राष्ट्रीय महामार्ग ५८ (जुने क्रमांकन)

राष्ट्रीय महामार्ग ५८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. प्रामुख्याने उत्तराखंड राज्यामधून धावणारा हा महामार्ग ह्या राज्यामधील अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. ५३८ किमी (३३४ मैल) लांबीचा हा महामार्ग हिमालयातील भारत-तिबेट सीमेजवळील मना ह्या गावापासून सुरू होतो व बद्रीनाथ, जोशीमठ, चमोली, विष्णूप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर, देवप्रयाग, ऋषिकेश, हरिद्वार, रुरकी, मुझफ्फरनगर, मेरठ ह्या शहरांमधून जातो व दिल्लीजवळील गाझियाबाद येथे संपतो.

भारत  राष्ट्रीय महामार्ग ५८
लांबी ५३८ किमी
सुरुवात नवी दिल्ली
मुख्य शहरे हरिद्वार, ऋषिकेश
शेवट बद्रीनाथ
राज्ये उत्तर प्रदेश (१६५), उत्तराखंड (३७३)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

हे सुद्धा पहा

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ