पाटण हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे पाटण जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

पाटण हे शहर जुन्या काळी 'अन्हीलवाड' या नावाने प्रसिद्ध होते. सोळंकी वंशाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गावात अजूनही जुन्या तटबंदीचे आणि वेशींचे अवशेष दृष्टीस पडतात.

पाटण हे शहर येथे असणाऱ्या 'राणी नी वाव' या पुरातन स्थळामुळे तसेच 'पटोला' साड्यांमुळे प्रसिद्ध आहे.