ओंड येथे पाणी पोचविण्यासाठी 72 तास इतका कालावधी लागतो. हे पाणी 48 तासात पोहचून शेतकऱ्यांना अधिक लाभ यामुळे होणार आहे.
दक्षिण मांड,वांग उपनद्या बरोबर जिंती, उंडाळे, तुळसण ओढ्यावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाण्याचे नियोजन केले आहे. मराठवाडी प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा या हेतूने वांग नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर केले आहेत. यापैकी काही बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. वांग नदीकाठावरील कराड व पाटण तालुक्यातील गावे आजही पूर्णतः सिंचनाखाली नाहीत. या गावांच्या सिंचनासाठी विलास काकांनी 14 के.टी.वेर मंजूर केले. यापैकी मालदनसह काही बंधाऱ्यांचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कराड दक्षिणची निर्मल गाथा
संपादनकराड दक्षिण मतदारसंघ विकासाच्या सर्व चळवळीत आघाडीवर राहिला आहे. जिल्ह्यात ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम व तंटामुक्ती मध्ये आघाडी घेतली आहे. या योजनांच्या यशस्वी तिचे प्रमाण सरासरी 80℅ इतके आहे. येथील लोकप्रतिनिधी आमदार विलासकाका सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार, गटविकास अधिकारी या सर्व स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांचे सहकारी व जनतेला जाते.
कराड तालुक्यात निर्मल गावे 71 इतकी आहेत. त्यापैकी तब्बल 40 गावे कराड दक्षिणेतील आहेत. 80 टक्के पेक्षा जास्त निर्मलचे प्रमाण उर्वरित गावांमध्ये आहे. ही गावे निर्मल होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये आरेवाडी, शेवाळवाडी(उंडाळे) लोहारवाडी, संजयनगर, मुनावळे, ओंडोशी, पवारवाडी (नांदगाव) पाचपुतेवाडी, शेळकेवाडी, हणमंतवाडी, हवेलीवाडी, अंतवडी,भरभुशी, गणेशवाडी, शेळकेवाडी( म्हासोली ) वनवासमाची, डेळेवाडी,शिंदेवाडी, गमेवाडी प. सुपने, साकुर्डे, कोयना वसाहत, गोंदी, कुसुर, नारायणवाडी, उंडाळे, धोंडेवाडी,दुशेरे, केसे, तारुख, उत्तर तांबवे, चचेगाव, रेठरे खुर्द,सुपने, तांबवे, आटके, गोळेश्वर या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांचा राष्ट्रपतींच्या हस्ते बहुमान झाला. तालुक्याची मान उंचावण्याचे काम या गावाने केली आहे.
कराड दक्षिणेतील निर्मल गावांचा विलासकाकांनी पुढाकार घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते निर्मलग्राम असणाऱ्या शेवाळवाडीत विशेष सत्कार करण्यात आला. 2 ऑक्टोंबर या महात्मा गांधीजींच्या जयंती दिवशी महाराष्ट्र शासनाने ग्रामस्वच्छता अभियानस सुरुवात केली. विलासकाकांनी मतदारसंघात स्वच्छता दिन पाळून या दिवशी स्वतः खराटा हातात घेऊन गावची स्वच्छता करण्याची प्रथा पाडली आहे. या दिवशी गावातील सर्व जाती धर्म, आबालवृद्ध महिलांना एकत्र येऊन प्रबोधन बरोबर झुणका भाकरीची स्नेहभोजनाचेही आयोजन करून लोकांमध्ये सलोखा वाढवण्याचे काम केले जाते. तांबवे या गावी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते मतदारसंघात स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.
हरितक्रांतीच्या माध्यमातून स्व.यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादांनी महाराष्ट्र घडवला. त्याकाळी आपल्या मतदारसंघात शेती विकासाच्या योजना यशस्वी करून कै. बाळासाहेब देसाई, कै. राजारामबापू लोकनेते ठरले. वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात डोंगरी विभागातील शेतीला 1 टीएमसी पाणी मिळवून आधुनिक महाराष्ट्रात आमदार विलासकाकांनी लोकनेते पदाला साजेसा विकास साधल्याचे गौरवोद्गार काढले जात आहेत.
नव्या हरित क्रांतीची पहाट, वाकुर्डे उपसा सिंचन योजना
संपादनसांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा व सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील डोंगराळ क्षेत्रातील सिंचनाचा लाभ देण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ 19 डिसेंबर 1998ला 'वाकुर्डे उपसा सिंचन' योजनेला मंजूरी दिली. कराड दक्षिणेतील 2200 हेक्टर क्षेत्राचा समावेश करण्यात आला. शिराळा 7270 हेक्टर, वाळवा 18,565 हेक्टर अशा एकूण 28035 हेक्टर क्षेत्राला या योजनेचा लाभ झाला.
या योजनेसाठी 485 कोटी रुपये खर्च येणार असून योजनेची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. वारणा कालवा किमी 24 मधून योजना भाग क्र. 1 साठी उपसा करण्यात येईल. तर वारणा कालवा किमी 69 मधून योजना भाग क्र. 2 साठी पाणी उपसा करण्यात येणार आहे. योजना भाग क्र. 1 मधून एकूण 12275 हेक्टर लाभक्षेत्र तीन तालुक्यातील भिजणार आहे. टप्पा 1 मध्ये पंपगृह, वारणा कालवा ते पंपगृहाला जोडणारा फिडर कालवा, ऊर्ध्वगामी नलिका, खिरवडे बोगदा 380 मीटर खिरवडे जलसेतु हातेगाव बोगदा 746 मीटर यांचा समावेश आहे. टप्पा क्र. 2 मध्ये पंपगृह क्र.2 ऊर्ध्वगामी नलिका, बांदेवाडी बोगदा 17 40 मीटर, येणपे बोगदा 3990 मीटर यांचा समावेश आहे. तर टप्पा 3 मध्ये पंपगृह क्र. 3 शिरशी, पणुंब्रे बोगदे कालवे यांचा समावेश आहे.
सन 2004 - 05 डोंगराळ, अवर्षण निधीतून मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून आमदार उंडाळकरांनी 25 कोटी रुपयांचा निधी मिळवला. या निधीतून योजनेची रखडलेली टप्पा 1 व टप्पा 2 मधील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये टप्पा क्र. 1 मधील खिरवडे बोगदा, जलसेतु, हातेगाव बोगदा, बांदेवाडी बोगदा, येणपे बोगदा ही महत्त्वपूर्ण कामे पूर्ण झाली आहे. टप्पा क्र. 1 व 2 मधून भिजणाऱ्या क्षेत्राला पाणी मिळवण्यासाठी पंपगृह 1, पंपगृह 2 व ऊर्ध्वगामी नलिका व यांत्रिक कामे होणार आहेत. यासाठी 25 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. सन 2009 - 10च्या अर्थसंकल्पात 25 कोटी निधी मंजूर झाला असून ही कामे गतीने सुरू झाली. पाणी तलावातून उताराच्या सहाय्याने येणपे बोगद्याद्वारे कराड तालुक्याला देण्यात आले.
या योजनेच्या पूर्तीनंतर वारणेचे पाणी दक्षिण मांड द्वारे कृष्णा नदीला मिळणार आहे. हा भारत नदीजोड प्रकल्पातिल राज्यातील पहिला नदीजोड प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सिंचन क्षेत्रात आमदार उंडाळकर यांनी इतिहास निर्माण केला आहे.
वारणा कालवा किमी 24 योजना भाग क्र. 1 लाभक्षेत्र हेक्टर मध्ये
संपादनतालुका टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3
# कराड # शिराळा # वाळवा
योजनेचे नाव
संपादन* उंडाळे 17 गावे नळ पाणीपुरवठा योजना 20 कोटी निधी * कोडोली नळ पाणीपुरवठा योजना 1 कोटी आठ लाख * घारेवाडी नळपाणी पुरवठा योजना 80 लाख रुपये * नळ पाणी पुरवठा योजना 6 कोटी 51 लाख * पाणी पुरवठा विहीर संख्या 70 2 कोटी रुपये * बोरवेल 775 2 कोटी 30 लाख
1967 साली विलासकाका जिल्हा परिषदेवर निवडून गेले. डोंगरी भागात पाण्याच्या टॅंकर बरोबर पाणी योजनांसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. या कामी कै. दिनकरराव पाटील यांचीही साथ मिळाली. 1980 साली प्रथम विधानसभेवर निवडून गेल्यावर विलासकाकांनी जनतेला पिण्यासाठी पाणी मिळाले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करून पाटबंधारे प्रकल्प, जलसंधारणाची कामे, प्रत्येक गावासाठी गावविहिरी, बोअरवेल, पाणीपुरवठा योजना राबविण्यास सुरुवात केली. गाव तेथे पाटबंधारे प्रकल्प राबविले.
1990च्या दरम्यान त्यांनी मतदारसंघ टॅंकरमुक्त केले. घारेवाडी साठी 80 लाख रुपयांची तर कोडोली गावासाठी एक कोटी रुपयांची शुद्ध पाण्याची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवली. 2000 सलात कोडोलीसारख्या नदीकाठच्या गावातील गॅस्ट्रोची साथ होती. ग्रामीण भागातील राज्यातील पहिली भुयारी गटार योजना विलासकाकांच्या मार्गदर्शनाखाली या गावात राबवली गेली. उंडाळेसह 17 गावात नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून साकारली. लटकेवाडी, आकाईचीवाडी, जिंती, तुळसण, पाचपुतेवाडी या डोंगरी गावा बरोबर साळशिरंब, उंडाळे , ओंड,ओंडोशी,काले, कालवडे, नारायणवाडी आदी गावांना या योजनेचा पाणीपुरवठा सुरू आहे. 20 कोटी रुपयांची योजना असून पाचवड येथे जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. काले व नांदगाव खिंड येथे मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत सर्व गावांना लोकसंख्येच्या क्षमतेनुसार नव्या पाण्याच्या टाक्या उभारले आहेत.
" पिण्याच्या पाण्याच्या सुविधा करताना लाखोंचा निधी खर्चून विलासकाकांनी अशक्यप्राय वाटणाऱ्या लटकेवाडी व पठारवाडी सारख्या डोंगरावर 4 कि.मी. लांबीची पाणी योजना करून 300 लोकवस्तीच्या गावात नाहीत पिण्याचे पाणी दिले. लटकेवाडीला कृष्णेचे तर पठारवाडीला कोयनेचे पाणी मिळाले आहे."